" कर्मयोगी माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांच्या सहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त महा रक्तदान शिबिर आयोजित "...... युवा नेते प्रणव परिचारक
पंढरपूर......
. पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते सहकार शिरोमणी कर्मयोगी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या सहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे या महा रक्तदान शिबीरामध्ये शेकडोच्या संख्येने पांडुरंग परिवार प्रेमी यांनी रक्तदान करून स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या समाज उपयोगी कार्याला यापुढे देखील कार्यरत करण्यासाठी तसेच सुधाकरपंत परिचारक यांच्या समाजसेवेचा वारसा पुढे चालवण्याच्या उद्देशाने पंढरपूर तालुक्यातील विविध गावांमधून मोफत आरोग्य शिबिर नेत्र शिबिर तसेच महा रक्तदान शिबिर आयोजित करून समाजसेवेचा वारसा पुढे चालू ठेवलेला आहे अशी माहिती युवा नेते प्रणव परिचारक यांनी आज आपल्या मुलाखतीमध्ये दिली.
. कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक हे सहकार क्षेत्रातील तज्ञ म्हणून ओळखले जाणारे तसेच महाराष्ट्राच्या राजकारणातील संत म्हणून ओळखले जाणारे हे व्यक्तिमत्व आज सुधाकर पंत परिचारक यांच्या सहाव्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने पांडुरंग परिवाराच्या वतीने परिचारक यांच्या समाजकार्याचा वारसा पुढे चालू ठेवण्याचा उद्देशाने तसेच सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी उद्योजक व्यापारी या सर्वांच्या जीवनामध्ये आर्थिक प्रगती आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले हे परिचारक कुटुंब समाजसेवेच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी यांच्या जीवनाशी एकरूप झालेले आहे आज स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या सहाव्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून समाजातील तळागाळातील लोकांच्या साठी अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविले जात आहेत हा सुधाकर पंत परिचारक यांचा वारसा आम्ही पुढे देखील चालू ठेवू असे युवा नेते प्रणव परिचारक यांनी आज महा रक्तदान शिबिर याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.
. या महा रक्तदान शिबिराला माजी विधान परिषद आमदार प्रशांतराव परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन कैलासराव खुळे सर तसेच अन्य संचालक मंडळ त्याचप्रमाणे पांडुरंग परिवारातील ज्येष्ठ नेते मंडळी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा