" हुकूमत तीस साल की तीन महिनोंमे पलट दी शहेनशहा समझने वालोंकी नींद उडा दी" ... आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम
पंढरपूर ( प्रतिनिधी ) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माढा तालुक्याचे आमदार अभिजीत आबा पाटील या युवा नेतृत्वाने माढा तालुक्यातील तीस वर्षाची हुकूमत मक्तेदारी मोजक्या तीन महिन्यात पलटून टाकली.अशा युवा आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक 1ऑगस्ट रोजी माढा तालुका तसेच पंढरपूर तालुक्यामधून विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले जाणार आहेत. आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माढा या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे. याचा लाभ संपूर्ण माढा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्य जनता, वयोवृद्ध त्याचप्रमाणे महिला व लहान मुला मुलींची आरोग्य तपासणी व विविध रोगावर उपचार केले जाणार आहे. यासाठी पुणे व सोलापूर जिल्ह्यातील अनेक मान्यवर डॉक्टर हे उपस्थित राहणार आहेत. व रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत.
आमदार अभिजीत आबा पाटील मित्र परिवाराच्या वतीने आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने असंख्य समाज उपयोगी उपक्रम राबवले जाणार आहेत.अशी माहिती आमदार अभिजीत आबा पाटील मित्र मंडळ यांनी दिली. आमदार अभिजीत आबा पाटील यांना संपूर्ण महाराष्ट्रभरातून व तसेच सोलापूर जिल्ह्यातून वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात येत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा