"वाळू उपसा करणार्या मंडळीच्या हाती माढा मतदारसंघ न देता विकासकामे करु पहाणार्या रणजित शिंदे यांना विजयी करा"........ माजी सभापती शिवाजीराव काबळे "विरोधकांच्या भूलथापाना मतदारांनी बळी पडू नये"..... बबनदादा शिंदे
पंढरपूर.... प्रतिनिधी..
वाळू उपसा करणारे आणि विकासाचे कोणतेही व्हिजन नाही.विकासाचे कसले ही धोरण नाही.शेतकऱ्यांची दिशाभूल करणार्या अशा थापेबाज विरोधी उमेदवाराला
पराभूत करा आणि विकासमे करुन विकासाचा डोंगर उभा करणारे बबनदादा शिंदे यांचे कर्तृत्वान मुलाला विधासभेत जाण्याची संधी मतदारांनी द्यावी असे आवाहन जिल्हापरिषद चे माजी समाज कल्याण सभापती शिवाजी काबळे यांनी माढा मयदार संघातील मानेगाव गटातील केवड, जामगांव, अजनगाव उमाटे येथील प्रचार सभेत केले.
यावेळी आमदार बबनदादा शिंदे यांनी आपण केलेली विकास कामाची यादी मतदारांच्या पुढे सादर केली.आरोग्य केद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, ठिकठिकाणी आरोग्य केद्र उभारणी, विविध योजनेतून रस्ते व डाबरीकरण, शैक्षणिक संस्था, डी फार्मसी, बी फार्मसी, महाविद्यालय, कृषी विद्यालय, जलसिचनाच्या विविध योजना राबवल्या आहेत. वीजेचे सब स्टेशन व नवीन ट्रान्सफारमर अशी अनेक विकास कामे केली आहेत. मी केलेल्या विकासकामाला पुढे नेन्याचे काम रणजित शिंदे हे करतील.
विरोधकांच्या भूलथापाना मतदारांनी भूलून जाऊ नये. खोटे बोल पण रेटून बोल ही नीती विरोधक अवलंबत आहे. भूलथापाना बळी पडू नका. असे आवाहन बबनदादा शिंदे यांनी मतदारांना केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा