" दीपक आबा चंदनशिवे जि.प.निवडणुकीत बाजी मारणार" कामाचा माणुस म्हणून ओळख.....


 पंढरपूर ( प्रतिनिधी) कित्येक वर्ष लांबणीला पडलेली जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निवडणूक ही आता 2026 मध्ये निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीमध्ये असंख्य मंडळी कार्यकर्ते व नेतेमंडळी गाव भेटीचे दौरे आणि वाड्या वस्तीवरच्या फेऱ्या आता सुरू झालेले आहेत. 

     पंढरपूर तालुक्यातील विविध गटामधून जिल्हा परिषद च्या निवडणुका व पंचायत समितीच्या निवडणुका या लागलेल्या आहेत. या पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी या गटातून जिल्हा परिषद च्या निवडणुकीसाठी विविध पक्षाचे नेते मंडळी उमेदवार हे निवडणुकीस आपले नशीब आजमावत आहेत. 

    लक्ष्मी टाकळी या गटामधून व गणा मधून जिल्हा परिषद साठी शिवसेना एकनाथ शिंदे यांचे पक्षाचे उमेदवार म्हणून दीपक आपा चंदनशिवे हे शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन उभे राहिलेले आहेत. त्याचप्रमाणे नंदकुमार वाघमारे हे भाजपा पक्षाच्या वतीने कमळ चिन्ह हाती घेऊन उभे राहिले आहेत आणि भगीरथ भालके यांच्या किर्थविकास आघाडीचे तानाजी कांबळे हे ऑटो रिक्षा हे चिन्ह घेऊन निवडणुकीस उभे राहिले आहे. 

     या टाकळी गटातील सातत्याने सक्रिय असलेले व्यक्तिमत्व म्हणजे दीपक आबा चंदनशिवे हे गेली कित्येक वर्षापासून समाजसेवेच्या माध्यमातून तसेच सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांना शासनाच्या विविध योजना या लाभदायक कसे आहेत व त्या मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे दीपक आबा चंदनशिवे हे केल्या कित्येक वर्षापासून जनसेवेसाठी सक्रिय असल्याचे दिसून येते. 

    दीपक आबा चंदनशिवे यांनी ग्रामीण भागातील अशिक्षित तसेच वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी त्यांनी शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. विविध गावांमधील सर्वसामान्य शेतकरी, दीन दलितांचे तसेच सामान्य कुटुंबातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी ते पंढरपूर येथील शासकीय कार्यालय सुरू होण्याच्या अगोदर ते पंढरपूर शहरांमध्ये दाखल झालेले असतात. आणि सर्वसामान्य जनतेची अडकलेली, रेंगाळलेली अशी कामे ते कायमस्वरूपी करत असतात. त्यांच्या या कामाचा झपाटा आणि सतत हसतमुखाने कार्यकर्ते व सर्वसामान्य जनतेशी त्यांचे वागणे व बोलणे हे पाहताच त्यांच्याकडे कामाच्या निमित्त येणारी व्यक्ती आपले काम होणारच या भावनेने आपली सर्व शासकीय कामे,अडचणी, समस्या हे दीपक आबा चंदनशिवे यांना ते नागरिक सांगतात. सर्वसामान्यांची कामे झाल्यानंतर त्रिंबक आबा चंदनशिवे त्या व्यक्तीला आवर्जून फोन करून सांगतात की तुमचे काम झालेले आहे. असे सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्याचप्रमाणे विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आणि लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे दीपक आबा चंदनशिवे यंदा जिल्हा परिषद च्या निवडणुकीसाठी उभे आहेत. त्यांची कार्यशैली पाहता ती यंदा जिल्हा परिषद च्या निवडणुकीमधून लक्ष्मी टाकळी या गटामधून निवडणुकीमध्ये विजय मिळवणार हेच सद्यस्थितीला दिसून येत आहे. 

     शिवसेना शिंदे गट या पक्षाच्या वतीने दीपक आबा चंदनशिवे हे धनुष्यबाण चिन्ह घेऊन निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्यासोबत टाकळी येथील शिवसेनेचे नेते महेश साठे यांच्या पत्नी रोहिणी महेश साठे यादेखील पंचायत समिती साठी उमेदवार असून हे दोन्हीही उमेदवार सर्वसामान्य जनतेसाठी झटणारे असे नेतेमंडळी असून महेश साठे यांच्या कार्याचा लाभ दीपक आबा चंदनशिवे यांना होणार आहे. तसेच दीपक आबा चंदनशिवे यांच्या कार्याचा व लोक संपर्काचा लाभ रोहिणी महेश साठे यांना होणार आहे. त्यामुळे या लक्ष्मी टाकळी गटामधून दीपक आबा चंदनशिवे व रोहिणी महेश साठे हे या निवडणुकीमध्ये बाजी मारणार असेच या गटामधून बोलले जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"फक्त वारी पुरती अतिक्रमण हटाव मोहीम की कायमस्वरूपी मोहीम "...

"दि.पंढरपूर मर्चंट को .ऑप.बॅंक लि.पंढरपूर टेंभुर्णी शाखेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन "..ह.भ.प.प्रभाकर दादा बोधले यांच्या शुभहस्ते संपन्न....

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "