" लहान बाळांसाठी काय पण" डॉ.शीतल शहा.बालरोग तज्ञ


 पंढरपूर ( प्रतिनिधी) लहान बाळांच्या साठी काही पण या उद्देशाने पंढरपूर शहरातील सुप्रसिद्ध नामांकित बालरोग तज्ञ डॉक्टर शितल शहा हे पंढरपूर शहरांमध्ये कार्यरत आहेत. 

     डॉक्टर शीतल शहा हे नामांकित वैद्यकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते यांच्या रुग्णालयामध्ये असंख्य बालकांनी जन्म घेतलेला असून त्याचप्रमाणे बालकांच्या असंख्य आजार रोग यावर त्यांनी शस्त्रक्रिया व औषध उपचार करून या बालकांना जीवनदान दिलेले आहे असंख्य माता-भगिनींना पालकांना या डॉक्टर शितल शहा यांचा अतिशय चांगला अनुभव आलेला आहे अशी चर्चा संपूर्ण पंढरपूर शहरच नव्हे तर पंढरपूर तालुक्यांमध्ये केली जाते. 

      लहान बाळांसाठी आवश्यक असलेले कपड्यांचे दालन नॅपकिन्स पॅड लहान बालकांना लागणारे अन्य वस्तू व साहित्य माफक दरामध्ये मिळवून देण्याच्या उद्देशाने डॉक्टर शितल शहा यांनी पंढरपूर शहरांमध्ये भव्य दिव्य असे फर्स्ट क्राय या नावाचे कपड्याचे दालन सुरू झालेले आहे.

    डॉक्टर शितल शहा यांच्या शुभहस्ते के बी पी कॉलेज पंढरपूर या चौकामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी व्यापारी संकुल या ठिकाणी भव्य असे लहान बाळांचे सर्व आवश्यक वस्तू व कपडे मिळण्याचे एकमेव ठिकाण सुरू झालेले आहे याचा लाभ पंढरपूर शहर व पंढरपूर तालुक्यातील असंख्य बालकांना होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"फक्त वारी पुरती अतिक्रमण हटाव मोहीम की कायमस्वरूपी मोहीम "...

"दि.पंढरपूर मर्चंट को .ऑप.बॅंक लि.पंढरपूर टेंभुर्णी शाखेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन "..ह.भ.प.प्रभाकर दादा बोधले यांच्या शुभहस्ते संपन्न....

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "