"फेब्रुवारी महिन्यामध्येच मराठा भवन ची मागणी आमदार समाधान दादा अवताडे यांनी केली होती "

 पंढरपूर ( प्रतिनिधी) तीर्थक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी चार वारीच्या निमित्ताने लाखोच्या संख्येने वारकरी संप्रदाय हा येत असतो. या वारकरी संप्रदायांमध्ये मराठा समाजातील लोक हे अग्रगणीय संख्येने येत असतात. मराठा समाजासाठी सांस्कृतिक व सामाजिक कार्यासाठी पंढरपूर शहरामध्ये जागा नसल्यामुळे मराठा बांधवांची सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम पार पडत नव्हते. मराठा बांधवांच्या साठी पंढरपूर येथे गजानन महाराजांच्या पिछाडीस असलेली साईट क्रमांक 45 या जागेवर मराठा भवन उभे केले जावे. अशी मागणी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील आमदार समाधान दादा अवताडे यांनी 2 फेब्रुवारी 2024 च्या हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र शासनाकडे लेखी मागणी केलेली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा बांधवांसाठी मराठा भवन उभे करण्यासाठी जागा व निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्ती आज मराठा बांधवांना मराठा भवन साठी जागा उपलब्ध झालेली आहे. व त्या मराठा भवन साठी उभारणीसाठी पाच कोटीचा निधी देखील शासनाने जाहीर केलेला आहे. 

     मराठा बांधवांना अपेक्षित असलेले मराठा भवन हे पंढरपूर शहर मधील मध्यवर्ती या ठिकाणी होत असल्यामुळे मराठा बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"फक्त वारी पुरती अतिक्रमण हटाव मोहीम की कायमस्वरूपी मोहीम "...

"दि.पंढरपूर मर्चंट को .ऑप.बॅंक लि.पंढरपूर टेंभुर्णी शाखेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन "..ह.भ.प.प्रभाकर दादा बोधले यांच्या शुभहस्ते संपन्न....

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "