पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"आमदार समाधान आवताडे यांना मंत्री पद मिळावे"........

इमेज
 पंढरपूर प्रतिनिधी...... पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघामधून सलग दुसरे वेळी आपल्या कार्याच्या जोरावर त्यांनी या मतदारसंघामधून विजय मिळवत आपण या मतदार संघातील योग्य प्रतिनिधी असल्याचे सिद्ध केले आहे.     पंढरपूर मंगळवेढा मतदार संघामध्ये हजारो कोटींचा विकास निधी आणून विकास कामाना गती देण्याचे काम केले आहे.मंगळवेढा तालुक्यातील कित्येक गावाला पिण्याचे पाणी तसेच शेतीला मुबलक पाण्याची सोय म्हणून आवताडे यांनी मंगळवेढा उपसा सिंचन, आणि तामदर्डी बंधारा अशा प्रकारे त्यांनी या भागातील पाणीप्रश्न मिटवण्याचे प्रयत्न करुन ते मार्गी लावले  आहे.     पंढरपूर शहरातील विकास कामे, मराठा भवन आणि मतदार संघात असंख्य ठिकाणी समाज मंदीर, संविधान भवन, व्यायाम शाळा उभारणी, ग्रामीण भागातील रस्ते, आदी असंख्य कामे त्यांनी आपल्या आमदारकीच्या चार वर्षीच्या कारकिर्दीत पूर्ण केली आहेत.     एक सुशिक्षित उच्चविद्या धारण करणारे हे युवा नेतृत्व या मतदार संघाला लाभले आहे. आज पर्यंत या मतदार संघाला कोणतेही मोठे पद लाभलेले नाही. आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या अभ्यासूपणाने त्यांनी मह...

"समाधान आवताडे यांनी विजयाची परंपरा राखली"...

इमेज
 पंढरपूर प्रतिनिधी....  पंढरपूर मंगळवेढा विधानसभा 2024 च्या निवडणुकीमध्ये चुरशीची झालेली ही निवडणूक या निवडणुकीमध्ये आमदार समाधान आवताडे यांनी पुन्हा एकदा विजय प्राप्त करत ही विजयाची परंपरा राखली.      आज पर्यंत पंढरपूर तालुक्यामधून जेष्ठ माजी आमदार होऊन गेले. त्या पेकी कै. औदुंबर आण्णा पाटील हे सलग दोन तीन वेळा निवडून आले. त्यानंतर कै. सुधाकरपंत परिचारक हे देखील सलग तीन चार वेळा निवडून आले. पांडुरंग टिंगरे यांचा अपवाद वगळता कै. भारत नाना भालके यांनी देखील विजयाची सत्यता राखत त्यांनी तीन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. ही परंपरा राखण्याची काम आज आमदार समाधान दादा अवताडे यांनी  केल्याचे दिसून येत आहे.      आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या चार वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी प्रचंड असे विकास कामे खेचून आणलेले आहेत आणि या विकास कामाला गती देण्याचे काम देखील त्यांनी केलेले आहे तीन हजार कोटी रुपयांचे कामे त्यांनी आपल्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये आणून सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत सुविधा सुख सुविधा त्याचप्रमाणे दोन्ही तालुक्याचा विकास ...

अभिजित आबानी तीस वर्षाची राजकीय मक्तेदारी संपुष्टात आणली......

इमेज
 पंढरपूर प्रतिनिधी..... माढा विधानसभा मतदार संघामधून 2024 निवडणुकीमध्ये अभिजीत आबा पाटील यांनी तीस हजार 204 मतदान मिळवून विजय प्राप्त केला.      माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये बबनदादा शिंदे यांची गेली 30 वर्षापासून असलेली राजकीय मक्तेदारी आज रोजी संपुष्टात आली. बबन दादा माढा विधानसभा मधून त्यांनी केलेल्या विकास कामाची ही सर्वसामान्य जनतेला नीट समजावून सांगू शकले नाही. राजकारणामध्ये जनसंपर्क हा कायमस्वरूपी राजकीय नेत्यांनी ठेवायला हवा होता तो जनसंपर्क बबन दादा शिंदे यांनी न ठेवण्याचे दिसून येते.     माढा तालुक्यामधून विविध विकास कामे त्याचप्रमाणे प्रचार यंत्रणा राबवण्यात देखील कमी पडल्याचे दिसून आले. अभिजीत आबा पाटील यांनी उसाचा दर जाहीर करून आणि काटा हा शेतकऱ्यांनी करून आणायचा त्याप्रमाणे बिल देण्यात येईल असे जाहीर करताच यांनी अभिजीत पाटील हे या माढा विधानसभेला निवडून येणार हे संकेत त्याच वेळी मिळाले होते. संपूर्ण काया पलट करण्याचा अभिजीत आबा पाटील यांनी केलेली घोषणा  याला सर्वसामान्य जनतेने दिलेला मतदान रुपी दुजोरा  हेच या निवडणुकीच्या निकालांमधून...

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....

इमेज
 पंढरपूर प्रतिनिधी...... पंढरपूर मंगळवेढा विधानसभा च्या निवडणूकी च्या रणधुमाळी काग्रेस,भाजपा, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रस्तापित राजकीय पक्षाच्या ओढाचढीच्या स्पर्धेत महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष हा आपल्या पारंपारिक मतदार आणि एकगठ्ठा मतदान म्हणून ओळखला जाणारा मतदार यांच्या पाठींबा वर या पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात भाजपा, व अन्य राजकिय पक्षाना डोकेदुखी ठरणार असल्याचे चित्र सध्या या मतदार संघात दिसून येत आहे.     महादेव जानकराना संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या बेधडक, सडेतोड भूमिकेमुळे ओळखला जातो. याच रासपा पक्षाच्या वतीने पंकज देवकते या उमद्या, प्रामाणिक आणि सर्वसामान्याच्या, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार तरुणांच्या न्यायहक्का साठी सातत्याने संघर्ष करणारा तरुण नेतृत्व म्हणून ओळखले जाते.      पंकज देवकते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पूर्वी पासून या मतदार संघामधून आपला संपर्क ठेवलेला असल्यामुळे त्यांना या मतदारसंघात वाढता पाठींबा मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या निवडणूक मधील सर्वच पक्षाचे उमेदवार पंकज देवक...

"तुम सिकंदर हो..... रोने का नहीं "...... खासदार सुप्रिया सुळे.

इमेज
 पंढरपूर.... प्रतिनिधी....     आज पंढरपूर मंगळवेढा विधानसभा उमेदवार अनिल सावंत यांची निवडणूक प्रचार सभा मंगळवेढा येथे झाली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे या आपले भाषण सुरु असताना एक मुस्लिम जेष्ट नागरिक डोळयांत पाणी आणून अनावर होऊन बोलत असता त्यांनी आपल्याला व आपल्या मुस्लिम समाजाला या भाजपा सरकारच्या राजवटी मध्ये भीती वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. सद्या राज्यात व देशात अल्पसंख्यांक समुदायाला असुरक्षित वाटू लागले आहे. बटेगे तो कटेगे या घोषणे मुळे राज्यातील या मुस्लिम समुदायाला भीती वाटू लागल्याचे त्यांनी सांगितले. जो एकोपा व सर्वधर्म समभाव हा देशात नांदत होता. बटेंगे तो कटेंगे या घोषणेमुळे मुस्लिम समुदायांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असेच या घटनेवरून  आज रोजी दिसून येत होते. सिकंदर नामक मुस्लिम वृद्ध यांनी आपल्याला वाटणारी भीतीही खासदार सुप्रिया सुळे यांना त्यांचे भाषण सुरू असताना सांगितले. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी त्या वयोवृद्ध वडीलधारी माणसाला त्या म्हणाले तुम तो सिकंदर हो लढवय्ये हो लढने का डरने का नही  असे सांगून त्यांनी महाराष्ट्रामध्ये...

l"गरीबाचे संसार उध्दवस्त करण्याचे काम भाजपाच्या लोकप्रतिनिधी ने केले आहे "......... भगिरथ भालके

इमेज
 पंढरपूर... प्रतिनिधी...      पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणूकीचा प्रचार दौरा शेवटच्या टप्प्यात आलेला असून काँग्रेस आय चे उमेदवार भगीरथ भालके पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामधून हा प्रचार दौरा होत असून ग्रामीण भागातील प्रचार दौरा आटोपून त्यांनी पंढरपूर शहरांमधील विविध चौक,विविध गल्ली, उपनगरे या भागांमधून त्यांनी आपल्या प्रचाराचा धडाका सुरू केलेला आहे.       पंढरपूर शहरांमधून त्यांना नेहमीप्रमाणेच जनतेमधून प्रतिसाद मिळत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. पंढरपूर शहरातील समस्या पंढरपूर शहरातील गोरगरीब जनतेच्या अडचणी व त्यांच्यावर होणारे अत्याचार अन्याय याविषयी कायमस्वरूपी भालके कुटुंब हे सर्वसामान्य जनतेच्या बरोबर राहिलेले  आहेत.सर्वसामान्य पंढरपूर शहरातील हात गाडी विक्रेते,फेरीवाले त्याचप्रमाणे मंदिराच्या कडेला बसून फुलेहार विकणारे,अष्टगंध विकणारे चुडे विकणारे असे असंख्य छोटे मोठे व्यापारी या व्यापाऱ्यांच्या वर प्रशासनाने या गरीब व्यापाऱ्यांचे फेरीवाल्यांचे विक्रीचे सामान फेकून देऊन त्यांचे नुकसान करून  त्यांचे संसार उद्ध्वस्त करण्याचे काम गेल्या आषा...

"शरद पवार यांच्या निर्णयाची वाट न पहाता वेगळी भुमिका घेणारे भालके यांना यंदा धडा शिकवा".... जयंत पाटील.

इमेज
 पंढरपूर. प्रतिनिधी....       पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या उमेदवारीची मागणी प्रसंगी भालके यांनी शरद पवार यांच्या निर्णयाची वाट न पहाता वेगळा निर्णय  घेऊन आपली उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने आपल्या पक्षाचा उमेदवार जाहीर केला. आणि या मैत्रीपूर्ण लढती मध्ये राष्ट्रवादी शरद पवार यांचा हा मतदारसंघ बालेकिल्ला असल्यामुळे त्यांनी अनिल सावंत या  माळकरी युवकाला उमेदवारी ची संधी दिली गेली. त्यामुळे या मैत्रीपूर्ण लढती मध्ये रंगत निर्माण झाली आहे.        जयंत पाटील यांनी अनिल सावंत हेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्याचे जाहीर केले. शरद पवार यांच्या निर्णयाची वाट न पहाणार्या या उमेदवाराला धडा शिकवा असे आज जयंत पाटील यांनी आपल्या पंढरपूर येथील प्रचार सभेत आपली भुमिका माडली.       देशात प्रचंड बेरोजगारी वाढली आहे. महागाई वाढली आहे. शेतकरी संतप्त आहेत. मात्र या मुलभूत समस्याकडे बघायला भाजपाला वेळ नाही. भाजपा पक्ष फक्त्त जातीजातीत तंटा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. समोर जरी काग्रेसचा उमेदवार असला तरी...

" महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरील रेघ आहे. " जयंत पाटील.

इमेज
 पंढरपूर.. प्रतिनिधी...       येत्या काळात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. मतदारांना आता सत्ता बदलण्याची संधी आली आहे. येत्या वीस तारखेला तुतारी च्या चिन्हा पुढील बटन दाबून प्रचंड मतानी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांना विजयी करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंढरपूर येथील अनिल सावंत यांच्या प्रचार सभेत मतदारांना केले.     यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, लक्ष्मण ढोबळे सर, सुभाष भोसले, संदीप माडवे, सुधीर भोसले, संतोष नेहतराव, सुधीर अभंगराव, प्रताप गंगेकर, वसंत नाना देशमुख, अमर सुर्यवंशी, आदी मान्यवर उपस्थित होते.     मंगळवेढा तालुक्यातील चौतीस गावाला पाणी मिळावे म्हणून आमच्या सरकारच्या राजवटी मध्ये आमदार भालके यांनी केलेल्या प्रयत्नाला आम्ही दुजोरा देऊन या मंगळवेढा तालुक्यातील गावाना मंजूरी व निधी दिला याचे क्रेडीट विरोधक घेत आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला कोट्यावधीचा निधी आम्ही दिला. या पुढील काळात अनिल सावंत हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. अनिल सावंत या...

"अभिजित आबा पाटील यांना सावंत परिवाराचा पाठींबा आहे.... प्रा. शिवाजी सावंत यांच्या भूमिकेशी काही घेणे देणे नाही."...... अनिल सावंत

इमेज
 पंढरपूर. प्रतिनिधी....       नुकतेच काही दिवसापूर्वी प्रा. शिवाजी सावंत यांनी माढा विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेतली आहे. या त्यांच्या भूमिकेशी सावंत परिवाराचे काही घेणे देणे नाही. तो त्यांचा व्यक्तीक विषय आहे.      आमचा माढा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अभिजित आबा पाटील यांना पाठींबा असून तुतारी हे चिन्ह त्याचे असून तुतारी या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करा असे आवाहन पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अनिल दादा सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत आपले मनोगत व्यक्त केले.    माढा मतदार संघ आणि पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात महविकास आघाडीचे कार्यकर्ते मध्धे संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे. माढा मतदार संघातील सर्व सावंत परिवाराचे सदस्य तसेच सावंत गटाचे नेते कार्यकर्ते यांनी त्याची भूमिका व्यक्त केली.     प्रा. शिवाजी सावंत हे जरी माझे काका असले तरी त्यांनी दोन दिवसापूर्वी अचानक पणे विरोधी गटाच्या अपक्ष उमेदवाराला पाठींबा...

"धनशक्ती ला भगिरथ भालके यांची जनशक्ती विरोधकाला पराभूत करणार आहे"....... शिवसेना शहर अध्यक्ष श्रीनिवास उपळकर

इमेज
 पंढरपूर.. प्रतिनिधी...     भाजपाचे उमेदवार धनशक्ती चा वापर करुन तसेच खोटी आश्वासन देऊन मतदारांची दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत. या अशा भूलथापाना बळी न पडता मतदारांनी या विरोधकाला घरचा रस्ता दाखवण्याची वेळ येत्या वीस तारखेला येत आहे. या वीस तारखेला सर्व मतदारांनी भाजपाच्या उमेदवाराला पराभूत करुन  समाधान मिळवण्याची वेळ आली आहे. असे आज पंढरपूर येथील ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी येथील सभेत शिवसेना उबाठा चे शहर अध्यक्ष श्रीनिवास उपळकर यांनी भगिरथ भालके यांच्या प्रचार सभेत बोलताना ते म्हणाले.     पंढरपूर शहरातील धुळीचे,घाणीचे साम्राज्याला येथील नगरपालिका व लोकप्रतिनिधी जबाबदार आहे. अशा निष्क्रिय भाजपाच्या उमेदवाराला पराभूत करावे. हे विरोधक निवडणूकीच्या पुढे लक्ष्मी ला घेऊन येतील त्या लक्ष्मी ला आपल्या घरी घ्या व  विरोधकाला पराभूत करून त्याच्या घरी कायमचे पाठवा.    गोरगरीब जनतेची बाजू घेणारे भगिरथ भालके यांना येत्या निवडणूकमध्ये विजयी करून आपल्या शहरातील विकासासाठी मदत करा. येत्या वीस तारखेला भगिरथ भालके यांना मतदान करून विजयी करण्याचे आवाहन ऊपळकर यां...

"मी एकादे काम करायचे ठरवले तर ते काम पूर्ण केल्याशिवाय रहात नाही ". खासदार मंत्री नितीन गडकरी.

इमेज
 पंढरपूर.. प्रतिनिधी......      गेल्या काही वर्षापूर्वी देशामध्ये सर्व सुविधा उपल्ब्ध असताना देशातील रस्त्याची अवस्था दयनिय होती. अटलबिहारी बाजपेयी पंतप्रधान असताना. त्यांनी देशातील रस्त्याची काळजी व्यक्त केली होती. सर्व शहराना गाव खेड्या चे रस्ते ही जोडली जाण़्यासाठी एक योजना तयार करण्याचे काम माझ्यावर सोपवले. तीन महिने अथक काम करून ही योजना तयार केली. आज संपूर्ण देशातील रस्ते हे शहर गाव, खेडी, वाड्यावस्ती पर्यंत मजबूत आणि टिकाऊ रस्ते पंतप्रधान सडक योजना या योजनेच्या माध्यमातून निर्माण झाले आहेत.      देशातील शेतकर्यानी पिकवलेले धान्य, फळे भाजीपाला हा जलदगतीने शहरापर्यत पोहचत आहे. याचा लाभ शेतकरी, व्यापारी, वाहतुकदाराना होत आहे. भाजपा सरकारने ऊस, मका, अन्य फळफळाव यांच्या पासून इथेनाईल बनवण्या साठी परवानगी देण्यात आली आहे. याचा वापर पेट्रोल च्या ऐवजी इथेनाईलचा वापर केल्यास अत्यंत स्वस्तात उपलब्ध होणार आहे. वीस रुपये लिटर ने ते ग्राहकांना मिळणार आहे.      या पुढील काळात देशातील मोटार उद्योजक टाटा, महिन्द्रा, बजाज, व अन्य मोटार कंपनी या इथ...

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

इमेज
 पंढरपूर... प्रतिनिधी......       पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात विविध पक्षाच्या उमेदवारानी आपले अर्ज दाखल करून प्रचार सभेच्या रणधुमाळी ते सामील झाले आहेत. आय काग्रेस पक्षाचे उमेदवार भगिरथ भालके, भाजपा कडून समाधान आवताडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिलीप धोत्रे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. या वरील विविध पक्षाच्या उमेदवारा सोबत या मतदार संघामधून राष्ट्रीय समता पक्ष या पक्षा च्या वतीने महादेव जानकर यांनी आपल्या पक्षाचा उमेदवार म्हणून पंकज देवकते यांना उमेदवारी देऊन या मतदार संघात पंचरंगी लढत निर्माण केली आहे.      पंकज देवकते या युवकाला उमेदवारी देऊन मताची विभागणी होऊन रासपा चा हा उमेदवार निवडून कसा येऊ शकतो याचा अदाज महादेव जानकर यांनी केला आहे. या मतदार संघातील धनगर समाज हा सायलेंट गेम चेंजर ठरु शकतो. पंकज देवकते या युवकानी बेरोजगार तरुणाच्या साठी अदोलन केले आहे. शेतकर्याच्या शेतीमाला भाव मिळत नाही म्हणून अदोलन केले आहे. दुध दर असो की खताची वारेमाप दरवाढ असो. अशा अनेक जनहितार्थ अदोलना...

तीन हजार कोटींचा निधी खर्च केलात.,.... तर मत मागत फिरता कशाला?....... माजी आमदार रमेश कदम

इमेज
 पंढरपूर.... प्रतिनिधी...      जर या आमदारांनी तीन हजार कोटींचा निधी या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात विकास कामावर खर्च केला आहे तर मग या निवडणुकीत प्रचार करीत मते का मागत फिरत आहेत. त्यांनी निवांत घरी बसून राहायला हवे होते. कशासाठी मग फिरत आहेत. असे मोहोळ तालुक्याचे माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचार सभेत पंढरपूर येथील संत पेठ परिसरामध्ये आपल्या भाषणात म्हणाले.       अनिल सावंत हे उमेदवार नवीन चेहरा आहे. त्यांनी या मतदारसंघात मंगळवेढा येथे भैरवनाथ शूगर साखर कारखाना काढून या भागातील अनेक तरुणांना काम दिले आहे. त्यांचे संसार उभे केले आहेत. शेतकऱ्यांच्या ऊस गाळपाची सोय करुन आर्थिक बाबती या शेतकऱ्यांना सक्षम केले आहे. आधी काम केले आहे मगच ते येथील जनतेला मतदान मागत आहेत. कोणतीही खोटी आश्वासने ते देत नाही. अशा निर्व्यसनी माळकरी उमेदवाराला आपल्या मतदार संघात सेवा करण्याची संधी जनतेनी द्यावी असे आवाहन रमेश कदम यांनी मतदारांना केले.     या मतदार संघात मातंग समाज मोठ्या प्रमाणात आहे. या माझ्या समाजा...

"राजकारणाचा काहीही संबध नसणार्याला आमदार व्हावं वाटू लागलय"......... शिवाजीराव कांबळे

इमेज
 पंढरपूर.. प्रतिनिधी.......      माढा विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्या पासून अनेकांना आमदार व्हावंस वाटू लागलं. त्यामधील एक पंढरपूर चा उमेदवार ज्याला साधे ग्रामपंचायत सदस्य होता आले नाही की जिल्हा परिषद सदस्य होता आले नाही. राजकारणाचा काहीच गंध नसलेल्या या उमेदवाराला आमदार व्हावस वाटू लागलं असे माढा तालुक्यातील तुळशी या गावी प्रचार सभेत जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याणचे सभापती शिवाजीराव कांबळे यानी म्हटले.      गेली तीस वर्षे माढा तालुक्यातील जनतेच्या कल्याणासाठी झटणारे बबनदादा शिंदे यांनी सीना सिंचन योजनेतून संपूर्ण माढा तालुका ओलिता खाली आणण्याचे काम करत आले आहे. दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणारा माढा तालुका हिरवागार केला. माढा तालुक्यातील काही गावे तुळशी, अजंनगाव खे,परितेवाडी ही दूर असल्यामुळे या भागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने ते प्रयत्न करीत आहेत. या भागात तलाव निर्माण करून त्यामध्ये पाणी साठवण हे पाईप लाईन च्या माध्यमातून पाणी आणले जाणार आहे. या कामाची मंजूरी मिळाली असून येत्या काळात येथील पाणी प्रश्न मिटवला जाणार आहे.     बबन...

"सर्व कल्याणकारी योजना राबवण्याचे काम मी पूर्ण करणार "........... समाधान आवताडे

इमेज
 पंढरपूर... प्रतिनिधी....      महायुतीच्या सरकारने जाहीर केलेल्या सर्व योजना राबवण्याचे काम येत्या काळात मी पूर्ण करणार आहे. या सर्व योजनेचा लाभ तळागाळतील सर्व जनतेला होणार आहे. त्यासाठी राज्यात महायुतीचे सरकार आले पाहिजे. असे आपल्या प्रचार सभेच्या दौरा धर्मगाव येथील आयोजित कार्यक्रम मध्ये आमदार समाधान दादा आवताडे व्यक्त केले.     टेंबू पाणी योजनेतील पाणी आपल्या मतदारसंघातील शेवटच्या गावा पर्यंत आणण्याचे काम पूर्ण होत आले आहे. टेंबूचे पाणी आपल्या तालुक्यात येऊ शकणार नाही. असे विरोधक म्हणत होते परंतु या महायुतीचे सरकार च्या माध्यमातून हे पाणी आता माण नदीमधून आपल्याला आणता येणार आहे. उन्हाळ्यात या भागातील पीकाना पुरसे पाणी मिळत नव्हते परंतु आता या भागातील पीके जळून जाणार नाहीत.      महायुती च्या सरकारने जनतेच्या साठी कल्याणकारी योजना जाहीर केल्या आहेत. महिलांना सक्षम करण्यासाठी लाडकी बहिण योजना, मुलींना मोफत शिक्षण, पाष्सठ वयावरील महिलांना वयोश्री योजना लागू करण्यात येणार आहे. आजारपणातील खर्च शासन करणार आहे.      शेतकर्याचे वीज ब...

"परिचारकाच्या कार्यकर्तेनी आम्हाला सहकार्य करावे"......... अनिल सावंत

इमेज
 पंढरपूर.. प्रतिनिधी.........      परिचारक कुटुंब हे शरद पवारांना मानणारे कुटुंब आहे. पुरोगामी विचाराने आपले कार्य करणारे नेते आहेत. भाजपाने त्यांना शब्द देऊनही तो शब्द भाजपाने व त्यांचे नेतेमंडळीने पाळला नाही. त्यांच्या उमेदवारी च्या मागणीला नकार देऊन फक्त्त झुलवत ठेवण्याचे काम भाजपाने केले. परिचारक यांच्या कार्यकर्ते या घटनेमुळे नाराज झाल्याचे दिसून येत आहेत.     आपल्या नेत्यांना झुलवत ठेवणार्या भाजपा या पक्षावर राग काढण्याची हीच संधी आहे आम्हाला व शरद पवार यांच्या पक्षाला या निवडणूक मध्ये सहकार्य करण्याचे आवाहन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांनी कोर्टी या गावी केले.     या प्रचार सभेला जिल्हा संघटक सुधीर भोसले, नागेश फाटे, कासेगाव चे नेते वसंत नाना देशमुख, मुलाणी,व अन्य मान्यवर उपस्थित होते.     या प्रचार सभेत पुढे बोलत असता ते म्हणाले भाजपाने जाती जातीत द्वेष पेरण्याचे काम केले आहे. महागाई वाढवून गोरगरीबाचे कंबरडे मोडले आहे. भाजपाच्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत. लाडकी बहिण योजना द्वारे पैसे देऊन त्या पाठीमागे या ...

"अन्यथा मी फेटा बांधणार नाही"...... बबनदादा शिंदे

इमेज
 पंढरपूर प्रतिनिधी.....        भौगोलिक कारणामुळे तुळशी, बावी, अजंनगाव खे,परितेवाडी या गावाना सीना माढा सिंचन योजने मधून पाणी पुरवठा करण्याचे काम पाईप लाईन द्वारे करणार आहे. शासनाकडे पाठपुरावा करुन हे काम मंजूर केले आहे. या गावाना लवकरच पाईप लाईन मधून हे पाणी तलावा मध्ये आणून हा भाग सुजलाम सुफलाम करणार आहे.    रणजित शिंदे यांना निवडून द्या या भागातील पाण्याची टंचाई दूर केल्याशिवाय राहणार नाही. असे आमदार बबनदादा शिंदे यांनी कुर्डुवाडी येथील प्रचार सभेत बोलत असता म्हणाले.की या तुळशी, अजंनगाव, परितेवाडी या गावाला पाणी आणल्याशिवाय मी फेटा बाधणार नाही.      तुळशी गाव हे विजयसिंह मोहिते यांनी दत्तक घेतले होते. या गावाचा विकास आणि या गावाला पाणी आणून देतो असे आश्वासन दिले होते. परंतु या गावाला हायमास्ट ल्याम्प देण्या शिवाय त्यांनी काही काम केले नाही.अशी टीका माजी जिल्हा परिषद सदस्य शंभू मोरे यांनी केली.     गेल्या तीस वर्षाच्या काळात अनेक विकास कामे बबनदादा शिंदे यांनी केली. अशी अनेक विकासकामे पुढील काळात करायची असतील तर रणजित शिं...

"हजारो कार्यकर्ते पैकी एक निघून गेला आहे..... तर 999 कार्यकर्ते मला विजय मिळवून देतील "........ भगिरथ भालके

इमेज
 पंढरपूर प्रतिनिधी......      खर्डी येथील प्रचार सभेत बोलत असता भगिरथ भालके म्हणाले दामाजी साखर कारखाना निवडणूकीतील समविचारी आघाडी मधील एक कार्यकर्ता निघून गेला आहे. काही हरकत नाही. मला या विधानसभेच्या निवडणुकीत 999 कार्यकर्ते हे विजयी केल्याशिवाय राहणार नाही. असे भगिरथ भालके यांनी खर्डी येथील प्रचार सभेत बोलताना म्हणाले.      पंढरपूर शहरातील काही जुनी मंडळी  स्वार्थापोटी माझी साथ सोडून जात आहे. ही मंडळी नगरपालिकेच्या उमेदवारीच्या आशेने गेली आहेत. पंढरपूर ची जनता या स्वार्थी लोकांना ओळखून आहे. पंढरपूर शहरातील माझे काम पाहून मला शहरातील मतदार विजयी करतील.     आम्ही कधीही दुजाभाव केला नाही. गटतट पाहिले नाही. सर्वसामान्य जनतेची कामे करणे, त्यांना अडचणीच्या काळात मदत करणे हे मला माझ्या वडीलानी शिकवले आहे. मतदार संघातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नाही. दुधाला वाढीव दर मिळत नाही. भाटगरचे पाणी शेवटच्या शेतकऱ्यांपर्यत पोहचत नाही. यासाठी कधी विधानसभा मध्ये आवाज या आमदारांनी उठवला नाही.अशा लोकप्रतिनिधी ला घरी बसवण्याची वेळ आली आहे.   ...

"अनिल सावंत यांच्या पाठीशी शरद पवारांची ताकद आहे. विजय निश्चित आहे "....... खासदार अमोल कोल्हे

इमेज
 पंढरपूर. प्रतिनिधी......       आज सकाळी अनिल सावंत यांच्या निवास स्थानी झालेल्या पत्रकार परिषदे मध्ये बोलत असताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की या मतदार संघात नकारात्मक अफवा पसरवल्या जात आहे. कुणीकुणाच्या मागे जाणार नाही. काही लोक विविध पक्ष फिरुन आले आहेत. त्याच्या विषयी न बोलले चांगले पवार साहेबांचे पूर्णपणे लक्ष आहे. पवार साहेबाना मानणारा मतदार मोठ्या प्रमाणावर येथे आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना मानणारा मतदार या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे अनिल सावंत यांचा विजय निश्चित आहे.       महविकास आघाडीने जनकल्याणकारी योजना जाहीर केली आहे. महिलांना मोफत प्रवास, तीन हजार रुपये दरमहा महालक्ष्मी योजने अतर्गत दिले जाणार आहे. जन्मलेल्या कन्येला वयाच्या अठराव्या वर्षी लाख रुपये तीच्या खात्यात जमा होणार आहे. शेतकऱ्यांना तीन लाख रुपये पर्यंत चे कर्ज माफ केले जाणार आहे. युवकांना दरमहा चार हजार रुपये दिले जाणार आहेत. अशा अनेक कल्याणकारी योजना या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आलेनंतर अमलात आणले जाणार आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी द...

"वाळू उपसा करणार्या मंडळीच्या हाती माढा मतदारसंघ न देता विकासकामे करु पहाणार्या रणजित शिंदे यांना विजयी करा"........ माजी सभापती शिवाजीराव काबळे "विरोधकांच्या भूलथापाना मतदारांनी बळी पडू नये"..... बबनदादा शिंदे

इमेज
 पंढरपूर.... प्रतिनिधी..      वाळू उपसा करणारे आणि विकासाचे कोणतेही व्हिजन नाही.विकासाचे कसले ही धोरण नाही.शेतकऱ्यांची दिशाभूल करणार्या अशा थापेबाज विरोधी उमेदवाराला पराभूत करा आणि विकासमे करुन विकासाचा डोंगर उभा करणारे बबनदादा शिंदे यांचे कर्तृत्वान मुलाला विधासभेत जाण्याची संधी मतदारांनी द्यावी असे आवाहन जिल्हापरिषद चे माजी समाज कल्याण सभापती शिवाजी काबळे यांनी  माढा मयदार संघातील मानेगाव गटातील केवड, जामगांव, अजनगाव उमाटे येथील प्रचार सभेत केले.      यावेळी आमदार बबनदादा शिंदे यांनी आपण केलेली विकास कामाची यादी मतदारांच्या पुढे सादर केली.आरोग्य केद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, ठिकठिकाणी आरोग्य केद्र उभारणी, विविध योजनेतून रस्ते व डाबरीकरण, शैक्षणिक संस्था, डी फार्मसी, बी फार्मसी, महाविद्यालय, कृषी विद्यालय, जलसिचनाच्या विविध योजना राबवल्या आहेत. वीजेचे सब स्टेशन व नवीन ट्रान्सफारमर अशी अनेक विकास कामे केली आहेत. मी केलेल्या विकासकामाला पुढे नेन्याचे काम रणजित शिंदे हे करतील.      विरोधकांच्या भूलथापाना मतदारांनी भूलून ...

"सर्वच बाबतीत बदल घडवण्यासाठी मी निवडणूक लढवीत आहे. "..... अभिजित आबा पाटील.

इमेज
 पंढरपूर प्रतिनिधी.....माढा विधानसभा मतदार संघामध्ये पंढरपूर तालुक्यातील काही गावे समाविष्ट झालेल्या पैकी मेढापूर ते पान्ढरेवाडी या दरम्यान अभिजित पाटील यांची बाईक रेली काढून ग्रामस्था कडून जोरदार स्वागत करण्यात आले.      या वेळी बोलताना अभिजित पाटील म्हणाले की सर्वसामान्य जनतेला मदतीचा देणे, संपूर्ण माढा मतदार संघाचा सर्वागिण विकास झाला पाहिजे. या मतदार संघात मुलभूत सुविधा उपल्पध झाले पाहिजे. शैक्षणिक दुरावस्था दूर झाली पाहिजे. या भागातील विद्यार्थी हा उच्च शिक्षणासाठी वेगळ्या भागात जावे लागते. या माढा तालुक्यात उच्च शिक्षणाची सोय, इजिनिअरीग महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, आ्य. टी. आय. सारखे शैक्षणिक संस्था आल्या पाहिजे.     संपूर्ण माढा तालुक्याचा विकास करण्यासाठी, परिवर्तन करण्यासाठी मी निवडणूकीस उभा आहे. गेली तीस वर्षे सत्ता ताब्यात असूनही या तालुक्याला सर्व सुविधा पासुन वंचित ठेवले आहे. अशा बिनकामाच्या नेतृत्वाला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. आता बदल निश्चित आहे. मतदारांनी मला साथ द्यावी बदल घडवल्याशिवाय मी राहणार नाही. असे आपल्या मनोगतात अभिजित पाटील...

"गटतट आणि पक्षाची चौकशी करणार्या या आमदाराला घरी बसवा".... भगिरथ भालके.

इमेज
 पंढरपूर.... प्रतिनिधी....     पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी हे सर्वसामान्य जनतेचे काम करताना हा कुठल्या पक्षाचा, हा कुठल्या गटाचा अशी चौकशी करून कामे करणार्या लोकप्रतिनिधी ला घरी बसवण्याची वेळ आली आहे. असे रान्झणी या गावी प्रचार सभेत महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके यांनी भाजपा च्या उमेदवारावर टीका केली.     यावेळी हजारोच्या संख्येने लोकसमुदाय उपस्थित होता. आपल्या भाषणात पुढे बोलत असता ते म्हणाले हजारो कोटींचा निधी फक्त कागदावर आणला आहे. खोटं बोल पण रेटून बोल अशा उमेदवाराला मतदार धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही.    शेतकऱ्यांच्या शेती मालाला भाव मिळावा म्हणून शेतकरी अदोलन करत असताना. तोंड बंद करून बसणार्या या लोकप्रतिनिधी ला शेतकर्याच्या पीकाची काळजी नाही. या बाबत कधीही विधान भवनात तोंड उघडलेलं नाही. शेती मालाचा प्रश्न असो की भाटगर च्या पाण्याचा प्रश्न असो. कधीही शेतकर्याची बाजू घेतली नाही. मतदार बंधू भगिनीना येत्या 20 तारखेला अशा बिनकामाच्या लोकप्रतिनिधी ला बदलण्याची वेळ आली आहे.      आता ची ही निवडणूक कुण्या नेत्यांच्या...

"सर्व योजना राबवण्याचे काम आम्ही केले आहे "..... .. समाधान आवताडे

इमेज
 पंढरपूर...... प्रतिनिधी.      महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारने ज्या काही कल्याणकारी योजना जाहीर केल्या त्या योजनेची अमलबजावणी करण्याचे काम आम्ही पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात केले आहे. असे भाजपाचे उमेदवार समाधान दादा आवताडे आज कोर्टी येथील महादेवाच्या मंदिर परिसरात आपल्या प्रचार सभेत बोलत असताना आपल्या भाषणात मधून आपण केलेली विकास कामे ही सांगितले.      या प्रचार सभेला प्रशांत परिचारक, कृषीउत्पन बाजार समितीचे अध्यक्ष हरिषदादा गायकवाड, व अन्य नेते मंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते.       आपल्या प्रचारसभेत समाधान आवताडे यांनी संपूर्ण मतदार संघातील रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय, वीज, तामदर्डी बंधारा चे काम, चौवीस गावाचा पाणी प्रश्न सोडवण्याचे काम आम्ही केले आहे. पंढरपूर तालुक्यातील बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून एम. आय. डी. सी. ला मंजूरी आणून त्यासाठी लागणारी जमीन आणि निधी मंजूर केला आहे.     या मतदारसंघातील सर्व रस्ते हे मोठ्या महामार्गाला जोडले गेले आहेत. ग्रामीण भागातील वाड्यावस्ता वरील रस्ते बनवले आहेत. शेतीमाल ...

"अडीच वर्षाच्या आमदारकी मध्ये तीन हजार कोटींचा निधी आणला आहे..... उद्याच्या काळात दुप्पट आणल्याशिवाय राहणार नाही ".....आमदार. समाधान आवताडे.

इमेज
 पंढरपूर... प्रतिनिधी.....    गेल्या  पोट निवडणूक मध्येआपण मला निवडून दिले. या चार वर्षाच्या कालावधी मध्ये कोरोना महामारी मध्ये दोन वर्षे वाया गेली. परंतु महायुतीचे सरकार आल्यानंतर मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य मंत्री महोदय यांच्या कडे पाठपुरावा करुन पंढरपूर मंगळवेढा मतदार सघातील विकास कामे पूर्ण करण्यासाठी तीन हजार कोटींचा निधी आम्ही खेचून आणला.   उद्या या पुढील काळामध्ये आम्ही दुप्पट   निधी आणल्याशिवाय रहाणार नाही. असे भाजपाचे विद्यमान आमदार व उमेदवार समाधान दादा आवताडे यांनी आज राझणी येथील प्रचार सभेत बोलताना सांगितले.      या वेळी उपस्थित माजी आमदार प्रशांत परिचारक व अन्य मान्यवर नेते व असंख्य कार्यकर्ते होते.         पंढरपूर आणि मंगळवेढा मतदार संघातील गावखेडयातील रस्ते, त्या रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण व सिमेंटचे रस्ते बनवले गेल्यामुळे पावसाळ्यामध्ये होणारी शेतकऱ्यांचे होणारी हाल कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण पिकवलेले फळे, भाजीपाला या पिकांची वाहतूक करण्यासाठी शेतकऱ्याला अतिशय त्रास होत होता. शे...

" रामकृष्ण हरी उमेदवार शोभे माळकरी" सर्वसामान्य मतदारांच्या मध्ये अनिल सावंत यांचीच चर्चा........

इमेज
 पंढरपूर... प्रतिनिधी..     पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणूक मधील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांचे या मतदारसघातील घरनिकी या गावी आपल्या प्रचारसभेची सुरुवात रामकृष्ण हरी म्हणून करताच टाळ्याच्या गजरात अनिल दादा सावंत यांचे स्वागत झाले.     मी स्वतः माळकरी आहे. असे म्हणून त्यांनी आपली ओळख सांगितली. मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्नावर आजपर्यंत च्या निवडणूका झाल्या. पाणी जसे महत्वाचे आहे. तसेच येथील बेरोजगार तरुणाच्या रोजगाराचे देखील प्रश्न आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळत नाही. रस्त्याचे जाळे अद्यापही वाड्यावस्त्या पर्यंत पोहचलेले नाही. या भागात उद्योग धंदे नाहीत. शैक्षणिक संस्था नाहीत. या सर्व अत्यावशक बाबी मी आणण्यासाठी प्रयन्त करणार मगळवेढा तालुक्यख मध्ये आय. टी हब उभे करण्याचे माझे स्वप्न आहे. या ठिकाणी अनेक उद्योग धंदे सुरु करण्यासाठी मी प्रयन्त करणार आहे असे आश्वासन उमेदवार अनिल सावंत यांनी दिले. येत्या काळामध्ये पाण्याचा प्रश्न हा सोडवला जाणार आहे त्याचप्रमाणे मंगळवेढा तालुक्यातील सर्वांगीण विकास केला जाणार आहे.महाविकास आघाडीच्या...

"माढ्याचा खासदार बदलला आहे आता आमदार बदलूया "........ अभिजित आबा पाटील

इमेज
 पंढरपूर... प्रतिनिधी..      ज्याप्रमाणे आपण माढा मतदारसंघाचा खासदार बदलला त्याप्रमाणे आता माढा तालुक्याचा आमदार आपल्याला बदलायचा आहे. असे माढा तालुक्यातील विधानसभा निवडणूकीचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अभिजित आबा पाटील यांनी आज भीमा नदीच्या काठावर वसलेल्या   चिंचोली भोसे या गावी प्रचार सभेमध्ये बोलत असताना ते म्हणाले.      या शरदचंद्रजी पवार यांनी या माढ्याच्या आमदाराला मोठे केले. त्याच शरद पवारांना सोडून हे गेलेले आहेत. पक्षाचे तिकीट मिळाले नाही म्हणून त्यांनी अपक्ष अर्ज भरलेला आहे. गेली 30-35 वर्षे आमदारकीच्या कार्यकिर्दी मध्ये माढा तालुक्याचा विकास केला नाही. स्वतःच्या कुटुंबाचा फक्त विकास करून सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी ट्रॅक्टर चालक यांच्यावर कर्ज काढून त्यांना कर्जाच्या खाईत लोटणारे हे अपक्ष उमेदवार आज पुन्हा एकदा ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये ते उभे राहिले आहेत. माढा तालुक्यातील जनता हे आता दूध खुळी राहिलेली नाही. येत्या 20 तारखेला ज्याप्रमाणे माढा मतदारसंघाचा खासदार बदलला त्याच प्रमाणे माढा तालुक्यातील देखील आमदार बदलला जाणार...

"राष्ट्रीय समाज पक्षाला मानणारा वर्ग या मतदारसंघात आहे. " विजय राष्ट्रीय समाज पक्षाचाच होणार आहे........ महादेवराव जानकर.

इमेज
 पंढरपूर.... प्रतिनिधी..        राष्ट्रीय समाज पक्षाचा एक स्वतंत्र असा मतदार वर्ग आहे. राष्ट्रीय समाज पक्षाला मानणारा मोठ्या प्रमाणामध्ये या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये मतदार असल्यामुळे   उमेदवार पंकज देवकते यांना आम्ही संधी दिलेली आहे. पंकज देवकते यांचा जनसंपर्क या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळे व त्यांच्या विजयाची खात्री असल्यामुळे आम्ही त्यांनाही उमेदवारी दिलेली आहे.      राष्ट्रीय समाज पक्षाच्या कडून उमेदवारी मिळावी म्हणून असंख्य लोक इच्छुक होते परंतु या सर्व इच्छुकांनी या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमधील पंकज देवकते यांना मानणारा मोठा मतदार वर्ग या परिसरात असल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी माघारी घेऊन पंकज देवकते यांना पाठिंबा दिला असून या पाठिंबाच्या जीवावरच राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार पंकज देवकते हे मोठ्या मताने निवडून येतील. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार नारळ नामदेव पायरी येथे फोडण्यात आला त्यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवराव जानकर यांनी आज रोजी...

"काँग्रेसचा उमेदवार आम्हाला साधे देखील विचारत नाही".... अमोल सूर्यवंशी काँग्रेस पंढरपूर शहराध्यक्ष

इमेज
 पंढरपूर... प्रतिनिधी....      आज पुन्हा देखील भालकी गटातील कार्यकर्ते  कार्यकर्ते व शहराध्यक्ष हे काँग्रेसचे उमेदवार हे आम्हाला विचारत देखील नाहीत व आम्हाला हा उमेदवार पसंत नाही हे कारण पुढे करीत पंढरपूर शहरातील काँग्रेस शहराध्यक्ष व असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे अनिल सावंत यांना आपला पाठिंबा दर्शविलेला आहे.     आज रोजी पंढरपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे पंढरपूर शहर अध्यक्ष अमोल सूर्यवंशी व असंख्य कार्यकर्ते यांनी आज रोजी शरद पवार पक्षाची उमेदवार अनिल सावंत यांना पाठिंबा दर्शवीत त्यांनी आणि सावंत यांना निवडून देण्याचे जाहीर केले आहे.     दोन दिवसांपूर्वीच भालके गटातील माजी नगराध्यक्ष उज्वला भालेराव व महादेव धोत्रे व काँग्रेसचे नगरसेवक लखन चौगुले हे व त्यांचे असंख्य कार्यकर्ते हे भाजपामध्ये प्रवेश करून त्यांनी आपली नाराजी व्यक्त करीत प्रवेश केला आहे भाजपा पक्ष आम्हाला न्याय देईल  व आमचे प्रभागातील कामे करतील असे म्हणून त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला होता. या गोष्टीला दोन दिवस होतात न होतात...

"आज पर्यंत झालेल्या आमदारांच्या कामाचा बॅकलॉग मी भरून काढत आहे ......... आमदार समाधान आवताडे.

इमेज
 पंढरपूर.. प्रतिनिधी..       आज पर्यंत मंगळवेढा तालुक्याला असंख्य आमदार खासदार झालेले आहेत परंतु या आमदार खासदारांनी आपल्या या मंगळवेढा शहराकडे व तालुक्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेले असल्या मुळे आपल्या मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्न असो बेरोजगारी असो किंवा रस्त्याच्या बाबतीतले असलेल्या तक्रारी असो अशा असंख्य अडचणी व समस्या व तक्रारी यांचे निराकरण करण्याचे काम आज पर्यंत झालेल्या आमदार खासदारांनी केलेले नाही. या मागील झालेल्या आमदार खासदारांच्या कामाचा बॅकलॉग भरून काढण्याचे काम मी आज करीत आहे असे आज कचरेवाडी येथे भाजपाचे उमेदवार समाधान दादा अवताडे यांनी आज रोजी ग्रामस्थांच्या समोर प्रचार सभेमध्ये बोलताना ते म्हणाले.     यावेळी कचरेवाडी येथील असं की कार्यकर्ते व मान्यवर यांची उपस्थिती होती.        भाजपाचे उमेदवार समाधान दादा अवताडे यांनी आपल्या भाषणामध्ये पुढे बोलत असताना ते म्हणाले की गेल्या पोट निवडणुकीमध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनतेने मला भरघोस मताने निवडून दिले. त्यामुळे मला चार वर्षांमधील फक्त दोन वर्षे काम करण्यासाठी मिळालेल...

"माढा तालुक्याचा मस्तवाल हत्तीची सोंड कापण्याचे काम शरद पवार यांनी मला दिले आहे. " अभिजित आबा पाटील.

इमेज
 पंढरपूर( प्रतिनिधी). गेल्या  तीस वर्षाच्या कालावधीमध्ये  विकास कामे ही झालेली नाहीत आमदारकीच्या कालावधीमध्ये एक साखर कारखाना आपल्या स्वतःच्या मालकीचा बनवून विरोधकांनी आपल्या तीस वर्षाच्या कालावधीमध्ये तीन चार साखर कारखाने ही उभी केली आहेत या कारखान्यामधून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाचा काटा मारून त्यांनी आपले घर भरण्याचे काम केले आहे हे माढा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी सांगत आहेत शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करणारे या विरोधकाला घरी बसवायची वेळ आलेली आहे सत्तेच्या माध्यमातून पैसा आणि पैशाच्या माध्यमातून सत्ता असे षडयंत्र रचत शेतकऱ्यांचे फक्त शोषण करण्याचे काम या विरोधकांनी केले आहे. या माढा तालुक्यातील मस्तवाल हत्तीची सोंड कापण्याचे काम माननीय शरदचंद्रजी पवार यांनी मला दिले आहे.     निवडणुकीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अभिजीत आबा पाटील यांनी आज आपल्या प्रसार सभेमध्ये उपळाई बुद्रुक या ठिकाणी केले.     यावेळी उपस्थित मान्यवर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे  आणि माजी पा...

काँग्रेसचे नगरसेवक लखन चौगुले व त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये केला प्रवेश.... समाधान आवताडे यांचे पारडे जड

इमेज
 .  पंढरपूर.. प्रतिनिधी.. पंढरपूर नगरपालिकेचे काँग्रेसचे नगरसेवक लखन चौगुले व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज रोजी भाजपा या पक्षामध्ये प्रवेश केला आहे.      यावेळी नगरसेवक लखन चौगुले यांच्यासोबत रामा चौगुले दीपक चौगुले यांचा आमदार समाधान दादा अवताडे व अँड डिसलरीज चे चेअरमन उद्योजक यांच्या उपस्थितीमध्ये  केलेला आहे.      नुकतेच दोन दिवसा खाली पांडुरंग परिवार चे प्रमुख प्रशांतराव परिचारक व उमेश राव परिचारक पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष उज्वला भालेराव व नगरसेवक महादेव धोत्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. या दोघांच्या भाजपा  प्रवेशानंतर पंढरपूर शहरामध्ये भाजपा या पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे व आमदार समाधान दादा अवताडे यांना पुन्हा एकदा आमदार करण्याच्या उद्देशाने हे सर्व मान्यवर नगराध्यक्ष व नगरसेवक हे भाजपामध्ये प्रवेश करीत आहेत.      भाजपाचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी आपल्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी केलेले विकास कामे पाहून व सर्वसामान्य जनतेला सामावून घेणे चे व त्यांचे कामे करण्याची का...

स्वच्छ प्रतिमा आणि माळकरी असलेले अनिल सावंत मतदार संघाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. संधी द्या परिवर्तन घडेल...... माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले.

इमेज
 पंढरपूर प्रतिनिधी...पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत हे युवकांचे प्रतिनिधित्व करणारे व्यकतीमत्व असून भैरवनाथ शुगर या मंगळवेढा तालुक्यातील साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकर्याचे दुख जाणतात. मंगळवेढा तालुक्यातील युवकांना रोजगार उपल्ब्ध त्यांनी साखर कारखान्याच्या माध्यमातून केले आहे.    एक नवीन चेहरा स्वच्छ प्रतिमा आणि माळकरी व्यक्तिमत्व आपल्या मतदार संघाला लाभले आहे. अशा उमद्या नेतृत्वाला जनतेनी संधी द्यायला हवी. शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात असल्यामुळे अनिल दादा सावंत हे मोठ्या मताध्याक्याने निवडून येणार आहे. याची खात्री आम्हा कार्यकर्ते व नेतेमंडळी आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात या पूर्वी राष्ट्रवादी शरद पवार यांचाच पक्षाचे उमेदवार भारत भालके हे विजयी झाले होते. शरद पवार यांच्या वर प्रेम करणारा याभागातील मतदार आहे. त्यामुळे अनिल सावंत यांचा विजय निश्चित आहे. असे पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले यांनी आपल्या मुलाखती मध्ये आपले मनोगत व्यक्त केले.

पंढरपूर शहरात अनिल दादा सावंत यांची " तुतारी " ने घेतली प्रचारात आघाडी...

इमेज
 पंढरपूर  प्रतिनिधी...       राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील उमेदवार अनिल सावंत यांनी आज रोजी पंढरपूर शहरातील सरगम चौक या औद्योगिक वसाहती मधून त्यानी आपल्या पक्षाची तुतारी हे चिन्ह घेऊन आपल्या प्रचाराची सुरुवात केली आहे.     अनिल दादा सावंत यानी पंढरपूर शहरामधून प्रचाराला सुरवात केल्यामुळे सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. प्रचारात शहरामधून आघाडी घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. औद्योगिक वसाहती मधील व्यापारी वर्ग व कामगार वर्ग अनिल सावंत याच्या स्वच्छ प्रतिमा व माळकरी विठूरायाचा भक्त म्हणून या व्यापारी व कामगार वर्गात ओळख झाल्यामुळे सर्व मतदार आम्हांला चांगला लोकप्रतिनिधी मिळणार या भावनेने त्यांचे स्वागत सर्वत्र होत आहे.      एक स्वच्छ प्रतिमा व राजकारणातील कोरी पाटी म्हणून त्याची ओळख ही अनिल दादा सावंत यांना विजयी करणार अशी चर्चा त्यांनी या औद्योगिक वसाहत, कुभार गल्ती, कैकाडी मठ, अनिल नगर, जुनी पेठ या परिसरातील नागरिकांनी त्यांचे स्वागत केले.      वरील भागात प्रचार करीत असता येथील ...

माजी नगराध्यक्षा व नगरसेवकाच्या प्रवेशामुळे समाधान दादा आवताडे यांचे मताधिक्य वाढणार

इमेज
उज्वला भालेराव, आणि महादेव धोत्रे यांचा पांडुरंग परिवारामध्ये प्रवेश.    पंढरपूर प्रतिनिधी.... आज पंढरपूर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा उज्वला भालेराव व महादेव धोत्रे यांनी पाङुरंग परिवार मध्ये प्रवेश केला. यावेळी दिलेल्या मुलाखती मध्ये उज्वला भालेराव यांनी आपल्या प्रवेशा बाबत त्यानी आपली भूमिका माडली. गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही ठरवत होतो. परिचारक यांच्या सोबत काम करायचे कारण परिचारक यांनी मी नगराध्यक्षा असताना सहकार्य केले आहे. आज पर्यंत आम्ही भालके गटाकडे होतो. माझे पतीच्या निधना नंतर व कै. भालके यांच्या निधना नंतर आमच्या कडे कुणी लक्ष दिलेले नाही.     भाजपा पक्षाने गोरगरीबाच्या साठी चांगल्या योजना राबवत आहेत. तसेच परिचारक यांची आम्हाला साथ लाभणार आहे. भाजपा पक्ष हा कशी वागणूक देतोय ते पहाण्यासाठी आम्ही प्रवेश केला आहे.     आमच्या प्रभागातील विकासकामे तसेच गोरगरीब लोकांची कामे ही लवकर होण्यासाठी आम्ही फक्त प्रभागातील जनतेचा विचार करून हा प्रवेश केला आहे.या मागे कोणताही वाईट हेतू नाही.     आम्ही केलेल्या कार्यामुळे या भागातील जनतेने निवडून ...

महिलांना पन्नास टक्के आरक्षण असूनही उमेदवारी दिली जात नाही...... महिलांना कमी लेखले जाते....परंतु विजय माझाच होणार....मिनलताई साठे

इमेज
 पंढरपूर... प्रतिनिधी      माढा विधानसभा निवडणूक मध्ये माझी उमेदवारी जाहीर झाल्यापासून विरोधकाचे धाबे दणाणले आहेत. महिलांना अजूनही अबला समजले जात आहे महाराष्ट्र राज्यात राजमाता जिजाऊ, राजमाता अहिल्या बाई, सावित्रीबाई फुले अशा क्रांतिकारी महिलाचा महाराष्ट्र आहे. महिलांना राजकारणात कमी लेखले जाते. पुरषसत्ताक राजवट अजुनही राबवली जात आहे. मला अन्य पक्षानी उमेदवारी महिला म्हणून नाकारली. परंतु अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काग्रेसने मला उमेदवारी देवून महिलांना न्याय देण्याचा प्रयन्त केला आहे.    माढा विधानसभा मतदार संघात महिला मतदाराची संख्या जास्त आहे. मी आजपर्यंत माढा नगरपालिकेत नगराध्यक्षा म्हणून कार्य करीत असताना आपले घर कुटंब जसे काटकसरीने चालवले जाते तसे कार्य माढा शहरात सुधारणा, सर्वसामान्य जनतेची असंख्य कामे प्रामाणिकपणे केली आहेत. माढा शहरातील जनताच तुम्हाला माझे काम कसे आहे ते सांगतील. जनतेची असंख्य कामे केल्यामुळे ही जनता मला या विधानसभा निवडणूक ला उभे राहण्यासाठी पाठिंबा दिला आहे.    माढा तालुक्यातील जनता माझ्या पाठीशी आहे. एक महिला शहर ...

दुष्काळाचा कलंक पुसायचा असेल तर मनसेला निवडून द्या........ मनसे ला आता मतदार दिलसे मतदान करणार......... मनसे उमेदवार दिलिप बापू धोत्रे

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी....        मंगळवेढा तालुक्याला लागलेला कलंक म्हणजे या ठिकाणी कायमचा असलेला दुष्काळ हा दुष्काळ जर संपवायचा असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जनतेनी निवडून द्यायला हवे. असे मनसेचे उमेदवार दिलिप बापू धोत्रे यांनीआज पत्रकार परिषदेत सांगितले.      आज पर्यंत झालेल्या कित्येक विधानसभा च्या निवडणूक मध्ये या आजी माजी आमदारानी मंगळवेढा तालुक्यातील जनतेला पाण्याचे गाजर दाखवण्याचे काम केले आहे. बेरोजगार युवकांना हाताला काम मिळावे म्हणून एम. आय. डी. सी. आवश्यक असताना या बाबतीत येथील नेत्यांनी राजकारण केले गेले. मनसे चे नेते राज ठाकरे यांच्या मार्गदर्शन खाली आम्ही पंढरपूर येथे एम. आय. डी. सी. ची मंजूरी दोन वर्षापूर्वी आम्ही आणली. परंतु येथील नेत्यांनी याला खो घालण्याचे काम करण्यात आले. आता आम्ही एम. आय. डी. सी. आणली म्हणून ते निवडणूक च्या प्रचारात सांगत आहेत. अशा संधीसाधू विरोधकाला घरी बसवले पाहिजे.      मंगळवेढा तालुक्यातील मुलांना उच्च शिक्षणाची सोय नाही. त्यामुळे या भागातील मुले शैक्षणिक गुणवत्ता व उच्च शिक्षणासाठी अन्यत...

माझ्या हातात सत्ता देऊन बघा.... कसा विकास करतो ते बघा...... राज ठाकरे

इमेज
 पंढरपूर (प्रतिनिधी ) माझ्या हातात सत्ता देऊन बघा कसा विकास करतो ते बघा नवनिर्माण सेने चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मंगळवेढा येथील प्रचार सभेत बोलताना ते म्हणाले पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीतील आपल्या पक्षाचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांच्या प्रचाराच्या सभेमध्ये राज ठाकरे यानी मंगळवेढा तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. हा दुष्काळाचा कलंक पुसायचा असेल तर येथील जनतेने माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे याना निवडून द्या मग पहा कसा कायापालट या मंगळवेढा तालुक्याचा होतोय ते.     आजपर्यंत झालेल्या विधानसभा निवडणूक मध्ये विजयी झालेले आमदारानी फक्त आपली घरे भरण्याची कामे केली. हे लोकप्रतिनिधी आपला संसार मुंबई, पुणे थेथे थाटतात त्यांना या मंगळवेढा तील जनतेशी काही घेणे देणे नाही. अशा लोकप्रतिनिधी ना घरी बसवले पाहिजे. अशी टीका आज प्रचार सभेत राजठाकरे यांनी केली.     या भागातील तरुण बेरोजगार कामा साठी मुंबई, पुणे कडे जात आहे़. येथील युवकांना काम नाही, धदा नाही. येथील आमदारांना याची काळजी नाही. असे नेतृत्व काय कामाचे...

ही आरपार ची लढाई आहे. तुमच्या पाठींबा ची गरज आहे......... भगिरथ भालके.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीतील  महाविकास आघाडीचे काँग्रेस आयचे उमेदवार भगीरथ भालके यांनी आज माचणूर येथील सिध्देश्वर मदीर या ठिकाणी महादेवाचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. त्यांच्या सोबत खासदार प्रणिती शिंदे या उपस्थित होत्या.    असंख्य कार्यकर्ते च्या समवेत भगिरथ भालके यांनी दर्शन घेऊन आपल्या प्रचार सभेला सुरुवात केली.     विरोधकांनी अफवा पसरवून मतदाराच्या मनामध्ये संभ्रम निर्माण केला आहे. अशा विरोधकाला खड्यासारखे बाजूला करण्याची वेळ आली आहे. मतदार बंधूनो आता आरपारची लढाई सुरु झाली आहे. तुमच्या पाठींबा ने मी ही लढाई जिंकणार आहे. आता गाफील राहून चालणार नाही.    कै. भारत नाना यांनी अथक प्रयत्न करून मंगळवेढा तालुक्यातील चोवीस गावातील पाणी योजना मंजूर करून आणली त्याचे क्रेडिट हे विरोधक स्वतः कडे घेत आहेत. पंढरपूर मधील तरुणांना एम. आय. डी. सी. चे गाजर दाखवून दिशाभूल केली जात आहे. अशा लोकप्रतिनिधी ला मतदारांनी घरचा रस्ता दाखवावा.     पंढरपूर शहरातील यात्रेत गरीब कष्टकरी आपली हातगाडी घेऊन व्यापार करतात. अशा लोकां...

विजयाचा गुलाल घेऊनच शरद पवार साहेबाना भेटायला जाणार..... अनिल सावंत

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) . पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत हे आज रोजी मंगळवेढा तालुक्यातील माचणूर या गावी सिद्धेश्वर मंदिर येथील महादेवाचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.      यावेळी महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे शिवसेना या पक्षाचे राजाभाऊ मुळे,सुधीर अभंगराव, एडवोकेट अभंगराव मॅडम ,सिद्धेश्वर कोरे आदी शिवसेनेचे कार्यकर्ते व नेतेमंडळी उपस्थित होते त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नगराध्यक्ष सुभाष दादा भोसले, जिल्हा संघटक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट चे नेते सुधीर आबा भोसले, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी पालकमंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे सर कोंडू भैरी सर असे अनेक मान्यवर उपस्थित होते.     आपल्या प्रचार सभेमध्ये पुढे बोलत असताना आणि सावंत म्हणाले मला कोणावरही टीका करायची नाही. मला या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये फक्त आणि फक्त काम करायचे आहे. या दोन्ही तालुक्याचा या मतदारसंघाचा विकास करायचा आहे. मला आपल्या सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा हा हवा आ...