नागेश भोसले यांच्या हस्ते " भव्य नोकरी महोत्सव" चे उद्घाटन

 

पंढरपूर ( प्रतिनिधी). पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील तरुण बेरोजगार युवकांना नोकरी मिळवुन देण्यासाठी आज पंढरपूर येथील तनपुरे महाराज मठ या ठिकाणी " भव्य नोकरी महोत्सव" चे आयोजन भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल दादा सावंत यांच्या संकल्पनेतून हा भव्य नोकरी महोत्सव आयोजित केले आहे.

     या नोकरी महोत्सव मध्ये महाराष्ट्रातील ५० कंपन्या सहभागी झाले आहेत.या कंपन्या मधून सुशिक्षित तरुण बेरोजगारांना नोकरी मिळणार आहे.

     पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील तरुणांना विविध कंपन्यांच्या माध्यमातून नोकरी मिळावी म्हणून हा नोकरी महोत्सव आयोजित करून अनिल दादा सावंत यांनी तरुण बेरोजगारांची मनोवस्था जाणून या बेरोजगार युवकांना नोकरी मिळावी म्हणून हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला आहे.

     या ठिकाणी विविध शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवाराला या ठिकाणी आलेल्या विविध कंपन्यांच्या कडून मुलाखत घेतली जाणार आहे.आणि कंपनीला जे कोणी उमेदवार योग्य असतील त्यांना नोकरीचे नेमणूकी चे पत्र दिले जाणार आहे.

    या भव्य नोकरी महोत्सवाचे उद्घाटन माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आला.यावेळी उपस्थित मान्यवर अनिल दादा सावंत, संदीप मांडवे,आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"फक्त वारी पुरती अतिक्रमण हटाव मोहीम की कायमस्वरूपी मोहीम "...

"दि.पंढरपूर मर्चंट को .ऑप.बॅंक लि.पंढरपूर टेंभुर्णी शाखेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन "..ह.भ.प.प्रभाकर दादा बोधले यांच्या शुभहस्ते संपन्न....

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "