"भगिरथाचे उमेदवारी मिळवण्यासाठी भगिरथ प्रयत्न "


 पंढरपूर ( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजू लागलेले आहेत.  लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक ही येत्या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

    या निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊ गर्दी ही आता सर्व पक्षांमधून दिसून येत आहे. महायुतीच्या पक्षाकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या आता ही कमी होत असलेली दिसून येत आहे. लोकसभेमध्ये महायुतीला महाराष्ट्र मधून कमी जागा मिळाल्यामुळे इच्छुक उमेदवार आता भाजपा तसेच शिवसेना शिंदे गट या बरोबर अजित पवार राष्ट्रवादी गट या पक्षाकडे आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून मागणी करत असल्याचे सद्यस्थितीला तरी दिसून येत नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला भरपूर जागा मिळाल्यामुळे त्या महाविकास आघाडीमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट त्याचप्रमाणे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या पक्षाकडे इच्छुकांची भाऊ गर्दी सध्या दिसून येत आहे. 

   पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील इच्छुकांची भाऊगर्दी ही अशीच दिसून येत आहे. भाजपाचे माजी विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक, त्याचप्रमाणे परिचारक परिवारातील जेष्ठ नेते वसंत नाना देशमुख आणि  शिवसेना शिंदे गटातील डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत हे देखील इच्छुक असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. आणि त्याचबरोबर पंढरपूर नगरपरिषद चे माजी नगराध्यक्ष साधनाताई नागेश भोसले यादेखील आमदारकीच्या रिंगणामध्ये उतरू इच्छित आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गत विधानसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील त्यांचे चिरंजीव भगीरथ भालके हे राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक लढवली होती. परंतु या निवडणुकीमध्ये त्यांना थोडक्या मतांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून बी आर एस या तेलंगणातील पक्षाकडे आपली धाव घेतली. परंतु तेथे देखील त्यांचे मन न रमल्यामुळे पुन्हा माघारी फिरल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आय काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार प्रणिती ताई शिंदे यांच्या प्रचार दौऱ्यामध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवला. व या सहभागाच्या माध्यमातून ते आज रोजी सर्वसामान्य जनतेला आवर्जून सांगत आहेत. की आम्ही प्रणिती ताई शिंदे यांना प्रचंड मताधिक्य मिळवून दिले आहे.असे भगिरथ भालके आवर्जून सांगतात.परंतु पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सर्वसामान्य जनता असा विचार करते की, लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी भाजपाविरुद्ध असे जनमत तयार झाल्यामुळे त्याचप्रमाणे कांदा उत्पादक, ऊस उत्पादक, तसेच बेरोजगार तरूण यांच्या तीव्र भावना या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून आल्या. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने व मतदारांनी भाजपच्या विरोधात मतदान करायचे म्हणून आय काँग्रेसच्या प्रणिती ताई शिंदे यांना मतदान केले. हे सर्वसामान्य मतदार ओळखून आहेत, जाणून आहेत. या लोकसभेतील निवडणुकीच्या  मध्ये मिळवून दिलेल्या मताधिक्यावर भगीरथ भालके आपला हक्क सांगत आहेत. आणि या मताधिक्याच्या जोरावरच ते आज रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या तुतारी या चिन्हाला हाती घेऊन उद्याची विधानसभेची निवडणूक लढू पाहत आहेत. पाहूया भगीरथ भालके यांच्या या तिकीट मिळवण्याच्या भगीरथ प्रयत्नाला यश लागते का?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....