"माढा तालुक्यातील सर्व पाझर तलाव भरण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडले " आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नाला यश


 पंढरपूर,( प्रतिनिधी ) धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती माढा तालुक्या तील शेतकऱ्यांची होत होती परंतु आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नाला आज यश आले. माढा तालुक्यातील सर्व पाझर तलाव भरून घेण्यासाठी सीना माढा उपसा सिंचन योजनेतून आज सकाळी पाण्याचे पूजन करून सोडण्यात आले. आमदार अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे हे सर्व शक्य झाले. या निर्णयामुळे माढा तालुक्यातील शेतीला मोठा दिलासा  मिळणार असून येत्या काळामध्ये कृषी उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

    माढा तालुक्यातील पाणी प्रश्नासाठी आमदार अभिजीत पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या सोबत सतत बैठका घेऊन माढा तालुक्यातील सर्व पाझर तलाव भरण्यासाठी  प्रयत्न केले. ही माढा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे .टेल टू हेड पाणीपुरवठा पूर्ण होईल त्यामुळे माढा तालुक्यातील सर्व पाझर तलाव हे भरून निघतील. असे आमदार अभिजीत पाटील यांनी आज रोजी सांगितले.

      यावेळी जिल्हा परिषद सदस्य भारत आबा शिंदे ज्येष्ठ नेते भारत नाना पाटील युवक जिल्हाध्यक्ष सुरज देशमुख युवती जिल्हाध्यक्ष विनंती कुलकर्णी बँकेचे चेअरमन औदुंबर महाडिक रामकृष्ण काळे सुरेश पाटील बाळासाहेब ढेकणे हरिभाऊ माने आकाश पाटील दीपक खोचरे धाराशिव कारखान्याचे संचालक संदीप खारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

    गेली कित्येक वर्ष या योजनेसाठी शेतकऱ्यांचा ऊस बिलातून रणजीत शिंदे यांनी पैसे घेतले आहेत 81 टक्के शासनाने व 19 टक्के शेतकऱ्याने भरण्याची असताना देखील शेतकऱ्याकडून पूर्णपणे पैसे वसूल करण्यात आले या पैशाचा हिशोब रणजीत शिंदे यांनी द्यावा. आमदार अभिजीत पाटील यांच्यावर शिंदे यांनी नुकतेच केलेली टीका ही दिशाभूल करणारी असून शिंदे यांनी आपली कुवत त्यांनी स्वतः तपासून पहावी या शब्दात जिल्हा परिषद सदस्य बार्शी शिंदे यांनी खोचक टीका केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....