"माढ्याचा खासदार बदलला आहे आता आमदार बदलूया "........ अभिजित आबा पाटील
पंढरपूर... प्रतिनिधी..
ज्याप्रमाणे आपण माढा मतदारसंघाचा खासदार बदलला त्याप्रमाणे आता माढा तालुक्याचा आमदार आपल्याला बदलायचा आहे. असे माढा तालुक्यातील विधानसभा निवडणूकीचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अभिजित आबा पाटील यांनी आज भीमा नदीच्या काठावर वसलेल्या
चिंचोली भोसे या गावी प्रचार सभेमध्ये बोलत असताना ते म्हणाले.
या शरदचंद्रजी पवार यांनी या माढ्याच्या आमदाराला मोठे केले. त्याच शरद पवारांना सोडून हे गेलेले आहेत. पक्षाचे तिकीट मिळाले नाही म्हणून त्यांनी अपक्ष अर्ज भरलेला आहे. गेली 30-35 वर्षे आमदारकीच्या कार्यकिर्दी मध्ये माढा तालुक्याचा विकास केला नाही. स्वतःच्या कुटुंबाचा फक्त विकास करून सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी ट्रॅक्टर चालक यांच्यावर कर्ज काढून त्यांना कर्जाच्या खाईत लोटणारे हे अपक्ष उमेदवार आज पुन्हा एकदा ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये ते उभे राहिले आहेत. माढा तालुक्यातील जनता हे आता दूध खुळी राहिलेली नाही. येत्या 20 तारखेला ज्याप्रमाणे माढा मतदारसंघाचा खासदार बदलला त्याच प्रमाणे माढा तालुक्यातील देखील आमदार बदलला जाणार आहे.
माढा मतदारसंघांमध्ये कुठल्याही सुख सुविधा आरोग्य शिक्षण त्याचप्रमाणे मूलभूत सुविधा या उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. तरीही हे अपक्ष उमेदवार मतदाराकडे कोणत्या तोंडाने येतात.
महा विकास आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण माढा तालुक्याचा कायापालट केला जाणार आहे. माढा तालुक्यातील शैक्षणिक दुरावस्था, त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे गोरगरीब जनतेला उपचारासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. अन्य तालुक्यामध्ये जावे लागते. माढा तालुक्यातील रस्ते तसेच पाण्याची अवस्था सोचनीय झालेली आहे. उजनी धरण उशाला आणि कोरड घशाला अशा पद्धतीची अवस्था माढा तालुक्यातील शेतकऱ्यांची झालेली आहे. अद्यापही काही गावाला पाणी मिळालेले नाही. पाणी वाटपामध्ये देखील हेवेदावे केले जातात.
येत्या काळात भीमा नदीवर हाड्रालिक पद्धतीचे बंधारे केले जातील. जेणे करुन पाण्याची गळती थांबवली जाईल. या बंधार्याची ऊची वाढवली जाईल म्हणजे माढा तालुक्याला पाण्याची टंचाई भासणार नाही. पाण्याचे योग्य नियोजन केले जाईल. ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांना ऊसाला चांगला दर दिला जाईल.
महाविकास आघाडीच्या पंचसुत्री योजने अतर्गत महिलांना तीन हजार रुपये दरमहा दिले जाणार, महिलांना मोफत प्रवास, पंचवीस लाखा पर्यंत चा औषध्पोचार मोफत दिला जाणार. अशा अनेक कल्याणकारी योजना महाविकास आघाडी राबवणार आहे. माढा तालुक्याचा तसेच संपूर्ण राज्याचा विकासाला चालना दिली जाण्यासाठी महाविकास आघाडीला विजयी करायचे आहे. असे आवाहन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अभिजित आबा पाटील यांनी चिन्चोली भोसे या गावी प्रचार सभेत मतदारांना केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा