*आमदार समाधान आवताडे यांच्या कार्याचा लाभ राम सातपुते यांना होणार" 40 वर्षापासून होत असलेली रस्त्याची तक्रार आमदार अवताडे यांनी मिटवली.
पंढरपूर ( प्रतिनिधी) . सोलापूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपाचे तसेच काँग्रेसचे उमेदवार संपूर्ण मतदारसंघांमध्ये प्रचाराचा दौरा करतआहेत. पंढरपूर लोकसभा मतदारसंघांमध्ये हे नेतेमंडळी फिरत असताना स्थानिक पंढरपूर रहिवासी यांचं काय म्हणणं आहे.? याचा कानोसा घेतला असता पंढरपूर शहरातील उपनगर तसेच नदी कडे चा भाग या भागातील रहिवाशांशी संवाद साधला असता या भागातील लोकांनी आमदार समाधान दादा अवताडे यांनी कैकाडी मठ परिसर, शिंदे नाईक नगर, त्याचप्रमाणे कुंभार गल्ली, प्रजापती मंदिराच्या शेजारील रस्ता आणि या भागातील रस्त्यांची ची सोय, पिण्याचे पाण्याची सोय या सर्व सोयी आमदार समाधान आवताडे यांनी जातीने लक्ष देऊन केल्यामुळे या परिसरातील लोक समाधान आवताडे ज्या उमेदवाराला मतदान करायला सांगतील तो उमेदवार आम्ही निवडणार आहे. असे या भागातील रहिवाशांच्या संवादामधून ऐकायला मिळाले.
राम सातपुते त्याचप्रमाणे प्रणिती ताई शिंदे या दोघांच्या उमेदवारीबद्दल आम्ही या भागातील रहिवाशांची संवाद साधला असता या दोघांची तुलना मध्ये राम सातपुते या भाजपाच्या उमेदवाराची बाजू येथील रहिवासी घेत असल्याचे निदर्शनास आले. या बाबतीत कारण विचारले असता समाधान आवताडे हे भाजपचे आमदार आहेत. या भाजपाच्या आमदारांनी केलेल्या कामामुळेच आम्ही खासदार म्हणून राम सातपुते यांना पसंती देतोय. असे या भागातील रहिवाशांनी माहिती दिली.
एकूण पंढरपूर शहरातील या भरगच्च लोकसंख्या असलेल्या भागामधून आमदार अवताडे यांचे कार्य चांगल्या पद्धतीचे असल्यामुळेच सर्वसामान्य जनता ही भाजपाच्या पाठीशी आहे. असे चित्र सद्यस्थितीला तरी दिसून येत आहे.
संपूर्ण देश पातळीवरील ही लोकसभा निवडणूक असल्यामुळे या भागातील रहिवाशांचे असे म्हणणे आहे की लोकसभेला भाजपचा उमेदवार निवडून दिल्यास या भागातील अजूनही सुधारणा होतील. त्याचप्रमाणे पंढरपूर शहर परिसरामध्ये एमआयडीसी सारखे प्रकल्प देखील हे उभे राहतील. अशी अपेक्षा या भागातील रहिवाशांनी आपले मनोगता मधून व्यक्त केली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा