पोस्ट्स

" रायबा हेच का? आपले स्वराज्य " या महानाट्याचा कार्यक्रम पंढरपूर शहरात...

इमेज
 पंढरपूर (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव च्या निमित्ताने पंढरपूर शहरातील सुप्रसिद्ध कर्नल भोसले चौक या ठिकाणी माननीय नागेश काका भोसले मित्र मंडळ यांच्या वतीने रायबा हेच का आपले स्वराज्य या महानाट्याचा प्रयोग शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी 2020 रोजी होणार असून तमाम शिवप्रेमी यांनी या महानाट्याचा त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील विविध प्रसंग पराक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आणि दूरदृष्टी या सर्वांगीण गुणांचा अविष्कार पाहण्याचा पंढरपूर शहरवासीयांना लाभ होणार आहे तरी पंढरपूर शहरातील आबाल वृद्ध करून तरुणी माता-भगिनी यांनी या महानाट्य पाहण्यास आवर्जून उपस्थिती दर्शवावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील हे महानाट्य पाहण्याचा लाभ घ्यावा.       असे कर्नल भोसले चौक शिव जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष व अन्य पदाधिकारी व सभासद यांनी माहिती दिली तरी हे महानाट्य पाहण्यास अवश्य यावे असे आवाहन करण्यात आले.

" मराठी पाऊल पडते पुढे"या कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि चरित्र पोवाडे यांच्या माध्यमातून व्यक्त केले "..

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्ताने पंढरपूर शहरातील संत पेठ परिसरातील प्रभाग क्रमांक 16 नगरसेविका माधुरी दिलीप धोत्रे आणि मनसेचे सोलापूर जिल्ह्याचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या अथक प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र त्यांचे कार्य व विचार हे मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंढरपूर शहरातील बाल ,वयोवृद्ध तरुण तरुणींना एक प्रेरणादायी कार्यक्रम पाहण्याचा योग मनसेनेचे दिलीप बापू धोत्रे यांनी आणून दिला आहे.      छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या जीवनामधील विविध पराक्रम महाराजांची रणनिती,गणिमी कावा,स्वराज्याच्या स्थापने साठी केलेलें प्रयत्न आणि महाराजांनी  अठरापगड गोरगरीब क ष्टकरी शेतकरी माता भगिनी यांच्या साठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाने जीवन जगण्याचा दिलेला मुलमंत्र आणि स्वराज्य रक्षणासाठी आणि त्याच्या वाढीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले कार्य त्याचप्रमाणे महिलांच्यासाठी त्यांच्या रक्षणासाठी केलेले कार्य हे जगभरातील इतिहासामध्ये न...

" मोडनिंब जिल्हा परिषद गटामधून सौ वंदना शिवाजी कांबळे यांनी रचला इतिहास"..... सहा हजार मताधिक्याने विजयी.....

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) सोलापूर जिल्हा परिषद चे माजी सदस्य आणि समाज कल्याण चे सभापती शिवाजीराव नाना कांबळे यांच्या सहचारिणी सौ वंदना शिवाजी कांबळे यांनी यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या मध्ये 6000 च्या पुढील मताधिक्याने विजय मिळवून या मोडनिंब गटामधील निवडणुकीमध्ये एक प्रकारे इतिहास रचला.        मोडनिंब गटामधील नेते जिल्हा परिषद चे माजी सदस्य व समाज कल्याण चे माजी सभापती यांच्या कार्याच्या माध्यमातून या परिसरामध्ये असंख्य विकासकामे केल्यामुळे आणि सतत जनकल्याणाचा व ग्राम विकास कार्याचा ध्यास घेतलेले व्यक्तिमत्व म्हणजे शिवाजी नाना कांबळे यांच्या कार्याचा वारसा पुढे चालू ठेवण्याच्या उद्देशाने त्यांच्या पत्नी सौ वंदना शिवाजी कांबळे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपाकडून उमेदवारी जाहीर करून  त्यांनी  या मोडलिंब गटामधून प्रचंड मताधिक्य मिळवून विजयी झाले आहेत.       सौ वंदना शिवाजी कांबळे यांच्यावर संपूर्ण सोलापूर जिल्ह्या मधून अभिनंदन वर्षाव होत आहे.

" दीपक आबा चंदनशिवे जि.प.निवडणुकीत बाजी मारणार" कामाचा माणुस म्हणून ओळख.....

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) कित्येक वर्ष लांबणीला पडलेली जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निवडणूक ही आता 2026 मध्ये निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीमध्ये असंख्य मंडळी कार्यकर्ते व नेतेमंडळी गाव भेटीचे दौरे आणि वाड्या वस्तीवरच्या फेऱ्या आता सुरू झालेले आहेत.       पंढरपूर तालुक्यातील विविध गटामधून जिल्हा परिषद च्या निवडणुका व पंचायत समितीच्या निवडणुका या लागलेल्या आहेत. या पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी या गटातून जिल्हा परिषद च्या निवडणुकीसाठी विविध पक्षाचे नेते मंडळी उमेदवार हे निवडणुकीस आपले नशीब आजमावत आहेत.      लक्ष्मी टाकळी या गटामधून व गणा मधून जिल्हा परिषद साठी शिवसेना एकनाथ शिंदे यांचे पक्षाचे उमेदवार म्हणून दीपक आपा चंदनशिवे हे शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन उभे राहिलेले आहेत. त्याचप्रमाणे नंदकुमार वाघमारे हे भाजपा पक्षाच्या वतीने कमळ चिन्ह हाती घेऊन उभे राहिले आहेत आणि भगीरथ भालके यांच्या किर्थविकास आघाडीचे तानाजी कांबळे हे ऑटो रिक्षा हे चिन्ह घेऊन निवडणुकीस उभे राहिले आहे.       या टाकळी गटातील सातत्याने सक्रिय असलेले व्...

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) सोलापूर मंगळवेढा या मार्गावर धावणारी एसटी महामंडळाची बस क्रमांक९४०५ या बसमधून शालेय विद्यार्थी प्रथमेश पाटील राहणार ब्रह्मपुरी तालुका मंगळवेढा या ठिकाणी रहिवासी असलेला हा विद्यार्थी दररोज मंगळवेढा या ठिकाणी शाळेला येत असतो. या शालेय विद्यार्थ्यांच्या आजच्या दिवशी पास घरी विसरल्यामुळे तो सोलापूर मंगळवेढा या बस मध्ये बसल्यानंतर वाहकांनी त्याला पासची विचाणा केले असता त्या विद्यार्थ्यांनी मी नेहमीच या बसने येत जा करत असतो परंतु आज माझा चुकून पास घरी विसरलेला आहे. तरी तुम्ही माझ्या वडिलांना फोन करून सांगा आणि एसटीचे पैसे मोबाईलवर मागून घ्या माझ्याजवळ पैसे नाही. असे सांगितल्यानंतर देखील एसटी महामंडळाच्या वाहकाने या प्रथमेश पाटील या विद्यार्थ्याला भर हायवेच्या रस्त्यावर अनोळखी या ठिकाणी त्याला खाली उतरवण्यात आले.       अशा निर्दयी एसटी बस वाहकाला कठोरातील कठोर शिक्षा मिळावी. अशी मागणी पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या तक्रारीमध्ये उल्लेख करून त्यांनी एसटी महामंडळ सर्व व्यवस्थापकाला पत्र दिले आहे. या एसटी बस वाहकाला त्वरि...

" सुर्यनारायण देव यात्रा नारायण चिंचोली येथे उत्सवात सुरू" .... सरपंच सौ नर्मदा लक्ष्मण धनवडे

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी)नारायण चिंचोली येथील सूर्यनारायण देव यात्रा मोठ्या उत्साहात सुरू  पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे सूर्यनारायण देव यात्रा मोठ्या उत्साहात सुरू झाली असून ही यात्रा पौष शुद्ध प्रतिपदा ते माघ प्रतिपदा म्हणजे रथसप्तमी पर्यंत जवळपास महिनाभर चालते. अशी माहिती पुजारी गणेश अवताडे यांनी दिली.  तीर्थक्षेत्र पंढरपूर पासून अवघ्या दहा किलोमीटरवर असणाऱ्या पंढरपूर मोहोळ रोडवर नारायण चिंचोली येथे महाराष्ट्रातील एकमेव असे पुरातन हेमाडपंती सूर्यनारायण देव मंदिर असून या मंदिराचे बांधकाम अत्यंत कोरीव असे दुर्मिळ आहे. मंदिरात दगडी बांधकाम असून सूर्यनारायणाची मंदिरातील मूर्ती महादेवाच्या पिंडीच्या आकारासारख्या दगडावरती अखंड साडेपाच फुटी मूर्ती आहे. या मूर्ती वरती विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत. श्री ची मूर्ती पूर्वाभिमुख असून मूर्ती वरती सूर्याची उगवती किरणे पडतात. या देवाची यात्रा संपूर्ण महिनाभर चालते व विशेष महिन्यातील प्रत्येक रविवारी धार्मिक कार्यक्रमाचे म्हणजे भजन ,कीर्तन, भारुड अधिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. अशी माहिती सूर्यनारायण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष...

" प्रभागात प्रसंग असेल बाका तर बोलवा नागेश काका"

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर नगरपालिका निवडणूक 2025 या निवडणुकीमध्ये सध्या पंढरपूर शहरांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू असून शहरात थंडीचा जोर वाढत असतानाच निवडणूक आणि प्रचारामुळे संपूर्ण शहरात गरम वातावरण पंढरपूर निवासी अनुभवू लागले आहेत.        पंढरपूर शहरातील उपनगर म्हणून ओळखले जाणारे लिंक रोड नागालँड परिसर या प्रभाग क्रमांक 13 मधील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार नागेश काका भोसले यांच्यासोबत तीर्थक्षेत्र विकासासाठीच्या महिला उमेदवार रुक्मिणी धनाजी धोत्रे या महिला उमेदवार या प्रभागामध्ये निवडणुकीस उभे असून या प्रभागांमध्ये गत पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नागेश काका  हे या प्रभागामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते . या प्रभागामध्ये त्यांनी त्यावेळी निवडणूक लढवण्या पूर्वीच या भागामध्ये नागेश काका भोसले यांनी रस्ते व त्याचप्रमाणे या प्रभागामधील मूलभूत सुख सुविधा नागेश काकांनी उपलब्ध करून दिल्या होत्या. परंतु काही कारणास्तव त्यांनी उमेदवारी मागे घेऊन नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये सौ साधनाताई नागेश भोसले यांना उमेदवारी मिळाल्यामुळे त्यांनी या ठिक...