काँग्रेसचे नगरसेवक लखन चौगुले व त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये केला प्रवेश.... समाधान आवताडे यांचे पारडे जड
.
पंढरपूर.. प्रतिनिधी.. पंढरपूर नगरपालिकेचे काँग्रेसचे नगरसेवक लखन चौगुले व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज रोजी भाजपा या पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
यावेळी नगरसेवक लखन चौगुले यांच्यासोबत रामा चौगुले दीपक चौगुले यांचा आमदार समाधान दादा अवताडे व अँड डिसलरीज चे चेअरमन उद्योजक यांच्या उपस्थितीमध्ये केलेला आहे.
नुकतेच दोन दिवसा खाली पांडुरंग परिवार चे प्रमुख प्रशांतराव परिचारक व उमेश राव परिचारक पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष उज्वला भालेराव व नगरसेवक महादेव धोत्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. या दोघांच्या भाजपा प्रवेशानंतर पंढरपूर शहरामध्ये भाजपा या पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे व आमदार समाधान दादा अवताडे यांना पुन्हा एकदा आमदार करण्याच्या उद्देशाने हे सर्व मान्यवर नगराध्यक्ष व नगरसेवक हे भाजपामध्ये प्रवेश करीत आहेत.
भाजपाचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी आपल्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी केलेले विकास कामे पाहून व सर्वसामान्य जनतेला सामावून घेणे चे व त्यांचे कामे करण्याची कार्यपद्धती पाहून अनेक जण भाजपामध्ये प्रवेश करून समाधान अवताडे यांना होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये समाधान आवताडे यांना विजयी करण्यासाठी या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. असे प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी सांगितले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा