अभिजित आबानी तीस वर्षाची राजकीय मक्तेदारी संपुष्टात आणली......


 पंढरपूर प्रतिनिधी..... माढा विधानसभा मतदार संघामधून 2024 निवडणुकीमध्ये अभिजीत आबा पाटील यांनी तीस हजार 204 मतदान मिळवून विजय प्राप्त केला.
     माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये बबनदादा शिंदे यांची गेली 30 वर्षापासून असलेली राजकीय मक्तेदारी आज रोजी संपुष्टात आली. बबन दादा माढा विधानसभा मधून त्यांनी केलेल्या विकास कामाची ही सर्वसामान्य जनतेला नीट समजावून सांगू शकले नाही. राजकारणामध्ये जनसंपर्क हा कायमस्वरूपी राजकीय नेत्यांनी ठेवायला हवा होता तो जनसंपर्क बबन दादा शिंदे यांनी न ठेवण्याचे दिसून येते.
    माढा तालुक्यामधून विविध विकास कामे त्याचप्रमाणे प्रचार यंत्रणा राबवण्यात देखील कमी पडल्याचे दिसून आले. अभिजीत आबा पाटील यांनी उसाचा दर जाहीर करून आणि काटा हा शेतकऱ्यांनी करून आणायचा त्याप्रमाणे बिल देण्यात येईल असे जाहीर करताच यांनी अभिजीत पाटील हे या माढा विधानसभेला निवडून येणार हे संकेत त्याच वेळी मिळाले होते. संपूर्ण काया पलट करण्याचा अभिजीत आबा पाटील यांनी केलेली घोषणा  याला सर्वसामान्य जनतेने दिलेला मतदान रुपी दुजोरा  हेच या निवडणुकीच्या निकालांमधून दिसून येते.
   अभिजीत आबा पाटील हे माढा विधानसभा मतदार संघाचा विकास करतील ही अपेक्षा बाळगून मतदारांनी मतदान केले आणि अभिजीत पाटील यांना विजयी केले.
    आमदार अभिजीत आबा पाटील यांचा जल्लोषामध्ये अभिनंदन करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....