"अन्यथा मी फेटा बांधणार नाही"...... बबनदादा शिंदे


 पंढरपूर प्रतिनिधी.....

       भौगोलिक कारणामुळे तुळशी, बावी, अजंनगाव खे,परितेवाडी या गावाना सीना माढा सिंचन योजने मधून पाणी पुरवठा करण्याचे काम पाईप लाईन द्वारे करणार आहे. शासनाकडे पाठपुरावा करुन हे काम मंजूर केले आहे. या गावाना लवकरच पाईप लाईन मधून हे पाणी तलावा मध्ये आणून हा भाग सुजलाम सुफलाम करणार आहे.

   रणजित शिंदे यांना निवडून द्या या भागातील पाण्याची टंचाई दूर केल्याशिवाय राहणार नाही. असे आमदार बबनदादा शिंदे यांनी कुर्डुवाडी येथील प्रचार सभेत बोलत असता म्हणाले.की या तुळशी, अजंनगाव, परितेवाडी या गावाला पाणी आणल्याशिवाय मी फेटा बाधणार नाही.

     तुळशी गाव हे विजयसिंह मोहिते यांनी दत्तक घेतले होते. या गावाचा विकास आणि या गावाला पाणी आणून देतो असे आश्वासन दिले होते. परंतु या गावाला हायमास्ट ल्याम्प देण्या शिवाय त्यांनी काही काम केले नाही.अशी टीका माजी जिल्हा परिषद सदस्य शंभू मोरे यांनी केली. 

   गेल्या तीस वर्षाच्या काळात अनेक विकास कामे बबनदादा शिंदे यांनी केली.

अशी अनेक विकासकामे पुढील काळात करायची असतील तर रणजित शिंदे यांना प्रचंड मताने मतदारांनी विजयी करावे. असे आवाहन जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे माजी सभापती शिवाजीराव काबळे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....