" हीच का ती स्वच्छ, सुंदर पंढरी?" . ड्रेनेजचे पाणी घराघरामधून फिरू लागले.....


 पंढरपूर.....

.     प्रत्येक यात्रा कालावधीच्या अगोदर पंढरपूर नगरपालिका आपल्या नगरपालिकेच्या वतीने स्वच्छ पंढरी सुंदर पंढरी असे घोषवाक्य सर्वत्र फिरवत आमची पंढरी ही किती स्वच्छ आहे निर्मळ आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असते.

.    पंढरपूर शहरातील एकमेव असे ब्रिटिशकालीन शहर रचना असलेला परिसर भोसले चौक डाळे गल्ली कडवे गल्ली या परिसराची नगर रचना ब्रिटिशांनी केलेली असून अशी रचना पंढरपूर नगरपालिकेला स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये देखील जमलेली नाही अशा या परिसरामध्ये नगरपालिकेचे ड्रेनेज लाईन हे किती तकलादू आहे, ते सतत तुंबत असते आणि या तुंबलेल्या ड्रेनेज मधून महिला मिश्रित पाणी या परिसरातील प्रत्येक घराघरांमध्ये प्रवेश करत असते आणि नगरपालिका चे कामकाज किती स्वच्छ आणि सुंदर आहे हेच त्या परिसरातील रहिवाशांना सांगत असते.

.    या परिसरातील लोकसेवक तसेच नगरपालिकेतील कर्मचारी संबंधित अधिकारी यांना वारंवार कळवून देखील या तुंबलेल्या ड्रेनेची दुरुस्ती केली गेली नाही या परिसरातील रहिवाशांचे आरोग्य हे धोक्यात आलेले आहे तरी नगरपालिका आरोग्य विभागाने या ठिकाणी असलेली सर्वसामान्य लोकांची अडचण नगरपालिकेने दूर करावी अशी मागणी या परिसरातील असंख्य रहिवासी करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

" दारू पिऊन घाणीमध्ये लोळणाऱ्या बिनसोंडाच्या वाचाळविरांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आय यांच्याकडून जाहीर निषेध "...... गोमूत्र शिंपडणे भाजपाला पडणार महागात......

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"