"अडीच वर्षाच्या आमदारकी मध्ये तीन हजार कोटींचा निधी आणला आहे..... उद्याच्या काळात दुप्पट आणल्याशिवाय राहणार नाही ".....आमदार. समाधान आवताडे.
पंढरपूर... प्रतिनिधी.....
गेल्या पोट निवडणूक मध्येआपण मला निवडून दिले. या चार वर्षाच्या कालावधी मध्ये कोरोना महामारी मध्ये दोन वर्षे वाया गेली. परंतु महायुतीचे सरकार आल्यानंतर मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य मंत्री महोदय यांच्या कडे पाठपुरावा करुन पंढरपूर मंगळवेढा मतदार सघातील विकास कामे पूर्ण करण्यासाठी तीन हजार कोटींचा निधी आम्ही खेचून आणला.
उद्या या पुढील काळामध्ये आम्ही दुप्पट
निधी आणल्याशिवाय रहाणार नाही. असे भाजपाचे विद्यमान आमदार व उमेदवार समाधान दादा आवताडे यांनी आज राझणी येथील प्रचार सभेत बोलताना सांगितले.
या वेळी उपस्थित माजी आमदार प्रशांत परिचारक व अन्य मान्यवर नेते व असंख्य कार्यकर्ते होते.
पंढरपूर आणि मंगळवेढा मतदार संघातील गावखेडयातील रस्ते, त्या रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण व सिमेंटचे रस्ते बनवले गेल्यामुळे पावसाळ्यामध्ये होणारी शेतकऱ्यांचे होणारी हाल कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण पिकवलेले फळे, भाजीपाला या पिकांची वाहतूक करण्यासाठी शेतकऱ्याला अतिशय त्रास होत होता. शेतकऱ्यांनी पिकवलेला माल त्याचा राना मधून बाहेर जाताना अतिशय अडचणी येत होत्या आम्ही शेतकऱ्याच्या शेतापर्यंत रस्ते करण्याची काम आम्ही केलेली आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेला माल हा ताबडतोब मुख्य रस्त्याला येऊन बाजारपेठेमध्ये लवकरात लवकर कसा जाईल याची काळजी घेण्याचे काम आम्ही केलेले आहे.
मतदार संघातील समाज मंदिरे तसेच संविधान भवन, मंदिरांचा जिर्णोद्धार, व्यायाम शाळा अशा अनेक समाज उपयोगी ठरणाऱ्या कामाला आम्ही कोट्यावधीचा निधी दिलेला आहे. मतदार बंधू भगिनींनी आम्हाला पुन्हा एकदा निवडून देण्याची संधी दिल्यास मी विधानसभेचा आमदार म्हणून आणि प्रशांतराव परिचारक हे विधान परिषदेचे आमदार म्हणून आम्ही दोघे मिळून पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र राज्यातील पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ हा एकमेव असा असणार आहे की या मतदारसंघांमध्ये सर्वात जास्त विकास कामे झालेले असतील अशी ग्वाही आज मी तुम्हाला देत आहे. येत्या 20 तारखेला कमळ चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करावे असे नम्रतेचे आव्हान करीत आहे. असे समाधान आवताडे यांनी आपल्या प्रचार सभेमध्ये राझणी या गावी जमलेल्या लोकसमुदायासमोर बोलत असताना त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा