" कॅरिडॉर बाधितांना तिथेच दुकान व घर कसे शक्य??????......


 पंढरपूर........

.     संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चित असलेला तीर्थक्षेत्र पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी  मंदिर परिसरातील कॅरिडॉर प्रकल्प हा आता लवकरच कार्यान्वित होईल शेकडोच्या संख्येने दुकानदार व रहिवाशी हे बाधित होणार असून या बाधित दुकानदार व रहिवाशांना शासन योग्य तो मोबदला देणार आहे.

.   शासनाने बाधितांचे अन्य ठिकाणी स्थलांतर करून त्यांची पुनर्वसन  करण्याची ठरवलेले आहे शासनाने भक्ती मार्ग येथील एमटीडीसी या परिसरामध्ये या रहिवाशांची सोय केली जाणार आहे त्याचप्रमाणे शासन मंदिर परिसरामध्ये या बाधित दुकानदारांना दुकानही देणार आहेत असे शासनाने जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे नुकतीच पंढरपूर शहरांमध्ये सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी पत्रकार परिषदेमध्ये असे जाहीर केले की मंदिर परिसरातील कॅरिडार बाधित दुकानदार व रहिवासी यांना मंदिर परिसरामध्येच घरे व दुकाने देण्याचे नियोजन शासनाचे असल्याचे सांगितले. कॅरिडोर या प्रकल्पाला विरोध दर्शवणारे हे बाधित लोक यांनी अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्याबाबत विरोध दर्शवला होता त्याचे पडसाद संपूर्ण शहर व जिल्हा वर झाले, कॅरिडार बाधितांचा विरोध लक्षात घेता शासनाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्येच या रहिवाशांना घरे व दुकाने देण्याचे नियोजन असल्याचे सांगितले पंढरपूर शहरातील हे बाधित दुकानदार व रहिवासी यांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण होऊ लागलेले आहेत याच मंदिर परिसरामध्ये या बाधितांचे प्रचंड मोठे घरे दुकाने वाडे आहेत. मग अशा प्रकारचे मोठे वाडे आणि दुकाने शासन देणार का ते कसे शक्य आहे? असाही सवाल हे कॅरिडॉर बाधित्व विचारत आहेत. शासन जर का याच परिसरामध्ये उंच इमारती उभा करून अपार्टमेंट मध्ये या रहिवाशांची सोय करणार की कसे? त्याचप्रमाणे या परिसरातील बाधित दुकानदारांना कुठे आणि कसे दुकाने देणार? त्याचप्रमाणे भाडेकरू कुळ असलेल्या लोकांना कुठे दुकान देणार?असा देखील सवाल हे लोक विचारू लागले आहे.

.     शासनाच्या म्हणण्याप्रमाणे जर का मंदिर परिसरामध्येच रहिवाशांना घर जागा व दुकाने मिळू शकत असतील तर या मिळणाऱ्या घर जागा व दुकाने याबाबत ही वाद विवाद समस्या या उद्भवणार नाहीत कशावरून? असा देखील सवाल या  परिसरातील लोक  विचारत आहेत कुळाच्या ताब्यात असलेली दुकाने हे मूळ मालकाला कसे मिळतील?त्या कुळांना कुठे दुकान मिळणार?असे असंख्य प्रश्न या परिसरातील लोक विचारू लागले आहेत.

.    या कॅरीडोरच्या प्रकल्पानंतर च्या रहिवासी व दुकानदारांची दुकाने व घरी ही मुख्य रस्त्यावर येणार असून या लोकांच्या मना मध्ये आता आपण देखील यापुढे या परिसरामध्ये दुकाने उघडू शकतो. आपणही आता व्यापार करू शकतो अशी जी आशेची पालवी फुटू पाहत आहे. अशा लोकांचा पुन्हा शासनाला विरोध होणार नाही कशावरून असा देखील सवाल स्थानिकामधून चर्चिला जात आहे.

.     पाहूया शासन काय काय सुविधा त्याचप्रमाणे बाधितांना याच परिसरामध्ये दुकाने व घरे कसे देणार होते तूर्तास एवढेच.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

" दारू पिऊन घाणीमध्ये लोळणाऱ्या बिनसोंडाच्या वाचाळविरांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आय यांच्याकडून जाहीर निषेध "...... गोमूत्र शिंपडणे भाजपाला पडणार महागात......

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"