विजयाचा गुलाल घेऊनच शरद पवार साहेबाना भेटायला जाणार..... अनिल सावंत
पंढरपूर ( प्रतिनिधी) . पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत हे आज रोजी मंगळवेढा तालुक्यातील माचणूर या गावी सिद्धेश्वर मंदिर येथील महादेवाचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.
यावेळी महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे शिवसेना या पक्षाचे राजाभाऊ मुळे,सुधीर अभंगराव, एडवोकेट अभंगराव मॅडम ,सिद्धेश्वर कोरे आदी शिवसेनेचे कार्यकर्ते व नेतेमंडळी उपस्थित होते त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नगराध्यक्ष सुभाष दादा भोसले, जिल्हा संघटक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट चे नेते सुधीर आबा भोसले, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी पालकमंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे सर कोंडू भैरी सर असे अनेक मान्यवर उपस्थित होते.
आपल्या प्रचार सभेमध्ये पुढे बोलत असताना आणि सावंत म्हणाले मला कोणावरही टीका करायची नाही. मला या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये फक्त आणि फक्त काम करायचे आहे. या दोन्ही तालुक्याचा या मतदारसंघाचा विकास करायचा आहे. मला आपल्या सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा हा हवा आहे.मला आपण आपल्या पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाची सेवा करण्याची संधी मिळावी.
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमधील मंगळवेढा या तालुक्यामध्ये माझा भैरवनाथ शुगर फॅक्टरी असून गेली पंधरा वर्षापासून व कारखाना कार्यान्वित आहे. या कारखान्याच्या माध्यमातून येथील कष्टकरी कामगारांना त्याचप्रमाणे ऊस उत्पादकांना आर्थिक लाभ मिळवून देण्याचा उद्देशाने मी प्रयत्न करीत आहे. आणि या मंगळवेढा तालुक्यामध्ये शैक्षणिक संकुल नसल्यामुळे या भागातील विद्यार्थी हे पर जिल्ह्यामध्ये जातात परत तालुक्यामध्ये शिक्षण घेण्यास जातात तर अशा विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मी शैक्षणिक संकुल उभा करण्याचे आश्वासन देतो. पंढरपूर शहरांमध्ये मी राहत असल्यामुळे पंढरपूर शहरातील अडीअडचणी मी जाणून आहे.त्यामुळे पंढरपूर शहरातील अडीअडचणी दूर करण्याचा मी मनोभावे प्रयत्न करणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार साहेबांनी मला पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील उमेदवारी देऊन एक मोठी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे. ही जबाबदारी मी पार पाडेन. या मतदारसंघामधून मी विजयाचा गुलाल घेऊनच शरद पवारांच्या कडे जाईन.असे आपल्या प्रचार सभेच्या भाषणामध्ये अनिल दादा सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा