" कोण म्हणत एम आय डी सी होणार नाही..........आम्ही केल्या शिवाय राहणार नाही"......आमदार समाधान दादा आवताडे. . आवताडे यांचा सातत्याने पाठपुरावा
पंढरपूर.......
. पंढरपूर तालुक्यातील तसेच शहरातील युवक हा चार यात्रेच्या भरोशावर आपले जीवनमान घालवित आहे या तरुणांच्या हाताला त्यांच्या कौशल्याला जोड मिळावी चार पैसे त्याच्या हातात मिळावे आणि तरुणांच्या जीवनामध्ये आर्थिक प्रगती यावी या उद्देशाने पंढरपूर तालुक्यामधील कासेगाव या ठिकाणी भाजपा आमदार समाधान दादा अवताडे यांनी एमआयडीसी सुरू करण्याचे व ही एमआयडीसी होण्या साठी सातत्याने महाराष्ट्र शासन दरबारी पाठपुरावा करीत आहेत त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळत असल्याचे सद्यस्थितीला दिसून येत आहे.
. नुकतेच पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे प्रस्तावित असलेल्या एमआयडीसीच्या कामाला गती मिळावी यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी मुंबई मंत्रालयातील कार्यालयात एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह यांची भेट घेतली यावेळी प्रस्तावित एमआयडीसीसाठी आवश्यक असलेली भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
. कासेगाव एमआयडीसी चा प्रकल्प प्रत्यक्षात मार्गी लागण्यासाठी भूसंपादन प्रक्रियेतील सद्यस्थिती येणाऱ्या अडचणी तसेच त्या सोडवण्यासाठी आवश्यक असलेली पुढील कारवाईची माहिती आमदार अवताडे यांनी घेतली प्रकल्पाच्या कामात कोणताही अनावश्यक विलंब होऊ नये आणि आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण व्हावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची मागणी त्यांनी कासेगाव येथे एमआयडीसी साकारल्यास पंढरपूर तालुक्यात औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे नवीन उद्योग लघु व मध्यम उद्योग तसेच स्थानिक उद्योगाचा उद्योजकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच परिसरातील युवकांच्या साठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत त्यामुळे हा प्रकल्प पंढरपूरच्या भविष्यातील औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे यासाठी कासेगाव एमआयडीसीचा प्रकल्प लवकरात लवकर प्रत्यक्षात येणे आवश्यक आहे या प्रकल्पाचा प्रत्येक टप्प्यावर सातत्याने पाठपुरावा केला जात असून भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून एमआयडीसीचे काम मार्गी लागेपर्यंत आवश्यक त्या पातळीवर पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.
. कोण म्हणते होत नाही एमआयडीसी आम्ही केल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका आमदार समाधान दादा अवताडे यांनी मांडलेली आहे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा