विधानसभा निवडणुकीत " वसंत" फुलणार?....


 पंढरपूर ( प्रतिनिधी) गेल्या कित्येक वर्षांपासून परिचारक यांच्या पांडुरंग परिवाराला साथसोबत करणारे पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील राजकीय प्रस्थ वसंत नाना देशमुख हे आजपर्यंत परिचारक गटातील प्रसिद्ध राजकीय नेतृत्व म्हणून ओळखले जातात. वसंत नाना देशमुख यांनी परिचारक यांना प्रत्येक विधानसभा निवडणुकीत भरपूर मदत केली आहे.कासेगाव गटामधून मत्ताधिक मिळवून दिले आहे.कासेगाव गटावरील आपले वर्चस्व त्यांनी अबाधित राखले आहे.या गटातील मत्ताधिक च्या जोरावर त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य पद देखील मिळवले आहे.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पद देखील भूषवले आहे.

    पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करायला मिळावे ही इच्छा प्रत्येक कार्यकर्त्यांची असते.पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघा वरील परिचारक यांची पकड ढिल्ली होत चाललेल्या ची लक्षणे दिसू लागली आहेत.असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

     वसंत नाना देशमुख यांनी आपल्या कार्यकर्ते ची विचार विनिमय बैठक गुरुवारी दिनांक २९/०८/२०२४ रोजी मल्ल्या देवी मंदिर जवळील सभामंडपात आयोजित करण्यात आली आहे.

 या विचारविनिमय बैठकीस सर्व कार्यकर्ते नी उपस्थित रहावे.असे आवाहन वसंत नाना देशमुख यांनी पत्रक काढून केले आहे.

     पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील राजकीय घडामोडी या धक्कादायक ठरणार की काय? अशी चर्चा मतदारांमध्ये सुरू झाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....