......... त्या ठिकाणी एसटी महामंडळाने व्यापारी संकुल काढावे


 पंढरपूर ( प्रतिनिधी) नुकतेच पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी पंढरपूर बस स्थानकामध्ये भेट दिली असता, त्या ठिकाणी असलेले घाणीचे साम्राज्य पाहून संताप व्यक्त केला. 

     पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी भाविक भक्त, वारकरी हे सर्व प्रवासी रेल्वे व एसटीच्या माध्यमातून आपला प्रवास करीत असतात. या सर्व प्रवाशांना पंढरपूर बस स्थानक येथील घाणीचे साम्राज्य पाहायला मिळते व दुर्गंधी सहन करावी लागते. या पंढरपुर येथील बस स्थानकात काही व्यापारी गाळे हे काढलेले आहेत. अशाच पद्धतीचे व्यापारी गाळे हे पंढरपूर बस स्थानकाच्या समोरील भागात रेल्वेच्या रुळा शेजारील परिसरामध्ये लोक शौच करतात, लघु शंका करतात. त्यामुळे बस स्थानकामधील प्रवाशांना दुर्गंधीयुक्त वास सहन करावा लागतो. ही दुर्गंधीयुक्त घाणीचे साम्राज्य जर संपवायचे असेल तर पंढरपूर बस स्थानक या ठिकाणी परिवहन महामंडळाने व्यापारी गाळे हे काढून या ठिकाणावर असलेली दुर्गंधी नष्ट होईल आणि असंख्य गाळे निर्माण झाल्याने पंढरपूर शहरातील असंख्य बेरोजगारांना भाडेतत्त्वावर  दुकाने देऊन बेरोजगारांची बेकारी हटवण्यास हे  कामे येतील. असंख्य बेरोजगारांना एक प्रकारचा रोजगार उपलब्ध होईल, आणि हा घाणीचा परिसर स्वच्छ होऊन  हे पंढरपूर बस स्थानकाच्या सौंदर्यात भर पडेल. अशी अपेक्षा वारकरी भाविक भक्त तसेच पंढरपूर शहरातील व तालुक्यातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"फक्त वारी पुरती अतिक्रमण हटाव मोहीम की कायमस्वरूपी मोहीम "...

"दि.पंढरपूर मर्चंट को .ऑप.बॅंक लि.पंढरपूर टेंभुर्णी शाखेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन "..ह.भ.प.प्रभाकर दादा बोधले यांच्या शुभहस्ते संपन्न....

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "