"टाकाल कचरा घाण....दंड होणार छान" पंढरपूर नगरपालिकेने केली जाहीर सुचना
पंढरपूर ( प्रतिनिधी ) दरवर्षीप्रमाणे होणाऱ्या आषाढी यात्रे निमित्ताने पंढरपूर शहरांमध्ये राहणारे रहिवासी व तसेच येणारे यात्रेकरू, भाविक भक्त ,वारकरी यांना सूचित करण्यात येत आहे. आषाढी यात्रेच्या निमित्ताने शहरांमध्ये लाखोंच्या संख्येने भावीक भक्त येत असतात. त्यामुळे पंढरपूर शहरांमध्ये घाणीचे साम्राज्य हे होत असते. घाणीच्या साम्राज्यामुळे स्थानिक रहिवासी तसेच वारकरी भाविक भक्त हे आजारी पडू नये म्हणून स्वच्छतेचे महत्व कळावे म्हणून पंढरपूर नगरपालिका आरोग्य विभागाने भाविक भक्तांना तसेच रहिवाशांना यात्री करूना आव्हान करण्यात आलेले आहे. त्यांनी कोठेही उघड्यावर कचरा टाकू नये, घाण टाकू नये ,तसेच उघड्यावर शौच करू नये ,सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये ,कचरा टाकू नये, उघड्यावर लघु शंका करू नये. असे केल्यास दोनशे रुपये पासून ते एक हजार रुपये पर्यंतचा दंड हा आकारला जाणार आहे. तरी पंढरपूर शहरातील रहिवासी तसेच मठाधिकारी आणि व्यावसायिक किरकोळ विक्रेते, वारकरी भक्त, यांच्याकडून उल्लंघन झाल्यास दंड करण्यात येईल. असे पंढरपूर नगरपालिका पंढरपूर यांच्या वतीने जाहीर सूचना करण्यात आलेली आहे.
" टाकाल कचरा घाण...दंड होणार छान"

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा