"परिचारकाच्या कार्यकर्तेनी आम्हाला सहकार्य करावे"......... अनिल सावंत


 पंढरपूर.. प्रतिनिधी.........

     परिचारक कुटुंब हे शरद पवारांना मानणारे कुटुंब आहे. पुरोगामी विचाराने आपले कार्य करणारे नेते आहेत. भाजपाने त्यांना शब्द देऊनही तो शब्द भाजपाने व त्यांचे नेतेमंडळीने पाळला नाही. त्यांच्या उमेदवारी च्या मागणीला नकार देऊन फक्त्त झुलवत ठेवण्याचे काम भाजपाने केले. परिचारक यांच्या कार्यकर्ते या घटनेमुळे नाराज झाल्याचे दिसून येत आहेत.

    आपल्या नेत्यांना झुलवत ठेवणार्या भाजपा या पक्षावर राग काढण्याची हीच संधी आहे आम्हाला व शरद पवार यांच्या पक्षाला या निवडणूक मध्ये सहकार्य करण्याचे आवाहन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांनी कोर्टी या गावी केले.

    या प्रचार सभेला जिल्हा संघटक सुधीर भोसले, नागेश फाटे, कासेगाव चे नेते वसंत नाना देशमुख, मुलाणी,व अन्य मान्यवर उपस्थित होते.

    या प्रचार सभेत पुढे बोलत असता ते म्हणाले भाजपाने जाती जातीत द्वेष पेरण्याचे काम केले आहे. महागाई वाढवून गोरगरीबाचे कंबरडे मोडले आहे. भाजपाच्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत. लाडकी बहिण योजना द्वारे पैसे देऊन त्या पाठीमागे या सरकारने शंभर रुपये असलेले तेल दीडशे रुपये वर नेऊन ठेवले असे पैसे दिले आणि महागाई वाढवून काढून घेतले. अशा फसव्या सत्तेला खाली खेचले पाहिजे. आपला विरोधक हा भाजपा पक्ष आहे. या सत्तेची मस्ती व मनमानी येत्या वीस तारखेला भाजपा विरोधात मतदान करुन महाविकास आघाडीचे उमेदवारांना विजयी करा असे आवाहन उमेदवार अनिल सावंत यांनी कोर्टी ग्रामस्थाना केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....