" रामकृष्ण हरी उमेदवार शोभे माळकरी" सर्वसामान्य मतदारांच्या मध्ये अनिल सावंत यांचीच चर्चा........
पंढरपूर... प्रतिनिधी..
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणूक मधील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांचे या मतदारसघातील घरनिकी या गावी आपल्या प्रचारसभेची सुरुवात रामकृष्ण हरी म्हणून करताच टाळ्याच्या गजरात अनिल दादा सावंत यांचे स्वागत झाले.
मी स्वतः माळकरी आहे. असे म्हणून त्यांनी आपली ओळख सांगितली. मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्नावर आजपर्यंत च्या निवडणूका झाल्या. पाणी जसे महत्वाचे आहे. तसेच येथील बेरोजगार तरुणाच्या रोजगाराचे देखील प्रश्न आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळत नाही. रस्त्याचे जाळे अद्यापही वाड्यावस्त्या पर्यंत पोहचलेले नाही. या भागात उद्योग धंदे नाहीत. शैक्षणिक संस्था नाहीत. या सर्व अत्यावशक बाबी मी आणण्यासाठी प्रयन्त करणार मगळवेढा तालुक्यख मध्ये आय. टी हब उभे करण्याचे माझे स्वप्न आहे. या ठिकाणी अनेक उद्योग धंदे सुरु करण्यासाठी मी प्रयन्त करणार आहे असे आश्वासन उमेदवार अनिल सावंत यांनी दिले. येत्या काळामध्ये पाण्याचा प्रश्न हा सोडवला जाणार आहे त्याचप्रमाणे मंगळवेढा तालुक्यातील सर्वांगीण विकास केला जाणार आहे.महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर झालेल्या वचन नाम्याची पूर्तता केली जाणार.
मी माळकरी आहे, निर्व्यसनी आहे, मी माळकरी असल्यामुळे खोटे बोलणार नाही आपल्याला दिलेली आश्वासने मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही मंगळवेढा व पंढरपूर तालुक्याचा विकास हाच एक ध्यास असेल असे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अनिल दादा सावंत यांनी घरनिकी या गावी प्रचार सभेत आपले मनोगत व्यक्त केले.
अनिल सावंत यांना पाठीमागे मंगळवेढ्यातील विविध पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शरद पवार पक्षात प्रवेश केला.मंगळवेढा तालुक्यात अनिल सावंतांची ताकद वाढल्याली दिसत आहे. महाविकास आघाडी पाठिंबा देत शैकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
या वेळी जमलेल्या जनसमुदाय मधून एकच चर्चा सुरु झाली..... रामकृष्ण हरी... उमेदवार शोभे माळकरी.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा