"धनशक्ती ला भगिरथ भालके यांची जनशक्ती विरोधकाला पराभूत करणार आहे"....... शिवसेना शहर अध्यक्ष श्रीनिवास उपळकर


 पंढरपूर.. प्रतिनिधी...

    भाजपाचे उमेदवार धनशक्ती चा वापर करुन तसेच खोटी आश्वासन देऊन मतदारांची दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत. या अशा भूलथापाना बळी न पडता मतदारांनी या विरोधकाला घरचा रस्ता दाखवण्याची वेळ येत्या वीस तारखेला येत आहे. या वीस तारखेला सर्व मतदारांनी भाजपाच्या उमेदवाराला पराभूत करुन  समाधान मिळवण्याची वेळ आली आहे. असे आज पंढरपूर येथील ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी येथील सभेत शिवसेना उबाठा चे शहर अध्यक्ष श्रीनिवास उपळकर यांनी भगिरथ भालके यांच्या प्रचार सभेत बोलताना ते म्हणाले.

    पंढरपूर शहरातील धुळीचे,घाणीचे साम्राज्याला येथील नगरपालिका व लोकप्रतिनिधी जबाबदार आहे. अशा निष्क्रिय भाजपाच्या उमेदवाराला पराभूत करावे. हे विरोधक निवडणूकीच्या पुढे लक्ष्मी ला घेऊन येतील त्या लक्ष्मी ला आपल्या घरी घ्या व  विरोधकाला पराभूत करून त्याच्या घरी कायमचे पाठवा.

   गोरगरीब जनतेची बाजू घेणारे भगिरथ भालके यांना येत्या निवडणूकमध्ये विजयी करून आपल्या शहरातील विकासासाठी मदत करा. येत्या वीस तारखेला भगिरथ भालके यांना मतदान करून विजयी करण्याचे आवाहन ऊपळकर यांनी केले.

     या प्रचार सभेला उपस्थित नेते मंडळी सुधीर धोत्रे,, नागेश जाधव, राजेश भादुले, संजय बंदपट्टे, आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....