"आमदार समाधान आवताडे यांना मंत्री पद मिळावे"........


 पंढरपूर प्रतिनिधी......

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघामधून सलग दुसरे वेळी आपल्या कार्याच्या जोरावर त्यांनी या मतदारसंघामधून विजय मिळवत आपण या मतदार संघातील योग्य प्रतिनिधी असल्याचे सिद्ध केले आहे.

    पंढरपूर मंगळवेढा मतदार संघामध्ये हजारो कोटींचा विकास निधी आणून विकास कामाना गती देण्याचे काम केले आहे.मंगळवेढा तालुक्यातील कित्येक गावाला पिण्याचे पाणी तसेच शेतीला मुबलक पाण्याची सोय म्हणून आवताडे यांनी मंगळवेढा उपसा सिंचन, आणि तामदर्डी बंधारा अशा प्रकारे त्यांनी या भागातील पाणीप्रश्न मिटवण्याचे प्रयत्न करुन ते मार्गी लावले  आहे.

    पंढरपूर शहरातील विकास कामे, मराठा भवन आणि मतदार संघात असंख्य ठिकाणी समाज मंदीर, संविधान भवन, व्यायाम शाळा उभारणी, ग्रामीण भागातील रस्ते, आदी असंख्य कामे त्यांनी आपल्या आमदारकीच्या चार वर्षीच्या कारकिर्दीत पूर्ण केली आहेत.

    एक सुशिक्षित उच्चविद्या धारण करणारे हे युवा नेतृत्व या मतदार संघाला लाभले आहे. आज पर्यंत या मतदार संघाला कोणतेही मोठे पद लाभलेले नाही. आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या अभ्यासूपणाने त्यांनी महाराष्ट्र राज्य सरकारच्या शासन दरबारी तालिका पीठाचे अध्यक्ष पद भूषवण्याचे कार्य देखील चांगले प्रकारे पार पाडले आहे. अशा उमद्या युवा नेतृत्वाला मंत्री पदाची जबाबदारी दिल्यास ते योग्य प्रकारे पार पाडतील. पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील प्रलंबित कामे, तसेच पंढरपूर शहरातील विकास कामे पार पडतील. अशी आशा या मतदार संघातील सर्वसामान्य जनतेला आहे.

    या मतदार संघाला आजपर्यंत कोणतेही मोठे पद मिळाले नाही. या मतदार संघावर आजपर्यंत काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वर्चस्व आजपर्यंत होते. या दोन्ही पक्षाचे वर्चस्व नाहीसे करण्याचे काम भाजपचे आमदार समाधान दादा आवताडे यांनी केलेले आहे. समाधान आवताडे यांना पुन्हा एकदा राजकीय ताकद मिळवून द्यायचे असेल तर या पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाला मंत्रीपद देऊन हा मतदारसंघ भाजपमय करून टाकावा अशी मनोमन इच्छा येथील सर्वसामान्य जनतेची आहे. पाहूया  आता भाजपा व शिवसेना शिंदे गट, तसेच राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे सरकार आमदार समाधान आवताडे यांना मंत्रीपद देते का ते पहावे लागेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....