"स्वच्छतागृह तुम्ही स्वच्छ करता की आम्ही करु" .... शिवसेना युवानेते विश्वजित( मुन्ना )भोसले .
पंढरपूर प्रतिनिधी.....
दरवर्षीप्रमाणे पंढरपूर या तीर्थक्षेत्री आषाढी यात्रेच्या निमित्ताने भाविकांची गर्दी वाढू लागलेली आहे या भाविकांच्या साठी आवश्यक असलेल्या सुख सुविधा सोलापूर जिल्हा प्रशासन तसेच पंढरपूर शहर व तालुका प्रशासन आरोग्य विभाग त्याचप्रमाणे पंढरपूर नगरपालिका प्रशासन यांनी वारकरी भाव भक्तांच्या सोयी सुविधा साठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न नेहमीप्रमाणे करीत असतात. परंतु पंढरपूर शहरांमध्ये वारीचे निमित्ताने येणाऱ्या माता भगिनी यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असते. या माता-भगिन्यांच्या साठी पंढरपूर शहरांमध्ये प्रवेश केल्यानंतर कोठेही सुलभ स्वच्छतागृह उपलब्ध असल्याचे दिसून येत नाही. जे काही स्वच्छतागृह उपलब्ध आहेत ते अतिशय घाणीच्या साम्राज्यामध्ये बंद अवस्थेत दिसून येत आहेत .आणि जे काही नवीन शौचालय बनवलेले आहेत ते अद्यापही बंद अवस्थेत आहेत.
पंढरपूर शहरांमध्ये मुख्य रस्त्याने प्रवेश केल्या असतात एसटी स्टँड ते मंदिर कडे स्टेशन रोड मार्गे जाणारा रस्त्यावर कोठेही महिलांसाठी व पुरुषांसाठी सुलभ स्वच्छालय तसेच बाथरूम टॉयलेटची सुविधा नाही. प्रशासनाकडे शिवसेनेच्या माध्यमातून गेली कित्येक दिवसापासून आम्ही मागणी करीत आहोत .परंतु पंढरपूर नगरपालिका आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. महिलांसाठी आवश्यक असलेले सुलभ शौचालय हे त्वरित स्वच्छ केले जावेत व नवीन बांधून तयार असलेले सुलभ शौचालय ही सुरु करण्यात यावी. अशा प्रकारची मागणी पंढरपूर शिवसेना एकनाथ शिंदे गट या पक्षाच्या वतीने शहर प्रमुख युवा नेते विश्वजीत मुन्ना भोसले यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या सोबत पंढरपूर नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
शिवसेना युवा नेते विश्वजीत उर्फ मुन्ना भोसले हे आपल्या मुलाखतीमध्ये बोलत असताना त्यांनी पंढरपूर नगरपालिका आरोग्य विभाग यांना स्पष्ट शब्दात सुचित केले आहे. स्वच्छतागृह तुम्ही स्वच्छ करता की आम्ही स्वच्छ करू.
मुख्याधिकारी यांना निवेदन देते प्रसंगी युवा नेते विश्वजीत भोसले साईनाथ बडवे, रोहित शिंदे, अधिक कार्यकर्त्यांच्या समवेत असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा