ही आरपार ची लढाई आहे. तुमच्या पाठींबा ची गरज आहे......... भगिरथ भालके.


 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीतील  महाविकास आघाडीचे काँग्रेस आयचे उमेदवार भगीरथ भालके यांनी आज माचणूर येथील सिध्देश्वर मदीर या ठिकाणी महादेवाचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. त्यांच्या सोबत खासदार प्रणिती शिंदे या उपस्थित होत्या.
   असंख्य कार्यकर्ते च्या समवेत भगिरथ भालके यांनी दर्शन घेऊन आपल्या प्रचार सभेला सुरुवात केली.
    विरोधकांनी अफवा पसरवून मतदाराच्या मनामध्ये संभ्रम निर्माण केला आहे. अशा विरोधकाला खड्यासारखे बाजूला करण्याची वेळ आली आहे. मतदार बंधूनो आता आरपारची लढाई सुरु झाली आहे. तुमच्या पाठींबा ने मी ही लढाई जिंकणार आहे. आता गाफील राहून चालणार नाही.
   कै. भारत नाना यांनी अथक प्रयत्न करून मंगळवेढा तालुक्यातील चोवीस गावातील पाणी योजना मंजूर करून आणली त्याचे क्रेडिट हे विरोधक स्वतः कडे घेत आहेत. पंढरपूर मधील तरुणांना एम. आय. डी. सी. चे गाजर दाखवून दिशाभूल केली जात आहे. अशा लोकप्रतिनिधी ला मतदारांनी घरचा रस्ता दाखवावा.
    पंढरपूर शहरातील यात्रेत गरीब कष्टकरी आपली हातगाडी घेऊन व्यापार करतात. अशा लोकांना अतिक्रमण च्या नावाखाली प्रशासनाने त्रास दिला गेला तेव्हा हे प्रतिनिधी शांत बसून होते. तेव्हा आम्ही या फेरीवाले ची बाजू घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही पुढे झालो. सद्याच्या लोकप्रतिनिधी ने या कष्टकरी फेरीवाले कडे दुर्लक्ष केले आहे. अशा लोकप्रतिनिधी ना घरी बसवण्याची वेळ आली आहे. या निवडणूक मध्ये परिवर्तन निश्चित आहे. मतदारांनी मला साथ द्यावी मी बदल घडवल्या शिवाय रहाणार नाही. असे उमेदवार भगिरथ भालके यांनी आपल्या प्रचारसभेत आपली भूमिका व्यक्त केली. यावेळी हजारोच्या संख्येने कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....