" कॅरीडॉर कुठून होणार कसा होणार याची माहिती जनतेला दिलीच पाहिजे नगरपालिकेने संपूर्ण शहरभर फ्लेक्स लावावा "...... शहरवासी


 पंढरपूर.... प्रतिनिधी..

     नुकताच महाराष्ट्र शासनाने पंढरपूर तीर्थक्षेत्र यासाठी भाविक भक्तांच्या साठी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्याचप्रमाणे पंढरपूर शहरातील वाहतूक ही सुरळीत व्हावी म्हणून आणि वारकरी संप्रदायातील येणाऱ्या असंख्य भाविकांना वारी कालावधीमध्ये तसेच अन्य कालावधीमध्ये  भाविक भक्तांना यात्रा कालावधीमध्ये  सुविधा उपलब्ध होवायात म्हणून त्यांच्यासाठी ही संकल्पना अमलात आणण्याचे नियोजन केलेले आहे त्यासाठी चार हजार 150 कोटी रुपये शासनाने मंजूर केलेले आहे.

      पंढरपूर शहरांमधील रहिवाशी अद्यापही अनभिज्ञ आहेत करिडोर कुठून सुरू होणार, रस्ते कुठून मोठे होणार, शहरातील कुठल्या भागांमधील इमारती या जमीन दोस्त होणार याची काहीही माहिती पंढरपूर नगरपालिका तसेच महाराष्ट्र शासनाने दिलेली नाही.

    पंढरपूर शहरातील असंख्य रहिवाशांना असे वाटते की पंढरपूर शहरातील असंख्य डीपी रस्ते हे मोठे होणार आहेत त्याचप्रमाणे मंदिर परिसरामध्ये कॅरिडॉर च्या नावाखाली असंख्यवाडे मठ मंदिर त्याचप्रमाणे दुकानदाराचे,रहिवाशांचे घरे हे जमीन दोस्त होणार आहेत.

    महाराष्ट्र शासन आणि पंढरपूर नगरपालिका यांनी पंढरपूर शहरातील मुख्य रस्त्यावर विविध ठिकाणी विविध चौकामधून कॅरिडॉर हा कुठून कसा आणि किती मीटरचा होणार आहे त्याचप्रमाणे डीपी रस्ते हे किती फुटाचे कुठल्या भागातून होणार आहेत डीपी रस्ते एकूण किती आहेत याची सविस्तर माहिती नकाशाच्या द्वारे संपूर्ण शहरभर लावण्यात यावीत अशी मागणी पंढरपूर शहर वाश्यांचे आहे.

       पंढरपूर शहरातील लोकप्रतिनिधी हे कॅरी डॉर कसा कुठून कशा पद्धतीने होणार आहे याची माहिती देत नाहीत फक्त खूप छान होणार आहे खूप छान होणार आहे एवढेच त्यांनी बोलतात परंतु अद्यापही रहिवाशांच्या मनामध्ये आपली रहिवासी जागाबाधित होणार आहे की काय डीपी रस्त्यामध्ये जाणार आहे की काय याची धास्ती शहरवाशांच्या मनामध्ये अद्यापही आहे ही भीतीही धास्ती मिटवण्याचे कार्य  लोकप्रतिनिधी नगरसेवक यांचे आहे परंतु कोणताही लोकप्रतिनिधी व नगरसेवक याबाबत स्पष्टपणे नागरिकांशी बोलताना दिसून येत नाहीत 

      पंढरपूर नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी संपूर्ण शहरांमध्ये कॅरीडोर  व डीपी रस्ते हे कुठून व कशा पद्धतीने होणार आहे त्याचे डिजिटल फ्लेक्स लावण्यात यावे अशी मागणी पंढरपूर रहिवाशांच्या कडून होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"

"डॉ प्रणिता ताई भालके यांच्या रेकॉर्ड ब्रेक प्रचार शुभारंभा मुळे विरोधकांच्या ह्रदयाची धकधक वाढली "