पोस्ट्स

" दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक सर्व सुविधा बाबत अग्रेसर..... आज मोबाईल बँकिंग ॲप व यूपीआय सेवेचा शुभारंभ " चेअरमन अमरजीत पाटील

इमेज
  पंढरपूर प्रतिनिधी            सोलापूर जिल्ह्यातील नामांकित म्हणून ओळखली जाणारी व्यापारी बँक पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक पंढरपूर या बँकेने गेली 65 वर्ष सर्वसामान्य ग्राहक सभासद व्यापारी यांना अत्यंत उत्कृष्ट सेवा देण्याचे काम केलेले आहे.     दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेने आपल्या बँकिंग क्षेत्रामध्ये नामलौकिक मिळवत सातत्याने अग्रेसर ठरलेली व असंख्य पुरस्कार प्राप्त असलेली पंढरपूर मर्चंट बँक या बँकेने आता सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अन्य बँकेच्या पेक्षा सर्व सुविधांनी युक्त अत्याधुनिक सेवा सुविधा देण्याचे काम केलेले आहे. दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक यांनी आपल्या ग्राहकांसाठी व सभासद खातेदारांसाठी मोबाईल बँकिंग ॲप यूपीआय अशा अनेक सुविधा ग्राहकांना मिळाव्यात म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथमच सहकार क्षेत्रातील या बँकेने ही सुविधा ग्राहकांसाठी व खातेदारांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे आज या मोबाईल बँकिंगच्या ॲप व यूपीआय सुविधांचा शुभारंभ सोहळा आज पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर या ठिकाणी शुभारंभ सोहळ...

" भालके यांनी सत्ताधारी गटामध्ये का सामील होऊ नये?.

इमेज
 पंढरपूर प्रतिनिधी.      विधानसभेच्या एक पोट निवडणूक आणि एक विधानसभा निवडणूक या दोन निवडणुकीमध्ये विजयाच्या जवळपास मताध्यक्ष मिळवणारा करून व्यक्तिमत्व म्हणून भगीरथ भालके यांच्याकडे पाहिले जाते.आपले वडील कै. भारत नाना भालके यांच्या पेक्षा देखील सातत्याने अधिक मत घेणारी व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे भगीरथ भालके थोड्याफार फरकाने पराभव पत्करलेले भगीरथ भालके यांच्यासाठी भविष्य काळामध्ये पंढरपूर तालुक्याचे आमदारकी भूषवण्याची योग येणार हे यावरूनच दिसून येते.      भगीरथ भालके यांच्यावर पक्ष बदलू म्हणून आरोप केला जातो परंतु सर्वसामान्य जनतेचे गोरगरीब शेतकरी कष्टकरी ऊस उत्पादक यांचे जर का प्रश्न सोडवायचे असतील तर विरोधी गटांमध्ये राहून जनकल्याणाची कामे विकास कामे ही होऊ शकत नाही हे कोणीही सांगू शकेल. नुकत्याच झालेल्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी डॉ. प्रणीती ताई भालके यांनी प्रचंड मताधिक्य मिळवून नगरपालिकेमध्ये असलेले प्रस्थापितांचे मनसुबे  आणि मक्तेदारी मोडीत काढण्याचे काम प्रणिती भालके यांनी केलेले आहे त्यामुळे सत्ताधारी गटामध्ये सामील अस...

" दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेने NPA 0% राखण्यात अग्रेसर" ... चेअरमन अमरजीत पाटील.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर या ठिकाणी असलेली व्यापारी बँक म्हणून ओळखली जाणारी दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक पंढरपूर या व्यापारी बँकेच्या विविध ठिकाणी शाखा असून प्रधान कार्यालय पंढरपूर या ठिकाणी आहे या व्यापारी बँकेच्या वार्षिक अहवालामध्ये सात कोटी सत्तर लाख बारा हजार रुपयाचा बँकेला नफा  झाला असून दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक ही संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये आदर्श बँक पुरस्कार प्राप्त अशी बँक म्हणून ओळखली जाते. दी पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेने एनपीए शून्य टक्के राखण्यामध्ये अग्रेसर ठरल्याची माहिती चेअरमन अमरजीत पाटील यांनी आज रोजी दिली         बँकेचा एनपीए शून्य टक्के राखण्यासाठी बँकेचे सर्व सभासद कर्जदार व ग्राहक आणि कर्मचारी वर्ग यांनी अथक प्रयत्न केलेले आहेत या सर्वांच्या सहकार्यामुळे आज ते पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक ही प्रगतीपथाकडे वाटचाल करीत असल्याची माहिती देखील चेअरमन अमरजीत पाटील यांनी दिली      दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे महाव्यवस्थापक अतुलजी म्हमाने त्याचप्रमाणे सर्व व्यवस्थापक कु...

" दि मर्चंट बॅंक च्या वतीने युवा उद्योजक सन्मान सोहळा" स्थळ....दि पंढरपूर मर्चंटस को ऑप. बॅंक लि . पंढरपूर

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) शनिवार दिनांक 14 मार्च 2026 रोजी पंढरपूर शहरातील व्यापारी बँक म्हणून ओळखली जाणारी ती पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक पंढरपूर यांच्या वतीने " युवा उद्योजक"मार्गदर्शन मेळावा व सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाप्रसंगी 100 युवा उद्योजकांचा सन्मान करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे युवा उद्योजकांना उद्योगा साठी व आवश्यक असणारे मार्गदर्शन केले जाणार आहे.     युवा उद्योजकांना दि.पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक येथील वि.औ.तथा बाबुराव म्हमाने सभागृह या ठिकाणी महाराष्ट्र राज्याने सुरू केलेल्या विविध महामंडळाच्या माध्यमातून अर्थपुरवठा केला जातो याची माहिती आणि कोणकोणते आर्थिक विकास महामंडळ आहेत त्याची यादी पुढीलप्रमाणे आहे.     अण्णासाहेब पाटील आर्थिक महाविकास मंडळ, जगद् ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, संत काशिबा गुरव आर्थिक विकास महामंडळ, संत सेनानी महाराज केश शिल्पी विकास महामंडळ, संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ,स्व.विष्णूपंत रामचंद्र दादरे( लोणारी )आर्थिक विकास महामंडळ, संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंड...

" लहान बाळांसाठी काय पण" डॉ.शीतल शहा.बालरोग तज्ञ

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) लहान बाळांच्या साठी काही पण या उद्देशाने पंढरपूर शहरातील सुप्रसिद्ध नामांकित बालरोग तज्ञ डॉक्टर शितल शहा हे पंढरपूर शहरांमध्ये कार्यरत आहेत.       डॉक्टर शीतल शहा हे नामांकित वैद्यकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते यांच्या रुग्णालयामध्ये असंख्य बालकांनी जन्म घेतलेला असून त्याचप्रमाणे बालकांच्या असंख्य आजार रोग यावर त्यांनी शस्त्रक्रिया व औषध उपचार करून या बालकांना जीवनदान दिलेले आहे असंख्य माता-भगिनींना पालकांना या डॉक्टर शितल शहा यांचा अतिशय चांगला अनुभव आलेला आहे अशी चर्चा संपूर्ण पंढरपूर शहरच नव्हे तर पंढरपूर तालुक्यांमध्ये केली जाते.        लहान बाळांसाठी आवश्यक असलेले कपड्यांचे दालन नॅपकिन्स पॅड लहान बालकांना लागणारे अन्य वस्तू व साहित्य माफक दरामध्ये मिळवून देण्याच्या उद्देशाने डॉक्टर शितल शहा यांनी पंढरपूर शहरांमध्ये भव्य दिव्य असे फर्स्ट क्राय या नावाचे कपड्याचे दालन सुरू झालेले आहे.     डॉक्टर शितल शहा यांच्या शुभहस्ते के बी पी कॉलेज पंढरपूर या चौकामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी व्यापारी संकुल या ठिकाणी भव्...

" रायबा हेच का? आपले स्वराज्य " या महानाट्याचा कार्यक्रम पंढरपूर शहरात...

इमेज
 पंढरपूर (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव च्या निमित्ताने पंढरपूर शहरातील सुप्रसिद्ध कर्नल भोसले चौक या ठिकाणी माननीय नागेश काका भोसले मित्र मंडळ यांच्या वतीने रायबा हेच का आपले स्वराज्य या महानाट्याचा प्रयोग शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी 2020 रोजी होणार असून तमाम शिवप्रेमी यांनी या महानाट्याचा त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील विविध प्रसंग पराक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आणि दूरदृष्टी या सर्वांगीण गुणांचा अविष्कार पाहण्याचा पंढरपूर शहरवासीयांना लाभ होणार आहे तरी पंढरपूर शहरातील आबाल वृद्ध करून तरुणी माता-भगिनी यांनी या महानाट्य पाहण्यास आवर्जून उपस्थिती दर्शवावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील हे महानाट्य पाहण्याचा लाभ घ्यावा.       असे कर्नल भोसले चौक शिव जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष व अन्य पदाधिकारी व सभासद यांनी माहिती दिली तरी हे महानाट्य पाहण्यास अवश्य यावे असे आवाहन करण्यात आले.

" मराठी पाऊल पडते पुढे"या कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि चरित्र पोवाडे यांच्या माध्यमातून व्यक्त केले "..

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्ताने पंढरपूर शहरातील संत पेठ परिसरातील प्रभाग क्रमांक 16 नगरसेविका माधुरी दिलीप धोत्रे आणि मनसेचे सोलापूर जिल्ह्याचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या अथक प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र त्यांचे कार्य व विचार हे मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंढरपूर शहरातील बाल ,वयोवृद्ध तरुण तरुणींना एक प्रेरणादायी कार्यक्रम पाहण्याचा योग मनसेनेचे दिलीप बापू धोत्रे यांनी आणून दिला आहे.      छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या जीवनामधील विविध पराक्रम महाराजांची रणनिती,गणिमी कावा,स्वराज्याच्या स्थापने साठी केलेलें प्रयत्न आणि महाराजांनी  अठरापगड गोरगरीब क ष्टकरी शेतकरी माता भगिनी यांच्या साठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाने जीवन जगण्याचा दिलेला मुलमंत्र आणि स्वराज्य रक्षणासाठी आणि त्याच्या वाढीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले कार्य त्याचप्रमाणे महिलांच्यासाठी त्यांच्या रक्षणासाठी केलेले कार्य हे जगभरातील इतिहासामध्ये न...