मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस "महाराष्ट्र सेवकाचा वाढदिवस" हा खऱ्या अर्थाने साजरा होत आहे...... आमदार समाधान दादा अवताडे.
पंढरपूर ( प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तुळशीपूजन व नामदेव पायरी येथे महाआरती व मतदार संघात रक्तदान शिबिर आणि वृक्ष लागवड व संवर्धनाच्या संकल्पाने उत्साहात साजरा होत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने कुठलीही जाहिरात होर्डिंग व मनोरंजनाच्या कार्यक्रमावर अनावश्यक खर्च न करता संपूर्ण पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात आमदार श्री समाधान आवताडे यांच्या माध्यमातून महा रक्तदान शिबिर तसेच55, 555 झाडांचे वृक्षरोपण व संवर्धन असे व यासारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण मतदारसंघात व राज्यात ही महाराष्ट्र सेवकाचा वाढदिवस हा खऱ्या अर्थाने सेवाभाव व समर्पित कार्यातून साजरा होत आहे. हीच नेतृत्वाची खरी ओळख आहे. असे प्रतिपादन आमदार समाधान आवताडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
यावेळी उपस्थित श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष औसेकर महाराज व अन्य समिती सदस्य, विनोद लटके आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा