"सर्वच बाबतीत बदल घडवण्यासाठी मी निवडणूक लढवीत आहे. "..... अभिजित आबा पाटील.
पंढरपूर प्रतिनिधी.....माढा विधानसभा मतदार संघामध्ये पंढरपूर तालुक्यातील काही गावे समाविष्ट झालेल्या पैकी मेढापूर ते पान्ढरेवाडी या दरम्यान अभिजित पाटील यांची बाईक रेली काढून ग्रामस्था कडून जोरदार स्वागत करण्यात आले.
या वेळी बोलताना अभिजित पाटील म्हणाले की सर्वसामान्य जनतेला मदतीचा देणे, संपूर्ण माढा मतदार संघाचा सर्वागिण विकास झाला पाहिजे. या मतदार संघात मुलभूत सुविधा उपल्पध झाले पाहिजे. शैक्षणिक दुरावस्था दूर झाली पाहिजे. या भागातील विद्यार्थी हा उच्च शिक्षणासाठी वेगळ्या भागात जावे लागते. या माढा तालुक्यात उच्च शिक्षणाची सोय, इजिनिअरीग महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, आ्य. टी. आय. सारखे शैक्षणिक संस्था आल्या पाहिजे.
संपूर्ण माढा तालुक्याचा विकास करण्यासाठी, परिवर्तन करण्यासाठी मी निवडणूकीस उभा आहे. गेली तीस वर्षे सत्ता ताब्यात असूनही या तालुक्याला सर्व सुविधा पासुन वंचित ठेवले आहे. अशा बिनकामाच्या नेतृत्वाला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. आता बदल निश्चित आहे. मतदारांनी मला साथ द्यावी बदल घडवल्याशिवाय मी राहणार नाही. असे आपल्या मनोगतात अभिजित पाटील यांनी व्यक्त केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा