आमदार अभिजीत आबा पाटील यांनी "सोलापूर जिल्ह्यातील माथाडी कामगारांच्या प्रलंबित हमाली व लेव्ही च्या प्रश्नांसाठी आवाज उठवला"


 पंढरपूर ( प्रतिनिधी) . सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याचे आमदार अभिजीत आबा पाटील हे विधानसभेमध्ये सातत्याने जनतेचे प्रश्न मांडत आहेत मग ते प्रश्न शेतकऱ्यांच्या बाबतीतले असो किंवा माथाडी कामगारांचे असो किंवा पर्यटनाच्या संदर्भातील असो ,विकास कामाच्या बाबतीतील असो असंख्य प्रश्न अभिजीत आबा पाटील यांनी विधान भवनामध्ये लक्षवेधी च्या माध्यमातून प्रश्न मांडलेले आहेत व त्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर देखील त्यांनी मिळवलेले आहे ‌

    सध्या पावसाळी अधिवेशन हे सुरू असून या अधिवेशनामध्ये माथाडी कामगार हे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये कार्यरत आहेत सोलापूर जिल्ह्यातील माथाडा माथाडी कामगारांचे हमाली व लिवीचे प्रलंबित असलेल्या वेतनाच्या संदर्भात त्यांनी आवाज उठवला 2019 पासून ते 2025 पर्यंत हा माथाडी कामगारांचा हमाली व लेव्हीचा वेतनाचा प्रश्न प्रलंबित होता‌. दर महिन्याच्या पाच तारखेस ही रक्कम जमा होत असते परंतु 2019 पासून ते 2025 पर्यंत ही रक्कम जमा होत नाही असे निर्देशनास आणून दिले.आणि त्याविषयी लक्षवेधी सूचनेच्या वेळी त्यांनी हा प्रश्न सभागृहात मांडला.

    आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्रिमहोदय फुंडकर यांनी माथाडी कामगारांचा हा प्रश्न प्रलंबित असून तो लवकरात लवकर सोडवण्यात येईल त्यासाठी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या सोबत बैठक बसवून तो प्रश्न सोडवण्यात येईल असे उत्तर दिले ‌

     अभिजीत आबा यांनी जनहिताचे प्रश्न तसेच लोकहिताचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या शेती माला बाबतचे प्रश्न, पर्यटन विषय असलेले प्रश्न ,तसेच विकास कामाच्यासाठी निधीच्या मागणीच्या बाबतीतील प्रश्न असे असंख्य प्रश्न ते आमदार झाल्यापासून सातत्याने विधानसभेमध्ये मांडत आहे. माढा तालुक्याला सक्रिय असा आमदार मिळाल्याचे समाधान माढा तालुक्यातून व्यक्त होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....