" मोडनिंब जिल्हा परिषद गटामधून सौ वंदना शिवाजी कांबळे यांनी रचला इतिहास"..... सहा हजार मताधिक्याने विजयी.....


 पंढरपूर ( प्रतिनिधी) सोलापूर जिल्हा परिषद चे माजी सदस्य आणि समाज कल्याण चे सभापती शिवाजीराव नाना कांबळे यांच्या सहचारिणी सौ वंदना शिवाजी कांबळे यांनी यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या मध्ये 6000 च्या पुढील मताधिक्याने विजय मिळवून या मोडनिंब गटामधील निवडणुकीमध्ये एक प्रकारे इतिहास रचला. 

      मोडनिंब गटामधील नेते जिल्हा परिषद चे माजी सदस्य व समाज कल्याण चे माजी सभापती यांच्या कार्याच्या माध्यमातून या परिसरामध्ये असंख्य विकासकामे केल्यामुळे आणि सतत जनकल्याणाचा व ग्राम विकास कार्याचा ध्यास घेतलेले व्यक्तिमत्व म्हणजे शिवाजी नाना कांबळे यांच्या कार्याचा वारसा पुढे चालू ठेवण्याच्या उद्देशाने त्यांच्या पत्नी सौ वंदना शिवाजी कांबळे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपाकडून उमेदवारी जाहीर करून  त्यांनी  या मोडलिंब गटामधून प्रचंड मताधिक्य मिळवून विजयी झाले आहेत. 

     सौ वंदना शिवाजी कांबळे यांच्यावर संपूर्ण सोलापूर जिल्ह्या मधून अभिनंदन वर्षाव होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"

"डॉ प्रणिता ताई भालके यांच्या रेकॉर्ड ब्रेक प्रचार शुभारंभा मुळे विरोधकांच्या ह्रदयाची धकधक वाढली "