तीन हजार कोटींचा निधी खर्च केलात.,.... तर मत मागत फिरता कशाला?....... माजी आमदार रमेश कदम
पंढरपूर.... प्रतिनिधी...
जर या आमदारांनी तीन हजार कोटींचा निधी या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात विकास कामावर खर्च केला आहे तर मग या निवडणुकीत प्रचार करीत मते का मागत फिरत आहेत. त्यांनी निवांत घरी बसून राहायला हवे होते. कशासाठी मग फिरत आहेत. असे मोहोळ तालुक्याचे माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचार सभेत पंढरपूर येथील संत पेठ परिसरामध्ये आपल्या भाषणात म्हणाले.
अनिल सावंत हे उमेदवार नवीन चेहरा आहे. त्यांनी या मतदारसंघात मंगळवेढा येथे भैरवनाथ शूगर साखर कारखाना काढून या भागातील अनेक तरुणांना काम दिले आहे. त्यांचे संसार उभे केले आहेत. शेतकऱ्यांच्या ऊस गाळपाची सोय करुन आर्थिक बाबती या शेतकऱ्यांना सक्षम केले आहे. आधी काम केले आहे मगच ते येथील जनतेला मतदान मागत आहेत. कोणतीही खोटी आश्वासने ते देत नाही. अशा निर्व्यसनी माळकरी उमेदवाराला आपल्या मतदार संघात सेवा करण्याची संधी जनतेनी द्यावी असे आवाहन रमेश कदम यांनी मतदारांना केले.
या मतदार संघात मातंग समाज मोठ्या प्रमाणात आहे. या माझ्या समाजातील बंधू भगिनींना मी नम्रपणे सांगतो येत्या वीस तारखेला कुठल्याही प्रकारची" वाई "न करता तुतारी या चिन्हासमोरील बटन दाबून अनिल सावंत यांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.
या मतदार संघातील रस्ते, आणि मागेल त्याला पाणी स्व खर्चाने देण्याचे अभिवचन अनिल सावंत यांनी दिले आहे. असे आपल्या प्रचार सभेतील भाषणात म्हटले आहे. या उपस्थित नेते माजी नगराध्यक्ष सुभास भोसले, संदीप माडवे, सुधीर भोसले, अमर सुर्यवंशी, वसंत नाना देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा