"तुम सिकंदर हो..... रोने का नहीं "...... खासदार सुप्रिया सुळे.


 पंढरपूर.... प्रतिनिधी....

    आज पंढरपूर मंगळवेढा विधानसभा उमेदवार अनिल सावंत यांची निवडणूक प्रचार सभा मंगळवेढा येथे झाली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे या आपले भाषण सुरु असताना एक मुस्लिम जेष्ट नागरिक डोळयांत पाणी आणून अनावर होऊन बोलत असता त्यांनी आपल्याला व आपल्या मुस्लिम समाजाला या भाजपा सरकारच्या राजवटी मध्ये भीती वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. सद्या राज्यात व देशात अल्पसंख्यांक समुदायाला असुरक्षित वाटू लागले आहे. बटेगे तो कटेगे या घोषणे मुळे राज्यातील या मुस्लिम समुदायाला भीती वाटू लागल्याचे त्यांनी सांगितले. जो एकोपा व सर्वधर्म समभाव हा देशात नांदत होता. बटेंगे तो कटेंगे या घोषणेमुळे मुस्लिम समुदायांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असेच या घटनेवरून  आज रोजी दिसून येत होते. सिकंदर नामक मुस्लिम वृद्ध यांनी आपल्याला वाटणारी भीतीही खासदार सुप्रिया सुळे यांना त्यांचे भाषण सुरू असताना सांगितले. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी त्या वयोवृद्ध वडीलधारी माणसाला त्या म्हणाले तुम तो सिकंदर हो लढवय्ये हो लढने का डरने का नही  असे सांगून त्यांनी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर  अल्पसंख्यांक धर्माच्या लोकांना सुरक्षितता लाभून देण्याचे काम व त्यांचे रक्षण करण्याचे काम त्यांनी आपले हे सरकार करणार आहे असे सांगितले.

      राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत हे गेली पंधरा वर्षे झाले मंगळवेढा परिसरामध्ये आपला उद्योग व्यवसाय करीत आहेत. त्या माध्यमातून त्यांनी शेतकरी कष्टकरी व तरुण बेरोजगारी लोकांच्या हाताला काम देण्याचे धोरण अवलंबलेले आहे. मंगळवेढा पंढरपूर परिसरातील शेतकरी बेरोजगार तरुण व महिलांना सक्षम करण्याचा उद्देशाने शरद पवार यांनी अनिल सावंत यांना या मतदारसंघातून उमेदवारी त्यांना दिलेली आहे. संपूर्ण पंढरपूर मंगळवेढा मतदार संघ व संपूर्ण सोलापूर जिल्हा हा शरद पवार यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामधून  राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाचे सर्व उमेदवार निवडून येतील. येत्या 20 तारखेला पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमधून अनिल सावंत यांची चिन्ह तुतारी या तुतारी समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा. या परिसरातील सर्व अडचणी या सोडवल्या जातील. 

    महाविकास आघाडीच्या वतीने निवडणुकीचा जाहीरनामा जाहीर केलेला असून यामध्ये महिलांना तीन हजार रुपये दरमहा देण्याची ठरवले आहे. त्याचप्रमाणे महिलांना मोफत एसटी प्रवास करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची सर्व कर्ज माफ करण्यात येणार आहेत. महागाई ची झळ सर्वसामान्यांना बसत असल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा दर हा पाच वर्षे सारखाच राहणार आहे. त्यामध्ये कुठलाही बदल केला जाणार नाही, वाढ केली जाणार नाही. असे त्यांनी सांगितले.

    पंढरीच्या विठुरायानेच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी माळकरी उमेदवार म्हणून अनिल सावंत यांना पाठवले आहे. त्यांना या येत्या 20 तारखेला तुतारी समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन त्यांनी मतदार बंधू-भगिनींना केले.

    यावेळी उपस्थित प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा संघटक सुधीर भोसले, काशिगाव चे वसंत नाना देशमुख राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे महिला आघाडीचे नेते ताड मॅडम, साहित्यिक श्रीमंत कोकाटे, मंगळवेढातील शहा शेटजी, आधी असंख्य मानेवर यावेळी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....