माजी नगराध्यक्षा व नगरसेवकाच्या प्रवेशामुळे समाधान दादा आवताडे यांचे मताधिक्य वाढणार
उज्वला भालेराव, आणि महादेव धोत्रे यांचा पांडुरंग परिवारामध्ये प्रवेश.
पंढरपूर प्रतिनिधी....
आज पंढरपूर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा उज्वला भालेराव व महादेव धोत्रे यांनी पाङुरंग परिवार मध्ये प्रवेश केला. यावेळी दिलेल्या मुलाखती मध्ये उज्वला भालेराव यांनी आपल्या प्रवेशा बाबत त्यानी आपली भूमिका माडली. गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही ठरवत होतो. परिचारक यांच्या सोबत काम करायचे कारण परिचारक यांनी मी नगराध्यक्षा असताना सहकार्य केले आहे. आज पर्यंत आम्ही भालके गटाकडे होतो. माझे पतीच्या निधना नंतर व कै. भालके यांच्या निधना नंतर आमच्या कडे कुणी लक्ष दिलेले नाही.
भाजपा पक्षाने गोरगरीबाच्या साठी चांगल्या योजना राबवत आहेत. तसेच परिचारक यांची आम्हाला साथ लाभणार आहे. भाजपा पक्ष हा कशी वागणूक देतोय ते पहाण्यासाठी आम्ही प्रवेश केला आहे.
आमच्या प्रभागातील विकासकामे तसेच गोरगरीब लोकांची कामे ही लवकर होण्यासाठी आम्ही फक्त प्रभागातील जनतेचा विचार करून हा प्रवेश केला आहे.या मागे कोणताही वाईट हेतू नाही.
आम्ही केलेल्या कार्यामुळे या भागातील जनतेने निवडून दिले आहे. आमच्या प्रभागाचा विकास व्हावा म्हणून आम्ही व महादेव धोत्रे यांनी प्रवेश केला आहे असे माजी नगराध्यक्षा उज्वलाताई भालेराव यांनी आपल्या मुलाखती मध्ये त्यानी सांगितले

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा