"राज ठाकरे यांच्या शुभहस्ते हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी चे शुभारंभ".. अनेक मान्यवरांची उपस्थिती.
पंढरपूर.प्रतिनिधी....
पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणापासून काही अंतरावर वारकरी,भाविक भक्त,पर्यटकाच्या सोईच्या उद्देशाने व सेवेसाठी पंचताराकीत च्या धर्तीवर हे होटल ग्रँड रेसिडेन्सी व हॉटेल श्रेयस या दोन्हीच्या माध्यमातून पर्यटकांना व वारकरी भावी भक्तांना राहण्याची व जेवण्याची उत्तम प्रकारची सोय दिलीप बापू धोत्रे यांनी करून दिल्यामुळे पर्यटकांची सोय झालेली आहे. असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी च्या उद्घाटनाप्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या हॉटेल ग्रँड रेसिडेन्सीच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित मान्यवर म्हणून असंख्य राजकीय नेतेमंडळी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेनेचे नेते प्राध्यापक शिवाजीराव सावंत माढा तालुक्याचे आमदार अभिजित आबा पाटील पंढरपूर नगरपरिषद चे उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले सरकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याची चेअरमन कल्याणराव काळे., नगरसेवक नाना कदम, आणि असंख्य मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा