"माढा तालुक्याचा मस्तवाल हत्तीची सोंड कापण्याचे काम शरद पवार यांनी मला दिले आहे. " अभिजित आबा पाटील.
पंढरपूर( प्रतिनिधी). गेल्या तीस वर्षाच्या कालावधीमध्ये विकास कामे ही झालेली नाहीत आमदारकीच्या कालावधीमध्ये एक साखर कारखाना आपल्या स्वतःच्या मालकीचा बनवून विरोधकांनी आपल्या तीस वर्षाच्या कालावधीमध्ये तीन चार साखर कारखाने ही उभी केली आहेत या कारखान्यामधून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाचा काटा मारून त्यांनी आपले घर भरण्याचे काम केले आहे हे माढा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी सांगत आहेत शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करणारे या विरोधकाला घरी बसवायची वेळ आलेली आहे सत्तेच्या माध्यमातून पैसा आणि पैशाच्या माध्यमातून सत्ता असे षडयंत्र रचत शेतकऱ्यांचे फक्त शोषण करण्याचे काम या विरोधकांनी केले आहे. या माढा तालुक्यातील मस्तवाल हत्तीची सोंड कापण्याचे काम माननीय शरदचंद्रजी पवार यांनी मला दिले आहे.
निवडणुकीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अभिजीत आबा पाटील यांनी आज आपल्या प्रसार सभेमध्ये उपळाई बुद्रुक या ठिकाणी केले.
यावेळी उपस्थित मान्यवर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आणि माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे सर यावेळी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलत असताना अभिजीत आबा पाटील म्हणाले माढा तालुक्यातील कुठलीही शैक्षणिक सुविधा उच्च शिक्षणाचे कॉलेजेस ही विद्यार्थ्यांच्या साठी आणलेली नाहीत या भागातील विद्यार्थी हा पर जिल्ह्यामध्ये जात असून या माढा तालुक्यामध्ये एकही उच्च शिक्षणाचे द्वार खोली केलेले नाही. माढा शहरातील दुरवस्था पाहिल्यानंतर असे म्हणावे लागेल की हा तालुका आहे की एखाद्या खेडेगाव अशी अवस्था करण्यास कारणीभूत हे फक्त येथील आमदार कारणीभूत आहेत.
माढा शहरातील युवकाचे लग्न झाल्यानंतर तू आपल्या पत्नीस बगीच्या मध्ये फिरायला घेऊन जाऊ शकत नाही कारण या माढा शहरामध्ये साधी बाग देखील नाही. माढा तालुक्यामध्ये पाणी उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था या या 35 वर्षातील राजकीय कारकीर्द करणाऱ्या आमदारांनी केले आहे फक्त आपल्या बगलबच्चांच्या गावापुरतेच हे पाणी नेण्याचे काम आमदार साहेबांनी केले आहे. हे सर्व बदलायचं असेल परिवर्तन करायचं असेल तर मला फक्त एकदा संधी द्या. मी संपूर्ण माढा तालुक्याचा या मतदार संघाचा चेहरा मोरा बदलल्याशिवाय राहणार नाही विकासाची गंगा आणण्याचे काम मी माननीय शरदचंद्रजी पवार आणि जयंत पाटील यांच्या मार्गदर्शना मधून करणार आहे. असे माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अभिजीत आबा पाटील यांनी आपल्या प्रचार सभेमध्ये बोलताना आपले मनोगत व्यक्त केले.
उपळाई येथील या प्रचार सभेला हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा