"हजारो कार्यकर्ते पैकी एक निघून गेला आहे..... तर 999 कार्यकर्ते मला विजय मिळवून देतील "........ भगिरथ भालके


 पंढरपूर प्रतिनिधी......

     खर्डी येथील प्रचार सभेत बोलत असता भगिरथ भालके म्हणाले दामाजी साखर कारखाना निवडणूकीतील समविचारी आघाडी मधील एक कार्यकर्ता निघून गेला आहे. काही हरकत नाही. मला या विधानसभेच्या निवडणुकीत 999 कार्यकर्ते हे विजयी केल्याशिवाय राहणार नाही. असे भगिरथ भालके यांनी खर्डी येथील प्रचार सभेत बोलताना म्हणाले.

     पंढरपूर शहरातील काही जुनी मंडळी  स्वार्थापोटी माझी साथ सोडून जात आहे. ही मंडळी नगरपालिकेच्या उमेदवारीच्या आशेने गेली आहेत. पंढरपूर ची जनता या स्वार्थी लोकांना ओळखून आहे. पंढरपूर शहरातील माझे काम पाहून मला शहरातील मतदार विजयी करतील.

    आम्ही कधीही दुजाभाव केला नाही.

गटतट पाहिले नाही. सर्वसामान्य जनतेची कामे करणे, त्यांना अडचणीच्या काळात मदत करणे हे मला माझ्या वडीलानी शिकवले आहे. मतदार संघातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नाही. दुधाला वाढीव दर मिळत नाही. भाटगरचे पाणी शेवटच्या शेतकऱ्यांपर्यत पोहचत नाही. यासाठी कधी विधानसभा मध्ये आवाज या आमदारांनी उठवला नाही.अशा लोकप्रतिनिधी ला घरी बसवण्याची वेळ आली आहे.

     महाविकास आघाडी पंचसुत्री  योजना राबवणार आहे. या योजनेत पदवीधर युवकांना दरमहा चारहजार रुपये देण्याचे नियोजन आहे. माता भगिनींना दरमहा तीन हजार रुपये दिले जाणार आहे. जनतेच्या आरोग्याची काळजी म्हणून पंचवीस लाख रुपये पर्यंत चा वैद्यकीय खर्च मोफत केला जाणार आहे. शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाणार आहे. महिलांना एस. टी. प्रवास मोफत केला जाणार आहे. अशा अनेक कल्याणकारी योजना महाविकास आघाडी राबवणार आहे. अशी माहिती उमेदवार भगिरथ भालके यांनी आज खर्डी येथील प्रचार सभेत सांगितली. या प्रचार सभेला अलोट गर्दी जमली होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....