"मच गया शोर माढा नगरी मे" विधानसभेच्या निवडणूकीची हंडी मीच फोडणार.... अभिजीत आबा पाटील
पंढरपूर ( प्रतिनिधी) अभिजीत पाटील यांनी माढा विधानसभा इथून आपली उमेदवारी असणार असून या माढा विधानसभेच्या निवडणुकीची हंडी आपणच फोडणार. असे वक्तव्य त्यांनी माढा येथील दही हंडी उत्सव निमित्त ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपण माढा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी व मदतीसाठी त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्याच्या उद्देशाने व शेतकऱ्यांना बेरोजगार तरुणांना न्याय मिळवून देण्याच्या तयारीने त्या माढा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण उमेदवार म्हणून उभे राहणार आहोत. असे त्यांनी माढा तालुक्यातील विविध कार्यक्रमाच्या आयोजनाच्या निमित्ताने व असे कार्यक्रम आयोजित करून माढा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या संपर्कामध्ये राहण्याचे त्यांनी ठरवले आहे. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील हे पुढे बोलताना आपल्या सर्वांच्या साथीने सर्वांच्या प्रेमाने व आशीर्वादाच्या जोरावर आपण येणारी 2024 ची विधानसभेची दहीहंडी फोडणार असल्याचे सांगितले. अभिजीत पाटील यांच्या या वक्तव्याने माढा तालुक्यातील राजकारणी मंडळींना घाम फोडण्याचे काम अभिजीत पाटील यां...