" सुर्यनारायण देव यात्रा नारायण चिंचोली येथे उत्सवात सुरू" .... सरपंच सौ नर्मदा लक्ष्मण धनवडे
पंढरपूर ( प्रतिनिधी)नारायण चिंचोली येथील सूर्यनारायण देव यात्रा मोठ्या उत्साहात सुरू
पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे सूर्यनारायण देव यात्रा मोठ्या उत्साहात सुरू झाली असून ही यात्रा पौष शुद्ध प्रतिपदा ते माघ प्रतिपदा म्हणजे रथसप्तमी पर्यंत जवळपास महिनाभर चालते. अशी माहिती पुजारी गणेश अवताडे यांनी दिली.
तीर्थक्षेत्र पंढरपूर पासून अवघ्या दहा किलोमीटरवर असणाऱ्या पंढरपूर मोहोळ रोडवर नारायण चिंचोली येथे महाराष्ट्रातील एकमेव असे पुरातन हेमाडपंती सूर्यनारायण देव मंदिर असून या मंदिराचे बांधकाम अत्यंत कोरीव असे दुर्मिळ आहे. मंदिरात दगडी बांधकाम असून सूर्यनारायणाची मंदिरातील मूर्ती महादेवाच्या पिंडीच्या आकारासारख्या दगडावरती अखंड साडेपाच फुटी मूर्ती आहे. या मूर्ती वरती विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत. श्री ची मूर्ती पूर्वाभिमुख असून मूर्ती वरती सूर्याची उगवती किरणे पडतात. या देवाची यात्रा संपूर्ण महिनाभर चालते व विशेष महिन्यातील प्रत्येक रविवारी धार्मिक कार्यक्रमाचे म्हणजे भजन ,कीर्तन, भारुड अधिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. अशी माहिती सूर्यनारायण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. दत्तात्रय मस्के सर यांनी दिली. विशेषतः या महिन्यातील तिसऱ्या रविवारी देवाच्या पालखी सोहळ्याचे आयोजन मोठ्या दिमाखात केले जाते. संपूर्ण गावातील मुख्य रस्त्यावरून हा पालखी सोहळा निघून दुपारी बारा वाजता महाआरती होते .यावेळी तालुक्यातून आलेल्या सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती भाजपचे राज्य कार्यकारणी सदस्य लक्ष्मण धनवडे ,उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण यांनी दिली. या यात्रेची संपूर्ण तयारी व येथे येणाऱ्या भाविक भक्तांसाठी वाहन पिण्याच्या पाण्याची व आरोग्य व्यवस्थेची सोय करण्यात आली असल्याची माहिती सरपंच सौ नर्मदा लक्ष्मण धनवडे व ग्रामसेवक संतोष गायकवाड यांनी दिली आहे. ही यात्रा सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी येथील तरुण वर्ग विविध संस्थेचे पदाधिकारी ट्रस्ट संचालक मंडळ, ग्राम प्रशासक सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने भाग घेऊन यात्रा पार पाडतात.
तरी सर्व भावीक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नारायण चिंचोली ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा