" पंढरपूर पाण्याचे नव्हे तर दुष्काळाचे" . पाण्याची काटकसर आतापासूनच सुरू करा..... . पंढरपूर नगरपालिकेचे आव्हान


 पंढरपूर........
.    सांगोला सोन्याचं, मंगळवेढा धान्याचे आणि पंढरपूर पाण्याच अशी ओळख सोलापूर जिल्ह्यातील या तीन तालुक्याची केली जाते. परंतु यंदाचे वर्ष सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाल्यामुळे या जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यांमध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागल्याचे चित्र आतापासून स्पष्ट होऊ लागले आहे.
.     पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथे येणाऱ्या लाखोच्या संख्येने भाविकांची चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्याची मनोभावना असते यंदा पावसाच्या प्रमाण घटल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती ही निर्माण होऊ लागलेली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता पंढरपूर नगरपालिकेने पंढरपूर रहिवाशांना पाण्याची बचत करण्यासाठी व पाण्याची काटकसर करण्यासाठी पाण्याचा योग्य तो वापर करा असे आवाहन करण्यात आले आहे.
.    पंढरपूर शहरवासीयांना दररोज पिण्याच्या पाण्याचे पुरवठा केला जातो. पंढरपूर शहरांमधील असंख्य ठिकाणी पाण्याचा अपव्यय होत असल्याचे सर्वत्र दिसून येते. पाण्याची नासाडी त्याचप्रमाणे गाडी धुणे, जनावरे धुणे आणि कित्येक नळांना तोटी नसल्यामुळे पाणी वाहून जाते असे अनेक ठिकाणी दिसून येते. सध्या दुष्काळाची छाया संपूर्ण महाराष्ट्रावर असल्यामुळे पाण्याची बचत आता गरजेची झालेली आहे. पाण्याची बचत व्हावी व येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये देखील पिण्याचे पाणी पुरवठा केला जाण्याच्या उद्देशाने ही एक दिवस आड पाणीपुरवठा योजना पंढरपूर नगरपालिकेने 16 ऑक्टोबर 2026 रोजी पासून सुरू करीत आहे याची जाणीव होण्याच्या उद्देशाने पंढरपूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांनी पंढरपूर नगरपाशी यांना एक दिवस आड पाणीपुरवठा होणार असल्याचे निवेदनाद्वारे  सूचित केले आहे.
.   पाहूया पंढरपुरावासी पाण्याची बचत कसे करतात ते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

" दारू पिऊन घाणीमध्ये लोळणाऱ्या बिनसोंडाच्या वाचाळविरांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आय यांच्याकडून जाहीर निषेध "...... गोमूत्र शिंपडणे भाजपाला पडणार महागात......

" निवडणूक पूर्वी डॉ. बीपी रोंगे यांच्या प्रचाराची फेरी पूर्ण "...... . अन्य उमेदवार अद्यापही निष्क्रिय....

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"