" राजकारणात काहीही घडू शकते "


 पंढरपूर( प्रतिनिधी) प्रेमात आणि युद्धात अशक्य असे काही नसते त्याचप्रमाणे राजकारणात देखील काही घडू शकते अशी नवीन म्हण तयार होऊ पाहत आहे.

    सध्या महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेच्या एकूण 18 जागांपैकी 8 जागा बिनविरोध निवडून आले आहेत.  आता उर्वरित दहा जागेसाठी विधान परिषद च्या निवडणुका लागलेल्या आहे. भाजपा या पक्षाच्या व अन्य पक्षाच्या  युतीने या विधान परिषदेच्या जागा बिनविरोध निवडून आणण्यासाठी अथक प्रयत्न केले परंतु दहा जागेसाठी निवडणुका या लागलेल्या आहेत.

    संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले सोलापूर जिल्ह्यातील विधान परिषदेच्या एका जागेसाठी भाजपा व अन्य पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट  तसेच अपक्ष अशा विविध पक्षाने आपापली उमेदवारी अर्ज भरले होते परंतु एकास एक अशी निवडणूक व्हावी म्हणून भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार मध्ये आता चुरशीची लढत होणार की काय असे लक्षणे दिसून येत आहे.

    सोलापूर जिल्ह्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे विजयसिंह मोहिते पाटील गटाचे म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नेते वसंत नाना देशमुख यांची उमेदवारी निश्चित झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या विधान परिषदेच्या निवडणुकीकडे लागले आहे भाजपाचे नेते प्रशांतराव परिचारक  यांना या विधान परिषदेचे उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे त्यांचे असंख्य कार्यकर्ते नाराज झाले त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार राजन पाटील दिलीप माने असे अनेक मातब्बर नेतेमंडळी या विधान परिषद साठी इच्छुक होती परंतु बार्शीचे माजी आमदार राजाभाऊ राऊत यांचे पारडे जड झाले आणि त्यांच्या भाजपा वरील एकनिष्ठ पणाला मान देत भाजपाने जिल्हा परिषद च्या अध्यक्षपदापासून ते विधान परिषदेच्या उमेदवारीपर्यंत एकनिष्ठतेचे फळ देण्यात आले . राजाभाऊ राऊत यांनी भाजपाच्या जास्तीत जास्त जागा या बार्शी नगरपालिका जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती या ठिकाणी भाजपाचे उमेदवार निवडून आणले त्यामुळे त्यांना विधान परिषदची उमेदवारी  मिळाली.उमेदवारी मिळाल्यापासून राजाभाऊ राऊत हे बिनविरोध निवडून येणार अशी चर्चा सर्वत्र दिसून येत होती परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वसंत नाना देशमुख यांची उमेदवारी फिक्स झाल्यानंतर आता ही निवडणूक अटीतटीची होणार असे चित्र सद्यस्थितीला दिसून येत आहे.

     विजयसिंह मोहिते पाटील यांना सोलापूर जिल्ह्यातील आजी-माजी आमदार हे सर्वजण मान देतात बार्शीचे दिलीप सोपल मोहोळ तालुक्याचे राजन पाटील उत्तर सोलापूरचे दिलीप माने बबनदादा शिंदे संजय मामा शिंदे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख या सर्व नेते मंडळांशी जवळीकता आहे या सर्व आजी-माजी आमदारांना सोलापूर जिल्ह्यामध्ये तसेच आपापल्या तालुक्यामध्ये प्रतिष्ठा मान प्रसिद्धी तसेच विविध पदे देण्याबाबत आणि विकास कामासाठी निधी मिळवून देण्याबाबत विजयसिंह मोहिते पाटील यांनी प्रयत्न केलेले आहे त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील यांना मानणारा गट हा खूपच मोठा आहे आज जरी हे आजी-माजी आमदार भाजपा मध्ये असले विरोधी पक्षांमध्ये असले तरी देखील विजयसिंह मोहिते पाटील यांचे शब्द हे लोक डावलणार नाहीत अशी देखील चर्चा सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू आहे.

   पंढरपूर तालुक्यातील कासेगावचे रहिवाशी वसंत नाना देशमुख यांना त्यांच्या एकनिष्ठतेचे फळ म्हणून विधानपरिषद ची उमेदवारी मिळाली या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये वसंत नाना देशमुख यांना निवडून आणण्यासाठी शरद पवार गट तसेच विजयसिंह मोहिते पाटील गट हा आता चांगला सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे अतिशय साधी आणि सोपी वाटणारी ही विधान परिषदेची निवडणूक भाजपाला कठीण झाली आहे कारण विधान परिषद साठी इच्छुक असलेले प्रशांतराव परिचारक राजन पाटील दिलीप माने असे अनेक  नेते हे नाराज झाले आहेत या नाराजीचा फायदा शरद पवार गटाच्या वसंतनाना देशमुख यांना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे शेवटी बबन दादा शिंदे संजय मामा शिंदे दिलीप सोपल दिलीप माने राजन पाटील अभिजीत पाटील बाबासाहेब देशमुख शहाजी बापू पाटील दीपक आबा साळुंखे पाटील असे अनेक मान्यवर आजी-माजी आमदार हे शरद पवार साहेबांना आणि विजयसिंह मोहिते पाटील यांना मानणारे आहेत त्यामुळे या सोलापूर जिल्ह्याच्या विधान परिषदेच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे शेवटी सर्वसामान्य कार्यकर्ते व जनता सद्यस्थितीला हेच म्हणू लागली आहे की राजकारणात काही घडू शकते पाहूया काय होते ते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"

"डॉ प्रणिता ताई भालके यांच्या रेकॉर्ड ब्रेक प्रचार शुभारंभा मुळे विरोधकांच्या ह्रदयाची धकधक वाढली "