पोस्ट्स

"तन्मय जाधव यांनी मिळवले एस.एस सी.मध्ये.98.60.टक्के मार्क" बी.एफ.दमाणी विद्यामंदिर च्या नावलौकिकात मानाचा तुरा...

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) नुकताच शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला. सोलापूर येथील बी एफ दमानी विद्यामंदिर येथील विद्यार्थी चि. तन्मय बाळासाहेब जाधव या विद्यार्थ्यांनी एसएससी परीक्षेमध्ये 98.60 इतके मार्क घेऊन बी एफ दमाणी विद्यामंदिर सोलापूर या शाळेच्या नावलौकिकामध्ये मानाचा तुरा त्यांनी रोवला.     तन्मय बाळासाहेब जाधव हा विद्यार्थी या शाळेमध्ये इयत्ता पहिल्या वर्गापासून अग्रक्रमांक मिळवत असलेला हा विद्यार्थी त्यांनी बी एफ दमाणी शाळेतील शिक्षकांच्या कष्टाचे व त्यांच्या मार्गदर्शनाचे चीज केले. तन्मय जाधव याला शाळेतील मुख्याध्यापक तसेच त्याचे सर्व विषयाचे शिक्षकांनी योग्य ते मार्गदर्शन केल्यामुळेच व अभ्यासामध्ये सातत्य राखल्यामुळे हे त्याला यश मिळवता आले. असे तन्मय बाळासाहेब जाधव या विद्यार्थ्यांनी आज आमच्या प्रतिनिधीला सांगितले.      तन्मय ची आई या  शिक्षिका असून तन्मय चे वडील बाळासाहेब जाधव हे देखील प्राथमिक शिक्षक होते. त्यांचे दुःखद निधन कोरोना कालावधीमध्ये कोरोना रुग्णाची सेवा करत असतानाच त्यांचे कोरोना या आजारामुळे दुःखद निधन झाले. अतिशय लहान वयामध...

"श्री मुदगुलेश्वर देवस्थान कडे जाणारा रस्ता कधी दुरुस्त होणार?"भाविकांचा संतप्त सवाल.

इमेज
 पंढरपूर (प्रतिनिधी) धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यामधील सिंदफळ या गावी असलेले श्रीमुदगुलेश्वर देवस्थान हे महादेवाचे पुरातन मंदिर असून, या मंदिराला या परिसरातील तसेच राज्यभरातील भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. तुळजापूर बार्शी रोडवरील एक किलोमीटर अंतरावर असलेले हे महादेवाचे मुदगुलेश्वर मंदिर आहे. या मंदिराकडे जाणारा एक किलोमीटर रस्ता हा पूर्णता खड्डेमय झालेला असून या रस्त्याची दुरुस्ती अद्यापही झालेली नाही. या मंदिराला या परिसरातील असंख्य भाविक लोक कार, मोटरसायकलवर तसेच पायी जात असतात. हा रस्ता दुतर्फा निसर्गरम्य झाडांनी नटलेला आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे श्री मुद्गुलेश्वर देवस्थान हे महादेवाचे मंदिर असून या मंदिराला शेकडो वर्षाचा इतिहास असून हे प्राचीन पुरातन मंदिर आहे. या मंदिराच्या आजूबाजूला संपूर्णतः झाडी असून असंख्य झाडांच्या मध्ये असलेले हे श्री मुद्गुलेश्वर मंदिर भाविकांना मनशांती तसेच समाधान देणारे हे मंदिर आहे. अशी आख्यायिका या परिसरामध्ये ऐकवली जाते.       या मुदगुलेश्वर मंदिराचे पर्यटन विकास च्या वतीने पर्यटन क्षेत्र म्हणून या भागामध्ये...

"आला आला वारा संगे पावसाच्या धारा" पंढरी नगरी भिजून चिंब झाली.

 पंढरपूर ( प्रतिनिधी) जवळपास 43 ते 44 सेल्सिअस चे तापमान आपला सोलापूर जिल्हा सहन करीत होता. आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या धारा आज पंढरपूरकरांनी अनुभवले.       पंढरी नगरी मध्ये येणारे भावीक भक्त पंढरपूर शहरांमध्ये आल्यानंतर या पंढरी नगरीतील उष्ण तापमान आला सामोरे जात होते. चंद्रभागेमध्ये सोडलेल्या पाण्यामध्ये मनसोक्त डुबंण्याचा आनंद हे भाविकभक्त घेत होते. आज सायंकाळच्या दरम्यान ला झालेल्या या मुसळधार पावसामुळे भावीक भक्त तसेच पंढरपूर रहिवासी आज आनंदून गेले.         पंढरपूर शहर व आजूबाजूच्या ग्रामीण भागामध्ये आज या पावसाच्या धारा बरसल्या शेतकरी वर्ग तसेच उन्हाने हैराण झालेले पंढरपूर वाशी नागरिक यांनी आज पावसामध्ये भिजून आनंद व्यक्त करत असल्याचे चित्र आज पंढरपूर तालुक्यांमध्ये व पंढरपूर शहरांमध्ये दिसून येत होते. या झालेल्या पावसामुळे हवे मधील उष्णता कमी होऊन थंडगार अल्हाददायक चित्र सर्वत्र पसरल्याचे दिसून येते.

"धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने भव्य स्टॅंडिंग शो संपन्न" आयोजित शिवसेना शहरप्रमुख विश्वजीत ( मुन्ना)भोसले.मित्रमंडळ.पंढरपूर

इमेज
 पंढरपूर (प्रतिनिधी) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने पंढरपूर येथील कर्नल भोसले चौक या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील विविध प्रसंगाच्या माध्यमातून तरुण पिढीला प्रेरणा देण्याच्या उद्देशाने,त्याचप्रमाणे देशभक्ती जागृत करण्याचे उद्देशाने शिवसेना शिंदे गट चे पंढरपूर शहर प्रमुख विश्वजीत उर्फ मुन्ना भोसले यांनी आयोजित केलेल्या या स्टॅंडिंग शोचे कार्यक्रम आज रोजी संपन्न झाला.       धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने या स्टँडिंग शोचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास उपस्थित शिवसेनेचे अनिल सावंत साहेब, संभाजी ब्रिगेडचे दीपक दादा वाडदेकर, काँग्रेसचे अध्यक्ष शंकर सुरवसे, पंढरपूर मर्चंट बँकेचे तज्ञ संचालक श्याम भोगाव सर, कर्नल भोसले चौकाचे आधारस्तंभ किरण आप्पा भोसले, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष अर्जुनराव चव्हाण तसेच असंख्य मान्यवर उपस्थित होते.       धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांच्या शौर्याची गाथा या स्टॅंडिंग शोच्या माध्यमातून तरुण पिढी...

"तू किस झाड की पत्ती " अजित पवार. उमेदवार निलेश लंके विषयी चे वक्तव्य.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) . लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार सभेचा अंतिम टप्पा सुरू असताना नगर जिल्ह्यातील लोकसभेच्या प्रचार सभेमध्ये पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यावर कडाडून टीका करीत असताना ते म्हणाले निलेश लंके यांना त्यांच्या मतदारसंघासाठी भरपूर निधी देण्यात आला. परंतु ते आम्हाला सोडून गेले. त्यांच्या बाबतीत बोलायचं म्हणजे हाताची मुठ बंद आहे, आता मुठ उघडायची वेळ आली आहे. असे ते म्हणाले निलेश लंके यांच्या विषयी एकरी शब्दात "तू किस झाड की पत्ती" असे देखील तुच्छपणाने त्याने आपल्या प्रचार सभेमध्ये त्यांचा उल्लेख केला.      अजित पवार यांच्या सडेतोड बोलण्याने अनेक जणांची मने दुखावले गेलेले आहेत. काही वर्षापूर्वी पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांच्या विषयी देखील त्यांनी मागील विधानसभा निवडणुकीमध्ये "उद्याच्या विधानसभेमध्ये तू दिसणार नाही." असे म्हणून विजय शिवतारे यांना पराभूत केले होते.  याचा रोष देखील विजय शिवतारे यांनी या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी दर्शविला होता.       सतत वरिष्ठ नेत्यांना त्याचप्रमाणे सहकारी नेतेमंडळींना, अधिकाऱ्यांना खडसावू...

भाजपा ने आमदारकी चे गाजर दिले कुणा...कुणाला?..

इमेज
  पंढरपूर ( प्रतिनिधी) नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका या पार पडल्या. सोलापूर लोकसभा मतदारसंघ तसेच माढा लोकसभा मतदारसंघ या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील अनेक राजकीय नेत्यांना भाजपाने आमदारकीचे गाजर दाखवलेले आहे. हे या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून आले.       या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील येणारे आमदार या सर्वांना त्याचप्रमाणे भावी आमदारांना आणि माजी आमदारांना भाजपाच्या ज्येष्ठ नेते मंडळींनी सक्त ताकीद व आदेश देऊन सांगितले होते. की या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मताच्या फरकाने निवडून आणावे. ज्या विधानसभेच्या तालुक्यामधून जास्ती जास्त भाजपाचा उमेदवाराला मतदान अधिक मिळेल, आणि ते मताधिक्य कोण मिळवून देईल. त्या व्यक्तीला आमदारकीची तिकीट दिले जाईल. असे संकेत  भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्यामुळे या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील असंख्य नेते मंडळी ही भाजपाच्या दोन्ही उमेदवाराला निवडून देण्यासाठी अथक प्रयत्न त्यांनी केल्याचे दिसून येते.       ज्या विधानसभा च्या क्षेत्रामधून भाजपच्या उमेदवाराला कमी मते मिळेल. त्या भा...

"दादा,.,.. तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला तरीही?"

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) . राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर अजित पवार यांच्यासोबत काही राष्ट्रवादीचे आमदार भाजपा व शिंदे शिवसेना यामध्ये सामील होऊन सत्ता स्थानी विराजमान झाले. त्याचबरोबर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे चिन्ह देखील सोबत घेऊन गेले. या राष्ट्रवादीमधील  घडामोडीमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चर्चा सुरू झाली. अजित पवार हे शरद पवार यांचे पुतणे शरद पवार यांच्यासारखा ज्येष्ठ राजकारणी माणसाच्या सहवासात व सानिध्यात राहून अजित पवार यांनी केलेले बंड हे शरद पवार तसेच त्यांचे कुटुंब व संपूर्ण महाराष्ट्रातील शरद प्रेमी जनतेला आवडले नाही.      अजित पवार यांनी राष्ट्रवादी मधील काही आमदारांना घेऊन भाजपा व शिंदे सेना बरोबर सरकार स्थापन केल्यानंतर त्यांच्यावर उच्चस्तरीय चौकशी जी होणार होती, ती टळली. व त्यांच्यावरील असलेले घोटाळ्याचे आरोप हे देखील थंड  झाले.भ्रष्टाचाराच्या या आरोपाला घाबरून अजित पवार हे भाजपच्या सोबत गेले की काय?  अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर झाली.       मध्यावधी लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये क...