पोस्ट्स

" विविध महामंडळा मार्फत कर्ज देणे बाबत अजुन प्रयत्न करावा.सर्व मदत केली जाईल"...... प्रतापराव पवार व्यवस्थापकीय संचालक वसंतराव नाईक महामंडळ महाराष्ट्र राज्य.

इमेज
 पंढरपूर......... .       नुकतेच पंढरपूर शहरातील व्यापारी बँक म्हणून ओळखली जाणारी दि.पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक या बँकेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणारे विविध आर्थिक विकास महामंडळ या महामंडळाच्या माध्यमातून गरजू तरुण उद्योजक यांना आर्थिक पुरवठा केला जातो. महाराष्ट्र राज्याचे वसंतराव नाईक महामंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई व्यवस्थापकीय संचालक प्रतापराव पवार यांनी नुकतीच भेट दिली. त्याप्रसंगी बँकेचे कामकाज पाहून समाधान व्यक्त करीत त्यांनी सर्व महामंडळाचा आढावा घेत समाधान व्यक्त केले. त्याप्रसंगी बोलत असताना ते म्हणाले ओबीसी महामंडळामार्फत कर्ज देणे बाबत अजून प्रयत्न करावा त्यासाठी लागणारे सर्वोतोपरी मदत केली जाईल. असे आश्वासन त्यांनी दिले. .    या भेटीदरम्यान राज्य समन्वयक श्री गुरव साहेब, जिल्हा समन्वयक श्री राहुल सर आदी मान्यवर उपस्थित होते. .    दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन राजेंद्रजी फडे तसेच व्हाईस चेअरमन आदित्य फत्तेपुरकर पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुलजी म्हम...

" भीमा साखर कारखान्याच्या सभासदांना व कामगारांना गोड भेट " . सभासदांच्या हिताला प्राधान्य.... चेअरमन विश्वराज धनंजय महाडिक

इमेज
 पंढरपूर....... भीमा सहकारी साखर कारखाना या कारखान्याच्या प्रगतीला तसेच सभासद व कामगारांच्या हिताला प्राधान्य देत भीमा सहकारी साखर कारखान्याचा कारभार सुरू असून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथमतः साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक सभासद व कामगारांना साखरेची गोड भेट देण्याची नियोजन चेअरमन विश्वराज महाडिक यांनी केले आहे. .    वीस रुपये किलोने 30 किलो साखर देण्याचे नियोजन केले आहे त्याचप्रमाणे पाच किलो साखर ही मोफत देणार नियोजन देखील केले आहे. यंदाची दिवाळी सर्व सभासद व कामगारांना गोड होण्याच्या उद्देशाने साखर वाटपाचे नियोजन केले आहे. भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना दहा किलो साखर मोफत देण्याचे जाहीर केले आहे. .     भीमा सहकारी साखर कारखान्यांच्या सभासदांसाठी साखर वाटपाची वेळापत्रक दोन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर 2026 या कालावधीमध्ये संबंधित गट ऑफिसवर सभासदांना साखरेची वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज धनंजय महाडिक यांनी दिली.

" उजनीच्या साचलेल्या गाळामध्ये डेटा सेंटर उभा राहणार का "?..... . जनतेचा संताप सवाल

इमेज
 पंढरपूर........ .    स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी उजनी धरणाची उभारणी केली महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळखले जाणारे हे उजनी धरण या उजनी धरणाच्या पाण्यावर कित्येक तालुके आणि जिल्हे हे सुजलाम सुफलाम झाले आणि शेतकरी राजाच्या घरामध्ये सुख-समृद्धी आणण्याचे काम या उजनी धरणाच्या पाण्याने केले. .   उजनी धरणाच्या स्थापनेपासून आजपर्यंत गेली कित्येक वर्ष या उजनी धरणामध्ये साचलेला गाळ हा काढण्यात आलेला नाही नुकतेच सर्वेक्षण झाले या सर्वेक्षणामध्ये 68% गाळ या उजनी धरणामध्ये असल्याचे नमूद करण्यात आले . जर 68% गाळ या उजनी धरणात असेल तर या धरणामध्ये पावसाचे पाणी कसे साचणार हा सरळ साधा प्रश्न सर्वसामान्य जनता व शेतकरी विचारत आहे. .      महाराष्ट्र शासनाने व सोलापूर व पुणे जिल्ह्यातील मान्यवर नेते मंडळींनी या उजनी धरणातील साचलेल्या गाळाविषयी आवाज यापूर्वीच उठवायला हवा होता. माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील व मोहिते बंधू यांनी गेली काही वर्ष उजनी धरणातील गाळ काढण्याविषयी सातत्याने शासनाकडे मागणी केली परंत...

" मतदानाची औपचारिकता बाकी" . दत्तात्रय सावंत यांचा विजय निश्चित

इमेज
 पंढरपूर........ .    2014 च्या पुणे शिक्षक मतदार संघातील निवडणुकीच्या पूर्वीपासून पुणे जिल्ह्यातील पाचही जिल्ह्यामधून शिक्षक मतदार संघामधून प्रत्येक शिक्षक व संस्थाचालकांची  भेट घेत आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या पाचही जिल्ह्यातील प्रचार फेरी मध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उत्साहाने पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे. .    पुणे शिक्षक मतदार संघातील कोल्हापूर सांगली सातारा पुणे सोलापूर या जिल्ह्यामधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व संस्थाचालक हे दत्तात्रय सावंत यांना परिचित आहेत त्याचप्रमाणे त्यांनी आजपर्यंत केलेल्या शिक्षकांच्या कल्याणासाठी व त्यांच्या अनेक समस्या अडचणी सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची जाणीव या शिक्षक वर्गाला असल्यामुळे गत पुणे शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा करण्यासाठी हे पाचही जिल्ह्यातील शिक्षक आतुर झाल्याचे दिसून येत आहेत. .    रासपाचे उमेदवार दत्तात्रय सावंत हे संपूर्णपणे शिक्षक मतदार संघामध्ये आपल्या प्रचार दौरा मध्ये अतिशय साध्या पद्धतीने कुठलाही लवाजमा न बाळगता प्रत्...

"भाजपाच्या पसंतीला उतरलेले कौस्तुभ गावडे शिक्षक मतदाराच्या पसंतीला उतरणार".... . पुणे शिक्षक मतदार संघ निवडणूक

इमेज
 पंढरपूर......... .       पुणे शिक्षक मतदार संघातील यंदाची निवडणूक बहुरंगी आणि बहुरंगी अशी तिरंगी लढत पहावयास मिळत आहे. भाजपाच्या कित्येक निष्ठावंत शिक्षक कार्यकर्त्याला या निवडणुकीला आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून असंख्य कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले परंतु उमेदवारीची माळ कोल्हापूर जिल्ह्यातील कौस्तुभ गावडे यांच्या गळ्यात पडली. .    कौस्तुभ गावडे भाजपाचे कार्यकर्ते असून ते स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये संचालक आहेत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विविध जिल्ह्यांमध्ये असंख्य शाळा कॉलेजेस असून या शाळा कॉलेजेस मधील शिक्षक मतदारांनी पाठिंबा आणि मतदान मिळण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता असल्यामुळे कौस्तुभ गावडे या संधीचा लाभ कितपत उठवता येणार हे पाहावे लागेल. .    खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांचा पाठिंबा त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचे मंत्री महोदय चंद्रकांत दादा पाटील यांचा पाठिंबा व मार्गदर्शन आणि असंख्य शिक्षक मतदारांचा पाठिंबा कौस्तुभ गावडे यांना असल्यामुळे विजयाची लाभणार की काय असे चित्र सद्यस्थितीला दिसून येत आहे. .   कोल्ह...

" युवराज भोसले युवकांचे नेतृत्व करणार "...... . पंढरपूर युवक शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अध्यक्षपदी निवड......

इमेज
 पंढरपूर......... .      पंढरपूर शहरातील युवकांचे व विद्यार्थ्यांचे प्रश्न अडीअडचणी समस्या सोडवण्यासाठी सतत तत्पर असलेले संघटन कौशल्य त्याचप्रमाणे निर्भीडपणे युवकांचे प्रश्नाला समस्यांना वाचा फोडणारे युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे युवराज भोसले यांची आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाच्या पंढरपूर शहरातील युवक शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली.त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव पंढरपूर शहरातील सर्व स्तरातून होत आहे. .    गेली कित्येक वर्ष पंढरपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे युवराज सुधीर भाऊ भोसले यांची पंढरपूर शहर युवक शहराध्यक्षपदी निवड झाल्याने एका निष्ठावंत कार्यकर्त्याला विद्यार्थ्यांचे व युवकांचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. .    पंढरपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर  आपले मनोगत व्यक्त करीत असताना युवराज भोसले म्हणाले, "पंढरपूर शहरातील युवक युवती तसेच विद्यार्थी विद्यार्थिनींचे समस्या अडीअडचणी बाबत शासन दरबारी आवाज उठवण्यात मी कमी पडणार नाही....

" पंढरपूर पाण्याचे नव्हे तर दुष्काळाचे" . पाण्याची काटकसर आतापासूनच सुरू करा..... . पंढरपूर नगरपालिकेचे आव्हान

इमेज
 पंढरपूर........ .    सांगोला सोन्याचं, मंगळवेढा धान्याचे आणि पंढरपूर पाण्याच अशी ओळख सोलापूर जिल्ह्यातील या तीन तालुक्याची केली जाते. परंतु यंदाचे वर्ष सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाल्यामुळे या जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यांमध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागल्याचे चित्र आतापासून स्पष्ट होऊ लागले आहे. .     पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथे येणाऱ्या लाखोच्या संख्येने भाविकांची चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्याची मनोभावना असते यंदा पावसाच्या प्रमाण घटल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती ही निर्माण होऊ लागलेली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता पंढरपूर नगरपालिकेने पंढरपूर रहिवाशांना पाण्याची बचत करण्यासाठी व पाण्याची काटकसर करण्यासाठी पाण्याचा योग्य तो वापर करा असे आवाहन करण्यात आले आहे. .    पंढरपूर शहरवासीयांना दररोज पिण्याच्या पाण्याचे पुरवठा केला जातो. पंढरपूर शहरांमधील असंख्य ठिकाणी पाण्याचा अपव्यय होत असल्याचे सर्वत्र दिसून येते. पाण्याची नासाडी त्याचप्रमाणे गाडी धुणे, जनावरे धुणे आणि कित्येक नळांना तोटी नसल्यामुळे पाणी वाहून जाते असे अनेक ठ...