चंद्रभागा भरून वाहू लागली.... पूर सदृश्य परिस्थिती
पंढरपूर ( प्रतिनिधी ) यंदाच्या पाऊस काळामध्ये सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून ओळखली जाणारी उजनी धरण हे शंभरीच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे. पुणे जिल्ह्यातील धरणे भरून वाहू लागल्यामुळे उजनी या धरणामध्ये त्याचा विसर्ग होत आहे .त्यामुळे पंढरी नगरीतील चंद्रभागा नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे.
चंद्रभागा नदीपात्रातील सर्व मंदिरे हे पाण्याने वेढली गेलेली आहेत. भावीक भक्त नदीच्या पात्रामध्ये उतरून स्नान करताना दिसून येत आहे. चंद्रभागेच्या तटाला नाविकांनी आपल्या होड्या आणून उभ्या केलेल्या आहेत. भाविक या होडी मधून पुंडलिकाचे दर्शन घेत असल्याचे दिसून येत आहे.
सोलापूर जिल्हा प्रशासनाने व पंढरपूर नगरपालिका प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा सावधानतेचा इशारा दिलेला आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा