" बोलो. बोलो. कुछ तो बोलो कॅरिडाॅर का राज तो खोलो".... पंढरपूरकरांची मागणी.


 पंढरपूर ( प्रतिनिधी) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही आषाढी यात्रेनिमित्त महापूजेला येऊन गेले त्यानंतर लगेचच आज रोजी संत नामदेव महाराज यांच्या 675 व्या संजीवन समाधी कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी यात्रेनिमित्त आल्यानंतर आपल्या मुलाखतीमध्ये त्यांनी पंढरपूर शहरांमध्ये वारकरी भाविक भक्त व तसेच रहिवासी यांना सर्व सोयी सुविधा सुलभ व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने काशी आणि उज्जैन या शहराच्या धर्तीवर पंढरपूर शहरांमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या परिसरामध्ये संकल्पना ते राबवणार आहेत. स्थानिक दुकानदार व रहिवासी यांनी वेगवेगळ्या पद्धतीने विरुद्ध दर्शवलेला आहे. परंतु भाविक भक्त वारकरी यांची पंढरपूर या ठिकाणी लाखोच्या संख्येने होणारी येजा पाहता कॅरिडॉर व मोठे रस्ते आणि वारकरी भाविक भक्तांना सोयी सुविधा या उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाणारा हा कॅरिडॉर बहु चर्चित राहिलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी यात्रेच्या वेळी देखील त्यांनी आपले मनोगत स्पष्ट केले होते. कोणत्याही दुकानदाराचे व रहिवाशांचे नुकसान होऊ देणार नाही. त्यांना पर्यायी जागा व व्यापारी संकुल उपलब्ध करून देणार आहे. योग्य तो मोबदला तिला जाणार आहे. अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. 

    चार दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी व तसेच भूसंपादन व पुनर्वसन अधिकारी यांची बैठक बोलावून त्यांनी  बाबत चर्चा केलेली आहे. त्यानुसार 25 जुलै 26 27 जुलै या रोजी जिल्हाधिकारी व अन्य उपजिल्हाधिकारी हे बाधितांशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढणार आहे. अशी माहिती मिळते. पंढरपूर शहरांमधील मंदिर परिसरात भागातील दुकानदार रहिवासी व पंढरपूर शहरातील स्थानिक नागरिक व वारकरी भाविक भक्त यांना या कॅरिडाॅरचा आराखडा अद्यापही कसा असेल तो सांगितला गेलेला नाही. किंवा तो कॅरिडॉर चा नकाशा आराखडा हा असाच असणार आहे अशी माहिती देखील कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली नाही. फक्त कॅरीडोर होणार एवढीच माहिती दिली जाते. त्यामुळे बाधित मालमत्ता धारक रहिवासी दुकानदार हे संभ्रमा अवस्थेत आहेत. 

     आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूर शहरांमध्ये होऊ पाहणाऱ्या कॅरिडॉर बाबत काय बोलतात? काय भूमिका घेतात?  याकडे संपूर्ण पंढरपूर वाशी यांचे लक्ष लागलेले आहे. पंढरपूरवासी आता बोलू लागले आहेत."बोलो कुछ तो बोलो कॅरिडाॅर का राज खोलो" अशी मागणी पंढरपूर वासी करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....